May 23, 2022

… म्हणून प्रेत स्मशानात नेण्यापूर्वी त्याला विश्रांती देऊन दिशा बदलली जाते. कारण वाचून तुम्हीही अचंबित व्हाल

प्रत्येक धर्मामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विभिन्न पद्धती चालीरिती व रितीरिवाज यांचे पालन केले जाते .जसे की जन्म झाल्यानंतर नामकरण, उष्टावण ,लग्न ,जागरण गोंधळ, डोहाळे जेवण यांसारख्या विविध उत्सवांना वेगवेगळ्या प्रकारांनी वेगवेगळ्या धर्मांमध्ये साजरे केले जाते अगदी तसेच जेव्हा मनुष्य मृत्यू पावतो तेव्हा त्याचे अंत्यसंस्कार ही करण्याची पद्धती किंवा प्रथा ही विभिन्न धर्मामध्ये भिन्न असते.

Loading...

चालीरीती व प्रथा या तत्कालीन परिस्थिती मधूनच उदयास आलेल्या असतात. मनुष्य मृत्यू पावल्यानंतर जेव्हा त्याला स्मशानामध्ये नेतात तेव्हा प्रेताला थोडावेळ विश्रांती देऊन त्याची दिशा बदलली जाते .प्रेताला स्मशानात नेऊन त्याची दिशा बदलण्या मागचे कारण हे सामाजिक व शास्त्रीय आहे. हे संदर्भ आज आपण तपासून पाहणार आहोत.

Loading...

सध्या अतिप्रगत आरोग्य सुविधांच्या युगामध्ये थोडे काही आजारपण आले तर आपण वैद्यकीय मदत घेतो त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा डॉक्टर हे पहिले व्यक्ती असतात जे नाडी, हृदयाचे ठोके तपासून व अन्य सर्व त्या तपासण्या करूनच संबंधित व्यक्ती मृत पावली आहे हे अगदी शास्त्रीय दृष्ट्या नातेवाईकांना व जवळच्या व्यक्तींना सांगतात. मात्र पूर्वीच्या काळी वैद्य किंवा घरगुती उपचार यांवरच कोणतेही आजारपण बरे करण्यासाठी भर दिला जायचा .

Loading...

पूर्वीच्या काळी गावातील अनुभवी ,ज्येष्ठ वयोवृद्ध मंडळींचा सल्ला हा आरोग्यविषयक समस्यांसाठी घेतला जात असे।त्यामुळे जेव्हा एखाद्या मानवी शरीराची हालचाल थांबत असते तेव्हा वयस्कर मंडळी येऊन त्या व्यक्तीची नाडी ,त्याची जीभ,नाकाचा शेंडा इत्यादी काही शरीरातील अवयवांची तपासणी अनुभवाने करून ती व्यक्ती मृत झाली असल्याचे घोषित करत असत.मात्र याला कोणताही शास्त्रीय किंवा आरोग्यशास्त्राचा संदर्भ नसेल त्यामुळे कधीतरी अगदी चमत्कार घडावा तसे सरणावर ठेवलेले प्रेत जिवंत व्यक्ती असायचे व ती व्यक्ती उठून बसायची त्यामुळे असा प्रसंग उद्भवू नये याची खबरदारी घेण्याच्या दृष्टीने प्रेत स्मशानात नेताना त्याला मध्ये विश्रांती देऊन त्याची दिशा बदलण्याचा प्रघात सुरू करण्यात आला.

Loading...

गावातील अनुभवी वयस्कर व्यक्ती यांनी मृत घोषित केलेली व्यक्ती खरंच मृत झाली आहे का हे पुन्हा एकदा निश्चित करून घेण्यासाठी मृतदेहाला अंघोळ घालणे, पूजा करणे यांसोबतच मृतदेहाला स्मशानात नेतांना विसाव्याच्या ठिकाणी ठेवून त्या प्रेताची दिशा बदलण्याची प्रथा सुरू करण्यात आली आली असावी असे काही समाजशास्त्रीय संदर्भ सांगतात.

Loading...