December 1, 2021

एकनाथ खडसे करणार ‘या’ दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र विधानसभा निवडुकीनंतर भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे लवकरच भाजप सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. 12 तारखेला गोपीनाथ गडावर भाजपवर टीका करणाऱ्या खडसेंनी भाजप सोडण्याचा निर्णय नक्की समोर येत आहे. त्याचबरोबर ते भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

Loading...

मिळालेल्या माहितीनुसार, खडसे भाजपवर नाराज असून गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात त्यांनी आपला काही भरोसा नसल्याचे म्हटले होते. तसेच त्या कार्यक्रमानंतर त्यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे देखील सर्वांनी पहिले आहे. त्यामुळे खडसे येत्या २० तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Loading...

दरम्यान, खडसे यांच्याप्रमाणेच अनेक भाजप नेते पक्षामध्ये नाराज असून ते काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्र्राचे लक्ष लागून आहे.

Loading...

One thought on “एकनाथ खडसे करणार ‘या’ दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

  1. Pingback: keto deviled eggs

Comments are closed.