June 5, 2020

…म्हणून हिमाचल प्रदेश मध्ये इस्त्रायली पर्यटकांची गर्दी जास्त असते

ब्रिटिशांचे उन्हाळी राजधानी म्हणून ओळखले जाणारे शिमला व अन्य अशा थंड हवेचे ठिकाणांनी व्याप्त, निसर्गसौंदर्याची भरभरून देणगी मिळालेले हिमाचल प्रदेश हे देशविदेशातील पर्यटकांसाठी मुख्यतः  ट्रेकिंग ,पॅराग्लायडिंग यांसारख्या स्पोर्ट्स साठी प्रसिद्ध आहे तितकेच अध्यात्मिक संस्कृती च्या अभ्यासासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे .याठिकाणी काही पर्यटक हे अध्यात्मिक मनःशांतीच्या शोधात येतात तर काही तरुण-तरुणी ,नवविवाहित दांपत्य हे निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी, मुक्त स्वच्छंदपणे आयुष्य जगण्यासाठी येतात. संपूर्ण जगभरातून हिमाचल प्रदेश मध्ये पर्यटक येत असले तरीही इस्त्राईल मधून हिमाचल प्रदेश ला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या ही अन्य देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे व जणूकाही तिथे एक मिनी इस्त्राईल स्थापन झाले आहे असे हिमाचल प्रदेशच्या कोपऱ्या कोपऱ्यात मध्ये स्थापन झालेल्या इस्त्रायली  वसाहतींमुळे जाणवते.

Loading...

हिमाचल प्रदेशातील मनाली जवळील कसोल मध्ये मुख्यत्वे इस्त्रायल पर्यटकांचे  वास्तव्य हे अधिक प्रमाणात दिसते .कसोल मध्ये प्रवेश करताच आपल्याला ठिकठिकाणी इस्त्राईलच्या पर्यटकांनी ठोकलेले तंबू आणि त्यांच्या मोटरसायकल्स दिसून येतात. या परिसरामध्ये इस्त्रायली समाजाचा इतका मोठा प्रभाव असतो की या परिसरामध्ये छोट्या छोट्या हॉटेल्समध्येही मेनूकार्ड हिब्रू भाषेमध्ये असतात व स्वागत पर अभिवादन हेसुद्धा हिब्रू भाषेतच केले जाते .इस्रायली झेंडेही याठिकाणी जागोजागी फडकताना आपल्याला दिसतात.

Loading...

कसोल मध्ये इस्रायली लोकांचे इस्रायली समुदायाचे सांस्कृतिक ,शैक्षणिक व धार्मिक पवित्र स्थान मानले गेलेले छाबडा हाऊस सुद्धा वसवण्यात आले आहे. याचा छाबडा हाऊस मुळे इस्त्रायली समाजा चा पाया हिमाचल प्रदेशमध्ये अधिकाधिक घट्ट रोवला गेला आहे .छाबडा हाऊस मध्ये इस्त्राईल वरून एक खास तरुण पुजारी याठिकाणी येणाऱ्या इस्त्रायली पर्यटकांच्या सेवेसाठी पाठवण्यात आलेला आहे. हिमाचल प्रदेशच्या या छोट्याशा गावांमध्ये सांस्कृतिक क्षेत्रात छाबडा हाऊसचे योगदान खूप मोठे आहे असे मानले जाते.

Loading...

पूर्वी खूप आधी इस्त्रायली पर्यटकांचे हिमाचल प्रदेश मधील आवडते ठिकाण मनाली हे होते .मात्र मनाली मध्ये नंतरच्या काळात पर्यटकांच्या वाढलेल्या गर्दीमुळे सिमेंट कॉंक्रीटचे मोठमोठाली हॉटेल्स बांधण्यात आली ज्यामुळे मनाली मधील शांतता भंग पावली. या परिस्थितीमुळे इस्रायली पर्यटक हे कसोल जे पार्वती नदीच्या काठी वसलेले अत्यंत शांत ठिकाण आहे त्यामुळे पर्यटक इस्रायली पर्यटक कसोलला प्राधान्य देतात .पूर्वीच्या काळी इस्रायली पर्यटक हे समाजव्यवस्थेमध्ये घ्यावे लागणारे आणि  औपचारिक धार्मिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर थोडा काळ आपल्या मनाप्रमाणे मनमुराद जगण्यासाठी हिमाचल प्रदेशाच्या दऱ्याखोऱ्यांत मध्ये येत असत. तर इथूनच इस्रायली पर्यटकांच्या वसाहतीच जणू हिमाचल प्रदेश मध्ये वसवल्या गेल्या.

Loading...

 इस्त्रायली पर्यटक सुरुवातीला पर्यटक म्हणून आले मात्र नंतर त्यांनी तेथील जागा भाडेतत्त्वावर घेऊन क्याफे व छोटी छोटी हॉटेल्स सुरू केली .स्थानिक लोकांना या हॉटेल्स मुळे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला. त्यामुळे त्यांनी आपल्या जागा नंतरच्या काळात इस्त्रायली लोकांना विकल्या. इस्रायली लोकांनी बसवलेल्या व्यवसायिक घडी मुळे हे स्थानिक लोक आता भरभराटीच्या मार्गावर आहेत.वाहनांची ,पर्यटकांची वर्दळ आता या गावांमध्ये वाढली आहे .येथील संगीता वरही इस्त्रायली संगीताचा मोठा प्रभाव दिसून येतो. स्थानिक भारतीय जनतेनेही इस्रायली समुदायाला आपला एक अविभाज्य भाग बनवून घेतले आहे. इस्त्रायली लोकांच्या आहारातील काही पदार्थ हे स्थानिक जनतेच्या आहारातही दिसून यायला लागले आहेत.

Loading...

इतक्या जास्त काळापासून हिमाचल प्रदेशामध्ये एका पर्यटकाच्या भूमिकेतून ते तेथील जागेवर मालकी हक्क असलेल्या इस्त्रायली जनता आणि भारतीय पर्यटक यांच्यामध्ये आता एक प्रकारचे राष्ट्रवाद व सार्वभौमत्वाचा वादाचा मुद्दा पुढे  जोर धरू लागला आहे. कारण भारतीय जनतेच्या मते हिमाचल प्रदेश हा भारताचा भाग असून त्यावर भारतीय जनतेचा अधिकार जास्त आहे तर इस्त्रायली पर्यटकांच्या मते इस्त्रायली पर्यटकांनी जंगलामधील या निर्जन भागाचा शोध आधी लावला होता व त्या ठिकाणी वसाहती उभ्या केल्या त्यामुळे तो खऱ्या अर्थाने इस्त्रायली जनतेचा हक्क आहे.

Loading...