July 5, 2022

लिफ्टमध्ये आरसे का बसवतात? याचे कारण ऐकून तुम्हीही अचंबित व्हाल

थोडीसी तो लिफ्ट करा दे …. 

लिफ्ट चा शोध कधी लागला हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना तर मी सांगतो. लिफ्ट चा शोध लागला १८५३ साली . न्यूयॉर्क शहरात “Otis ” यांनी  पहिली building  lift  बनविली म्हणून आधुनिक लिफ्ट चे जनक म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते . आजही मोठ्या-मोठ्या अपार्टमेंटच्या लिफ्ट वर आपल्याला  ” Otis ” हे नाव आपल्याला आढळून येतं . 

Loading...

भारतात अशी लिफ्ट सर्वप्रथम कोलकाता मधील राजभवनात बसविली गेली  १८९३ मध्ये  आणि त्याचेही निर्माते देखील “Otis ” हेच होते . हि लिफ्ट सुरुवातीला जेव्हा वापरात आली तेव्हा लोकांनी जिने सोडून लिफ्ट वापरायला सुरु केले पण काही दिवसातच ते कंटाळले  कारण, ‘ही  लिफ्ट  जिन्यावरून जाण्यापेक्षाही हळू वाटते ‘ असे त्यांचे म्हणणे पडले . लिफ्ट बनवणाऱ्या कंपन्या यावर उपाय शोधू लागल्या . 

Loading...

पण शास्त्रज्ञानी यावर एक शक्कल लढवली , त्यांनी लिफ्ट मध्ये चक्क आरसे बसवले .  लिफ्ट मध्ये शिरताच हे आरसे दिसले कि लोक स्वतःला निरखण्यात  गुंग होऊन जात आणि मग लिफ्ट किती वेगात चालली आहे याकडे त्यांचे लक्ष राहत नसे. काही दिवसानंतर जेव्हा लिफ्टचा “survey ” केला तेव्हा निदर्शनास आलं  कि त्याच वेगात चालणाऱ्या lifts  , आता लोकांना हळूहळू चालत आहेत असं  वाटेनासं  झालं . 

Loading...

आणि तेव्हापासून मात्र , लिफ्ट मध्ये आरसे बसविण्याचा प्रघातच पडला.  आहे कि नाही गंमत ?

Loading...