December 1, 2021

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा महत्वाचा निर्णय : यापुढे आंध्रप्रदेश…

गुन्हेगारांसंबंधित महत्वाचा निर्णय घेतल्यानंतर आता आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे आंध्रप्रदेशच्या तीन राजधान्या असणार असून याची घोषणा त्यांनी काल विधानसभेत केली. सध्या हैदराबाद हि तेलंगणा आणि आंध्रप्रदेशची संयुक्त राजधानी असून नवीन राजधानी तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

Loading...

या नवीन निर्णयानुसार,करनूल, विशाखापट्टनम आणि अमरावती या तीन नवीन राजधान्या असणार आहेत. या तिन्ही ठिकाणाहून राज्याचे काम चालणार आहे. विशाखापट्टनम् आंध्रप्रदेशची प्रशासकीय कार्यकारी (executive) राजधानी असणार आहे. करनूलला न्यायिक (judicial) राजधानी म्हणून ओळख मिळणार आहे. तर, अमरावती विधिमंडळ(lagislative ) राजधानी म्हणून ओळखली जाणार आहे. त्यामुळे आता या तिन्ही ठिकाणांहून राज्याचा कारभार चालवला जाणार आहे.

Loading...

दरम्यान, यासाठी सरकारने नवीन समितीची स्थापना केली असून याबाबत अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सांगितले.

Loading...