May 23, 2022

…म्हणून अंत्ययात्रेला जाऊन आल्यावर स्नान करावे लागते

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक विधी चे काही दंड व नियम असतात व त्यांचे पालन हे अत्यंत काटेकोरपणे केले जाते.कोणत्याही अंत्यविधीला जाऊन आल्यानंतर आपण आंघोळ केल्याशिवाय घरातील कोणत्याही वस्तू किंवा व्यक्तीस स्पर्श करत नाही या मागचे कारण हे केवळ अंधश्रद्धा नसून यामागे काही शास्त्रीय व आरोग्याशी निगडित तथ्य दडलेली आहेत जी आज आपण जाणून घेणार आहोत.

Loading...

अंत्यविधीला जाऊन आल्यानंतर लगेच आंघोळ करण्यामागचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे अंत्यविधी हे स्मशानभूमीत होतात याठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रेतांचे विघटन करणाऱ्या करणाऱ्या विषाणू व जीवजंतूंचा वावर असतो.त्यामुळे या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या शरीरावरही हे विषाणू किंवा जीवजंतू पसरू शकतात .अंत्यविधीला जाऊन आल्यानंतर लगेच किमान आंघोळ केली तर हे जीवजंतू आणि विषाणू दूर होऊन त्याचा प्रादुर्भाव किंवा संसर्ग अन्य कोणाला होण्यापासून आपण रोखू शकतो.

Loading...

पूर्वीच्या काळी लोक अंत्यविधीला जाऊन आल्यानंतर त्याठिकाणी घातलेले कपडे हे घराबाहेरच काढून आंघोळ करून मग घरामध्ये प्रवेश करत असत पण सध्या फ्लँट संस्कृतीमध्ये हे शक्य होत नसले तरी किमान घरात जाऊन तातडीने अंघोळ करणे नक्कीच करता येऊ शकते.

Loading...

कोणत्याही जीव जंतू किंवा विषाणूचा संसर्ग हा लहान मुले व घरातील वयोवृद्धांना तुलनात्मक दृष्ट्या अधिक जलद गतीने होऊ शकतो त्यामुळे अंत्यविधीला जाऊन आल्यावर अंघोळ केल्याशिवाय वयोवृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना शक्यतो स्पर्श करणे टाळावे तसेच घरातील अन्य वस्तूंनाही स्पर्श करू नये.

Loading...

विशेषतःजेव्हा स्वाईन फ्लू किंवा तत्सम आजारांचा फैलाव झालेला असतो तेव्हा अंत्यविधीला गेल्यानंतर आंघोळी सोबतच आपले नाकाला मास्क ने झाकून घेणेही आवश्यक ठरते.

Loading...

वैदिक काळातील काही संहितामध्ये अंत्यविधीला जाणे हे एक पवित्र काम मानले जाई कारण अंत्यविधीला गेल्यानंतरच आपल्याला आयुष्यातील अंतिम सत्य हा मृत्यू आहे याची जाणीव होते .मात्र या ठिकाणी गेल्यानंतर अंघोळ करणे हे जणूकाही बंधनकारकच आहे असे सुद्धा या ठिकाणी मांडण्यात आले आहे.

Loading...

आर्य चाणक्यांनीसुद्धा अंत्यविधीला जाऊन आल्यानंतर अंघोळ करण्यामागील कारण हे म्रूत शरीरावरील विषाणू व जीवजंतूंचा नायनाट करणे असल्याचे सांगितले.

Loading...