July 5, 2022

पेन विकता विकता उभी केली ५०० कोटींची कंपनी

पेन विकता विकता उभी केली ५०० कोटींची कंपनी अमित डागा यांची रोमांचकारी कहाणी

वयाच्या १९ व्या वर्षीच स्वतःची कंपनी स्थापन करून अमित डागा यांनी तरूण पिढीसमोर आपला आदर्श निर्माण केला. लहानपणापासूनच त्यांना नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय उभा करायचा होता. स्वतःच स्वतःचा बॉस बनण्याचा विचारच त्यांची प्रेरणा बनला. त्यानुसार ते पुढे जात राहिले. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षीच पदवी प्राप्त करून, फक्त ८००० रूपयांच्या छोट्याशा रकमेतून त्यांनी ‘डीबीएम मार्केटींग’ नावाची कंपनी सुरू केली. सुरुवातीला ते गुडगाव येथील बऱ्याच कमर्शियल टॉवरमध्ये पेन विकायचे.

Loading...

कंपनी सुरू केली त्यावर्षी ऑफीस बॉयपासून डिलीव्हरी बॉयपर्यंत आणि अकाउंटट ते सेल्समनपर्यंत सगळ्या भूमिका अमित डागा यांनी एकट्यानेच पार पाडल्या. या काळात त्यांनी अनंत आर्थिक अडचणी झेलल्या. त्या अडचणींची पर्वा न करता, त्यांनी कंपनीमध्ये एक सेल्समन आणि असिस्टंट नेमला.

Loading...

पुरवठादार (Supplier) ला पैसे देण्यासाठी त्यांना ३० ते ३५ दिवसांचा अवधी मिळत असे. याच काळात त्यांना क्लाईंटकडूनही पैसे गोळा करण्याचे काम करावे लागे. हा काळ जणू त्यांच्या सत्वपरीक्षेचाच होता.

Loading...

त्यानंतर हळूहळू दिवस पालटू लागले. भारतात ई-कॉमर्स इंडस्ट्रीने आपले पाय रोवण्यास सुरूवात केली. या संधीचा फायदा डागा यांनी उचलला. हळूहळू त्यांनी ग्राहकोपयोगी वस्तू (Consumer Durables) आणि IT सामान पुरवण्याची सेवा सुरू केली. २०११ पर्यंत उत्पादक (Manufacturer) कडून सामान घेऊन रिटेल बाजारात त्याचा पुरवठा करीत असत. त्यानंतर त्यांनी ‘डील क्या है’ या नावाने ई कॉमर्स बेवसाईट बनवून त्यावर सामानाची विक्री सुरू केली.

Loading...

या वेबसाईटच्या माध्यमातून महिन्याला ४० ते ५० कोटींच्या सामानाची विक्री होऊ लागली. ८००० च्या रकमेतून उभा केलेला हा व्यवसाय आज ५०० कोटींवर येऊन पोहचला आहे. अमित डागा यांचे अपरिमित कष्ट, चिकाटी यांच्या जोरावर त्यांचा व्यवसाय यशाची नवनवीन शिखरे गाठतो आहे.

Loading...

One thought on “पेन विकता विकता उभी केली ५०० कोटींची कंपनी

Comments are closed.