July 5, 2022

भारतीय ड्रायविंग लायसन्सवर तुम्ही ‘या’ 9 देशांमध्येही गाडी चालवू शकता, वाचा कोणते आहेत हे देश ?

भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही भारतात कोठेही बिनदिक्कत गाडी चालवू शकता . पण का तुम्हाला हे माहित आहे , कि त्याच भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर तुम्ही परदेशातही गाडी चालवू शकता . अनेकांना याविषयी माहिती नसेन किंवा जाणून घ्यायची इच्छा नक्कीच असेंन कि  भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर तुम्ही कोण-कोणत्या देशात गाडी चालवण्याचा आनंद घेऊ शकता . चला तर मग पाहुयात असे कोणते देश आहेत आणि काय आहेत नियम … 

Loading...

१ . ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियामध्येहि भारतासारखीच रस्त्यांच्या उजव्या बाजूला ड्रायव्हिंगसीटची पद्धत आहे . जर तुमच्याकडे भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स आहे , तर तुम्ही  3 महिन्यांपर्यंत क्वीन्सलँड, न्यू साउथ वेल्स, दक्षिण ऑस्ट्रेलिया, दक्षिण परिसर, ऑस्ट्रेलियाचा परिसर आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रदेशात गाड़ी चालवू शकता. त्यासह येथे इंटरनेशनल ड्रायव्हिंग लायसेन्सची देखील आवश्यकता आहे.

Loading...

2. अमेरिका 

भारतामध्ये ज्या प्रकारे उजव्या बाजूला ड्रायव्हिंगसीट असते तसेच अमेरिकेमध्ये डाव्या बाजूला ड्रायव्हिंग सीट असते .  जर तुमच्याकडे भारतीय पास व्हॅलीड ड्राईव्हिंग लायसेंस आहे आणि ते इंग्रजी भाषेत आहे तर आपण अमेरिकेत संपूर्ण वर्षांमध्ये अगदी कोठेही गाडी चालवू शकता . जर तुमचे ड्रायव्हिंग लायसेन्स इंग्रजीत नाही तर इंटरनेशनल ड्रायव्हिंग परमिटसह I-94 ची कॉपीही आपल्याकडे बाळगावी लागेल. फॉर्म I-94 मध्ये तुमची अमेरिकेत दाखल झाल्याची तारीख नमूद केलेली असते . 

Loading...

3.फ्रान्स

फ्रान्समध्ये देखील रस्त्याच्या डाव्या बाजूला ड्रायव्हिंग सीट असते . भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर तुम्ही वर्षभर फ्रान्समध्ये कोठेही गाडी चालवू शकतात तथापि, लायसेन्सची फ्रेंच कॉपी आपल्या सोबत ठेवा.

Loading...

४.जर्मनी

जर्मनीमध्ये देखील डाव्या बाजूला ड्रायव्हिंग सीट असते .  या देशात तुम्ही 6 महिने भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर गाड़ी चालवू शकता. येथे इंटरनेशनल ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नाही, परंतु आपल्या स्वत:च्या भारतीय लायसेन्सची इंग्लिशमध्ये भाष्यांतरित केलेली कॉपी बाळगणे आवश्यक आहे. 

Loading...

५. मॉरीशस

तुम्ही तुमच्या भारतिय ड्रायव्हिंग लाइसेंस (इंग्लिश भाषेत) आणि आंतरराष्ट्रीय ड्राइविंग परमिटच्या आधारे मॉरिशस मध्ये कोठेही गाडी चालवू शकता . विशेष म्हणजे अगदी एका दिवसात तुम्ही संपूर्ण बेट फिरू शकता .  मॉरिशस मध्ये देखील उजव्या बाजूला ड्रायव्हिंग सीट असल्याने येथे ड्रायव्हिंग अधिक सोयीस्कर होईल . 

Loading...

६. नॉर्वे

मध्यरात्री होणाऱ्या सूर्योदयासाठी नॉर्वे प्रसिद्ध आहे . या देशात डाव्या बाजूला ड्रायव्हिंग सीट आहे . येथे आपण इंडियन ड्रायव्हिंग लायसन्सवर 3 महिने गाडी चालवू शकता परंतु आपले ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजी भाषेत असावे . 

Loading...

 ७. न्यूझीलंड

न्यूझीलंडमध्ये गाडी चालवण्याचा आनंद घेण्यासाठी तुमच्याकडे भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स जरी असले तरी तुमचे वय २१ वर्ष आणि अधिक असावे लागेल . न्यूझिलँमध्ये देखील भारतीय नियमानुसार उजव्या बाजूला ड्रायव्हिंग सीट आहे . यासह तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हे इंग्रजी भाषेत असणे अनिवार्य आहे . 

Loading...

८. स्वित्झर्लंड

बर्फाच्या ढिगाऱ्यांनी आच्छादलेल्या रत्यांमधून गाडी चालवणे हे जर तुमचे स्वप्न असेल तर तुमच्या भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह वर्षभर तुम्ही गाडी चालवू शकता . स्वित्झर्लंडमध्ये डाव्या बाजूला ड्रायव्हिंग सीट असते .

Loading...

9. दक्षिण अफ्रीका

दक्षिण अफ्रीकेमध्ये ड्रायव्हिंग सीट उजव्या बाजूला असते . साउथ आफ्रीकामध्ये गाडी चालवण्यासाठी तुमचे भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजीमध्ये असणे आवश्यक आहे . यासह हे देखील लक्षात ठेवा की तुमच्या जवळ आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग प्रिमिट असणे देखील आवश्यक आहे. तर हे आहेत ते देश आणि या देशामध्ये गाडी चालवण्यासाठीचे नियम . हि माहिती कशी वाटली आणि तुम्हाला कोणत्या देशामध्ये गाडी चालवायला आवडेल  कमेंट करून आम्हाला नक्की कळवा .

Loading...