July 5, 2022
महादेवाच्या मंदिरा बाहेर नंदीची स्थापना का केली जाते हे जाणून घेऊया

महादेवाच्या मंदिरा बाहेर नंदीची स्थापना का केली जाते? जाणून घ्या अध्यात्मिक कारण – हे माहित आहे का?

देवाधिदेव महादेव यांच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वारातच महादेवांची समाधी भंग होऊ नये यासाठी उभ्या असलेल्या नंदीचे दर्शन घेऊनच आपण आत प्रवेश करतो .महादेवांच्या नंदीच्या पुराणामध्ये निरनिराळ्या कथा सांगितल्या जातात. नंदी हे भारतीय धार्मिक व्यवस्थेमध्ये पूजनीय मानले जातात मात्र एखाद्या दैवता प्रमाणे पूजन केले जाणाऱ्या नंदी हे गाभाऱ्यात नसतात तर त्यांना महादेवाच्या मंदिराच्या बाहेर का स्थापन केले जाते यामागची आख्यायिका आज आपण जाणून घेणार आहोत.

Loading...

 नंदी हे शीलाद मुनींचे पुत्र होते.शीलाद मुनी हे ब्रह्मचारी होते. मात्र आपला वारसा पुढे चालवण्यासाठी पुत्र हवा यासाठी त्यांनी महादेव शिवाची आराधना सुरू केली. शीलाद मुनींच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना तुमची पुत्रप्राप्तीची इच्छा निश्चितच पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला. असे सांगितले जाते की नंदी यांची निर्मिती यज्ञातून झाली. नंदी हे हिरे माणिक यांनी जडित ढाली मध्ये प्रकट झाले असे सांगितले जाते.

Loading...

नंदीला मुळात बैल म्हटले जाते. तसेच नंदी हे नंदीनाथ संप्रदायातील प्रमुख गुरु होते असेही मानले जाते. शीलाद मुनींनी आपल्या या पुत्राचे नाव नंदी किंवा नंदू असे ठेवले. नंदू या शब्दाचा मूळ अर्थ हा वाढणे, विकसित होणे असा असतो. तर संस्कृत मध्ये याचा अर्थ आनंदी, उत्साही असा ठेवला जातो. नंदी हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते व शिवाचे निस्सीम भक्त होते. शीलाद मुनींनी नंदीला लहानपणापासूनच वेद शास्त्र ,आरोग्यशास्त्र ,युद्धविद्या, न्रूत्य शास्त्र ,गायन शास्त्र या सर्वांचे परिपूर्ण ज्ञान दिले होते व अत्यंत तल्लख बुद्धी असलेल्या नंदी यांनीही लवकरच ते ग्रहण केले होते .त्यामुळे शीलाद मुनींना आपल्या पुत्राचा अत्यंत अभिमान होता.

Loading...

एकदा शिलाद मुनींकडे मित्र आणि वरूण हे दोन महान ऋषी आले. या दोन महर्षींना बघून शीलाद मुनींना अत्यंत आनंद झाला व त्यांनी आपल्या परमप्रिय पुत्र नंदीला या दोघांचापाहुणचार करण्याची जबाबदारी दिली. मित्र आणि वरुण हे दोन महाऋषि शीलाद मुनींच्या घरी काही काळ वास्तव्यास राहिले व या संपूर्ण काळात नंदीने त्यांची अत्यंत उत्तम व्यवस्था ठेवली. यामुळे ज्यावेळी  निरोप देण्याची वेळ आली तेव्हा या दोन ऋषींनी शिलाद मुनींना शतायुषी भव असा आशीर्वाद दिला मात्र नंदीने ज्यावेळी त्यांचे चरण स्पर्श केले तेव्हा नंदीला शतायुषी भव असा आशीर्वाद न देता आपल्या मातापित्यांची काळजी घे ,उच्चविद्या शिक असा आशीर्वाद दिला.

Loading...

