July 5, 2022

सॅल्युट ! सीमारेषेवर कर्तव्य पार पाडण्यासाठी जवान स्वतःच्याच लग्नाला अनुपस्थित …

स्वतःचे प्राण अक्षरशः तळहातावर घेऊन सीमारेषेवर शत्रुशी दोन हात करून लढणाऱ्या भारतीय सैन्यदलामुळे आज आपण आपल्या घरात सुरक्षितपणे श्वास घेऊ शकतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भारतीय सैन्यदलाच्या पराक्रमाच्या आणि समर्पणाच्या कथा वर्षानुवर्षे एक उदाहरण व आदर्श म्हणून सांगितल्या जात आहेत.

Loading...

आपले घर ,संसार, नातेवाईक, मित्रमंडळी, कौटुंबिक जबाबदाऱ्या ,मनोरंजन या सर्वांना बाजूला सारून शत्रूपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी कडा पहारा देत कधी थंडी वाऱ्यामध्ये ,तर कधी कडक उन्हामध्ये तर  कधी अगदी उणे शून्य इतक्या नीचतम तापमानाच्या वातावरणातही हे सैनिक प्राणांची तमा न बाळगता जागता पहारा देत असतात.या सर्वांमध्ये त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांना तितकीच मोलाची साथ.कुटुंबियांकडूनही मिळत असते.सैनिकांचे कुटुंबीयही त्यांच्या कर्तव्यांच्या आड  कधी येताना दिसत नाहीत .अशी ही देशाभिमान व देशाप्रती च्या समर्पणाची भावना नुकत्याच घडलेल्या घटनेतून पुन्हा एकदा ठळक झाली व भारतीय सैन्य दलाच्या विषयीच्या आदर व अभिमान मध्ये आणखीच वाढ झाली.

Loading...

सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यामध्ये लग्न एक संपूर्ण आयुष्यातील मोठा सोहळा असतो व याची तयारी खूप आधीपासून केली जाते. लग्नाच्या दिवशी तर वधू आणि वर हे अत्यंत उत्सुकतेने त्या क्षणाची वाट बघत असतात.मात्र भारतीय सैन्य दलातील एका जवानाच्या बाबतीत नुकतेच सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना विवाहाच्या दिवशीच उपस्थित राहू न शकल्या ची घटना घडली आहे .या घटनेची दखल सर्वच प्रसारमाध्यमे आणि सैन्य दलाने घेत कोणत्याही सैनिकाचे  पहिले प्राधान्य हे त्याच्या देशाला ,कर्तव्याला असते व त्यानंतर त्याचे वैयक्तिक जीवन असते असे सांगण्यात आले आहे.

Loading...

मंडी येथील रहिवासी असलेल्या सुनील या सैन्यदलातील जवानांचे गुरुवारी लग्न होते.त्यासाठी सर्व कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण होते कारण सुनील च्या सुट्ट्या 1 जानेवारीपासून सुरू झाल्या होत्या व त्यानुसार तो बांदीपोर येथील ट्रान्झिट कॅम्प च्या ठिकाणी पोहचला होता. मोठ्या प्रमाणात होत असलेली बर्फवृष्टी थांबण्याचे नाव घेत नव्हती. या बर्फवृष्टीमुळे सर्व दळणवळणाची साधने बंद होती कोणत्याही प्रकारच्या वाहनांची रेलचेल या ठिकाणी नव्हती. मात्र वधू आणि वराच्या घरी लग्नाची सर्व तयारी  झाली होती.

Loading...

आता फक्त सर्वजण वाट पाहत होते ते सुनीलच्या येण्याची व लग्नाची वरात लडभडोल या वधूच्या गावी घेऊन जाण्याची. मात्र बर्फवृष्टीमुळे आपण लग्नासाठी येऊ शकत नाही असे जेव्हा सुनीलने दूरध्वनीवरून कळवले तेव्हा निश्चितच त्याच्या घरच्यांच्या उत्साहावर पाणी पसरले .मात्र दुसर्‍याच क्षणी आपला मुलगा आपले कर्तव्य इतक्या बिकट परिस्थिती असलेल्या भागांमध्ये निष्ठेने पार पाडत आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे अशी प्रतिक्रिया त्याच्या घरच्यांनी दिली.

Loading...