May 23, 2022

‘या’ 82 वर्षाच्या माऊलीसाठी ‘हे’ कलेक्टर बनले देवदूत…

भारतीय लोकशाही व्यवस्थेचा पाया कुशल आणि तत्पर अशा प्रशासकीय व्यवस्थेला मानले जाते. भारतात दरवर्षी प्रशासकीय सेवांशी निगडित परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढत आहे. भारतीय प्रशासकीय सेवांच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक आणि शासन व जनतेच्या मधला दुवा बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते .प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यानंतर शासनाच्या योजना आणि जनतेचे प्रश्न यामध्ये सांगड घालणे हे खऱ्या अर्थाने या सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोरील मोठे आव्हान असते. कधीकधी आपल्या प्रशासकीय सेवेच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून आपल्या अधिकारांचा वापर करण्याची संवेदनशीलता  प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बाळगणे गरजेचे असते.

Loading...

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये रुजलेला भ्रष्टाचार आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीच्या संदर्भातील अनास्था यांचीच वर्णने आपण प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये देखील पाहत असतो. शासकीय अधिकार्‍यांकडून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही असे चित्रही काही ठिकाणी पाहायला मिळते. अशा काहीश्या अनुत्साही वातावरणामध्ये तळागाळातल्या अगदी शेवटच्या घटकापर्यंत आपल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन आशेची ज्योत लावण्याचा आदर्श काही अधिकारी समोर ठेवतात व ते निश्चितच प्रेरणादायी आहे. यामध्ये नवलाची गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रसिद्धी शिवाय अगदी अलिप्तपणे कुठल्याही स्वार्थाशिवाय एका वंचित घटकाला मदत करणे म्हणजे जणू काही माणुसकीचा झराच होय. हे कर्तृत्व केले आहे तमिळनाडूमधील करूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी टी अंबाजेगन  यांनी.

Loading...

आपल्या उत्कृष्ट कार्याबद्दल ख्याती असलेले टी अंबाजेगन यांना एका लोक अदालत कार्यक्रमामध्ये काही गावकऱ्यांनी या भागात एक ऐंशी वर्षाची निराधार आजारी हतबल महिला अतिशय हलाखीचे आयुष्य जगत असल्याचे सांगितले .या महिलेला कोणीही नातेवाईक नसल्यामुळे व वयोमानानुसार शारीरिक हालचाल करता येत नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी काहीच काम करता येत नाही. रोजच्या अन्न पाण्यासाठी ही ही महिला दुरापास्त झाल्याचे गावकऱ्यांनी अंबाजेगन यांना सांगितले.

Loading...

एका झोपडीमध्ये आपले शेवटचे दिवस हे शारीरिक व मानसिक यातना मध्ये ही  महिला घालवत होती. काही काळ शेजारपाजारच्या लोकांनी त्यांना मदत केली मात्र एका मर्यादेनंतर आजूबाजूच्या लोकांनीही त्यांना खाण्यापिण्यासाठी देणे बंद केले .अक्षरशः मरण केव्हा येईल व आपल्याला यातून मुक्तता मिळेल याची ही माऊली जणू काही वाट पाहत होती. मात्र याच वेळी टी आंबाजेगन यांच्या रूपात जणूकाही देवदूतच या माऊलीच्या दारामध्ये हजर झाले.

Loading...

या माऊलीच्या यातनांची कहाणी ऐकून टी अंबाजेगन अस्वस्थ झाले व घरी जाऊन त्यांनी आपल्या पत्नीला चांगले भोजन बनवण्यास सांगून ते एका डब्यात भरून घेतले आणि तडक  या गावाचा रस्ता धरला. या 80 वर्षाच्या माऊलीच्या झोपडीच्या बाहेर जिल्ह्याचा सर्व कारभार सांभाळणारा हा मोठा अधिकारी हातामध्ये डबा घेऊन उभा होता. या माउलीला नक्की काय घडत आहे किंवा पुढे काय होणार आहे याची तिळमात्रही कल्पना नव्हती. त्या झोपडीच्या तुटक्या-फुटक्या संसारामध्ये च्या आत मध्ये येऊन टी अंबाजेगन यांनी आस्थेने त्या माऊलीची चौकशी केली.

Loading...

तिच्या आरोग्याची विचारपूस केली आणि तीला सांगितले कि जेवायला  पटकन ताटं घ्या मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो आहे .आज आपण एकत्र जेवण करूया. घरामध्ये पुरेशी भांडीही नसलेल्या त्या वृद्धेने गहिवरून सांगितले की माझ्याकडे भांडी पण नाही. आम्ही केळीच्या पानांवर जेवतो.जिल्हाधिकारी पदाचा आपला रुबाब बाजूला सारून अंबाजेगन यांनी त्या माऊलीला सांगितले की ठीक आहे मी पण आज तुमच्या सोबत केळीच्या पानावर जेवण करेल आणि मग केळीच्या पानांवर त्यांनी स्वतः जेवणाचे ताट बनवले व स्वतः त्या वृद्धेला सोबत घेऊन तिला सुद्धा जेवण खाऊ घातले.

Loading...

इतक्यावरच न थांबता त्यांनी तेथील सरकारी अधिकाऱ्यांना या महिलेला वृद्ध महिलांसाठीच्या पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा एक हजार रुपये इतके निवृत्तीवेतन देण्याच्या सूचनाही केल्या जेणेकरून या महिलेला आपल्या उदरनिर्वाहासाठी अन्न पाण्यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. या उदाहरणावरून वृद्ध महिलांच्या प्रश्नांविषयी जास्त जागरूकता असणे गरजेचे आहे असे अंबाजेगन यांनी सांगितले व तात्काळ वृद्ध महिलांसाठी ची पेन्शन योजना ही राबवली जाईल असे सुद्धा सांगितले .या वृद्धेला बँकेपर्यंत चालत जाणेही शक्य नसल्यामुळे बँकेकडून दर महिन्याला घरपोच पेन्शन पुरवली जाईल अशी विशेष सुविधाही देण्यात आली .सध्याच्या काळात मुलांकडून आई-वडिलांना घराबाहेर काढून देण्याच्या घटना वाढताहेत.मुलांकडून आई-वडिलांच्या जबाबदारी झटकण्याचे प्रमाणही वाढत आहे. या परिस्थितीमध्ये एका प्रशासकीय अधिकाऱ्याने एका अपंग वृद्ध महिलेची जबाबदारी स्वीकारणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

Loading...