अनुभवी शीलाद मुनींच्या नजरेतून मित्र आणि वरुण या दोन ऋषींच्या वागण्यातील बदल निसटला नाही व ते धावतच मित्र आणि वरुण ऋषींच्या मागोमाग घरातून बाहेर पडले व त्यांनी त्यांना नंदीच्या भविष्याविषयी विचारले त्यावेळी मित्र आणि वरुण या ऋषींनी असे सांगितले की त्यांनी नंदीला शतायुषी भव असा आशीर्वाद दिला नाही कारण नंदी हे अल्पायुषी आहेत आपल्या इतक्या तपश्चर्येनंतर प्राप्त झालेल्या जिवलग पुत्राचे आयुष्य अल्प असल्याचे ऐकून शीलाद मुनींना धक्काच बसला. ते तसेच घरात आले त्यावेळी नंदीने आपल्या पित्यास म्हणजे शीलादमुनींना त्यांच्या दुःखावेगाचे कारण विचारले.

Loading...

अगदी खोदून विचारल्यानंतर शीलाद मुनींनी नंदी यांना ते अल्पायुषी असल्याचे सत्य सांगितले. त्यावर किंचितही न घाबरता नंदी यांनी हास्य केले व ते शीलाद मुनींना समजावणीच्या सुरात सांगू लागले की तुम्ही भगवान शिवांना प्रत्यक्ष भेटले आहात ना मग ज्यांनी भगवान शिव यांना प्रत्यक्ष पाहिले आहे त्यांना मृत्यूचे भय कशास हवे. मीसुद्धा भगवान शिवाची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेईल व त्यांच्याकडून अल्पायुषी असण्याचा हे विधिलिखित बदलण्यास त्यांना विनंती करेल व म्हटल्याप्रमाणे नंदी यांनी भुवना नदीच्या पाण्यामध्ये आपली तपश्चर्या सुरू केली. अगदी कठोर तपश्चर्येनंतर भगवान शिव नंदी यांच्यावर प्रसन्न झाले व त्यांच्या समोर साक्षात महाकाय रूपात प्रकट झाले.

Loading...

त्यावेळी नंदी यांच्या डोळ्यात आनंद व भावनावेगाने पाणी आले .ते निःशब्द झाले .नंदी यांची ती अवस्था बघून भगवान शिवांनी त्यांना कोणताही वर मागण्याची संधी दिली. यावेळी नंदी यांनी मला तुमच्या सोबत कायम राहायचे आहे आणि वर तुम्ही मला द्यावा अशी विनंती केली .त्यावर भगवान श्रीकृष्णांनी माझा जो द्वापारपाल आहे तो सध्या या सेवेतून मुक्त झाला आहे त्याची जागा तू घेऊ शकतोस असे नंदी ला सांगितलं. नंदी यावर प्रेमाने तयार झाले  व तेव्हापासून भगवान शंकराच्या प्रवेशद्वारापाशी नंदी बसलेले असतात. भगवान शंकरांच्या समाधीमध्ये भंग येऊ नये यासाठी प्रथम नंदीचे दर्शन प्रवेशद्वारावरच घेतले जाते.

Loading...

एकदा भगवान शिव देवी पार्वती यांना वेदांचा अर्थ समजावून सांगत असताना पार्वती यांचे लक्ष दुसरीकडे गेले त्यानंतर देवी पार्वती यांनी कोळीणीचा अवतार धारण करून पृथ्वीवर जन्म घेतला. या पार्वती देवींच्या अवतारामध्ये नंदी यांनी देवमाशाचा अवतार धारण करून समुद्रामध्ये हैदोस घातला. त्यावेळी पार्वती यांचे  कोळीणीच्या अवतारातील जे पिता होते त्यांनी जो कोणी या देव माशा चा वध करेल त्याला मी माझ्या कन्येचा हात देईल असे आव्हान केले. त्यावेळी भगवान शिवांनी देवमाशाचा वध केला व पर्यायाने पार्वती यांच्याशी त्यांचा विवाह झाला व पार्वती या पुन्हा मूळ अवतारामध्ये परतल्या.

Loading...

मंदिराबाहेर बसलेले नंदी हे कोणत्याही जिवाने परमेश्वरा प्रति एकाग्रचित्ताने समर्पित होण्याचे प्रतीक मानले जाते.

Loading...