July 5, 2022

PM मोदींना आव्हान देऊन भाजप सोडणाऱ्या ‘या’ नेत्याला काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदासाठी उतरवले मैदानात

राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज विधानभवनात सरकारची बहुमत चाचणी होणार असून यासाठी काँग्रेसने नाना पटोले यांची निवड केली आहे. त्यामुळे आता भाजपच्या किसन कथोरे आणि काँग्रेसच्या नाना पटोले यांच्यात विधानसभा अध्यक्षपदासाठी चुरस होणार आहे.

Loading...

याआधी काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव या पदासाठी पुढे आले होते, मात्र आता अचानक नाना पटोले यांचे नाव पुढे आले असून ते या निवडणुकीत महाविकासआघाडीचे उमेदवार असणार आहेत. भाजपने देखील याआधी या निवडणुकीसाठी किसन कथोरे यांना मैदानात उतरवले असून या दोघांमध्ये किती मोठी टक्कर होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Loading...

महाआघाडीकडे बहुमत नसल्याचा आरोप देखील भाजपने केला आहे. तसेच हंगामी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बहुमत सिद्ध करणे संसदीय लोकशाहीच्या विरोधी आहे असा आरोप देखील भाजपने केला होता. तसेच आपला उमेदवार देखील रिंगणात उतरवला होता.

Loading...

त्यामुळे आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सरकारच्या पहिल्या अग्निपरीक्षेत काय होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Loading...

One thought on “PM मोदींना आव्हान देऊन भाजप सोडणाऱ्या ‘या’ नेत्याला काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदासाठी उतरवले मैदानात

Comments are closed.