July 5, 2022

कामसूत्र ग्रंथ कोणी लिहिला जाणून घेऊया काही तथ्य

भारतीय संस्कृतीने प्रत्येक मनुष्याचे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम अशा निरनिराळ्या आश्रमां मधील अवस्थांचे सविस्तर वर्णन व कर्तव्य यांचे वर्णन प्राचीन ग्रंथात व साहित्यामध्ये केले आहे. यामधील काही ग्रंथ व साहित्य हे आजही समाजाला दिशा देणारे ठरतात. आजही काही ग्रंथांना संबंधित विषयातील प्रमाण असे मानले जाते व त्याचे मोठ्या प्रमाणात वाचनही केले जाते .अशाच काही ग्रंथांपैकी एक ग्रंथ म्हणजे वात्सायन द्वारा लिखित कामसूत्र हा ग्रंथ होय.कामसूत्र हा शब्द उच्चारताच बऱ्याचदा या ग्रंथामध्ये केवळ लैंगिक सुखाशी निगडित  ज्ञान व लैंगिक सुखाशी निगडित मुद्रा यांचा समावेश असेल असा गैरसमज निर्माण होतो .मात्र प्रत्यक्षात वात्सायन द्वारा लिखित कामसूत्र हा ग्रंथ लैंगिक सुख हा पाया ठेवून आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने सर्वच आश्रमांमध्ये मनुष्याने परिपूर्ण असा आनंद व समाधान कसे मिळवावे बद्दल भाष्य करतो.

Loading...

कामसूत्र हा.संस्कृत ग्रंथ प्राचीन काळामध्ये वात्सायन यांनी लिहिला होता. कामसूत्र हा ग्रंथ मुळात लैंगिक सुख आणि आयुष्यातील भावनिक समाधान यांच्याशी निगडित आहे.

Loading...

कामसूत्र हा ग्रंथ केवळ प्रणय सुखाशी निगडित किंवा कामक्रिडा बद्दल माहिती देणारा ग्रंथ नव्हता तर एकंदरीतच जीवन जगण्याची कला शिकवणारा ग्रंथ  आहे .यामध्ये प्रेमाचे स्वरूप, जोडीदार कसा निवडावा ,वैवाहिक आयुष्यातील लैंगिक आसक्ती कशी टिकून ठेवावी याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे .म्हणजे आयुष्यातील आनंद हा घटक या ग्रंथांमध्ये प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आला आहे.

Loading...

लैंगिक सुखा बद्दल बोलणे निषिद्ध मानले जाणाऱ्या भारतीय संस्कृतीतील सर्वात प्राचीन असा प्रणय सुखाबद्दल बोलणारा ग्रंथ म्हणजे कामसूत्र होय.

Loading...

कामसूत्र मध्ये पुरुषार्था मधील  इच्छा या घटकावर भर देण्यात आला आहे.विवाहापूर्वी कसे वागले पाहिजे म्हणजेच ब्रह्मचर्याचे पालन कसे केले पाहिजे ,त्यानंतर समाजामध्ये आपले स्थान नेहमी मजबुत कसे ठेवता येऊ शकते, लग्नाअगोदर होणाऱ्या जोडीदारासोबत कसा वेळ व्यक्त करावा इत्यादीबद्दल वर्णन करण्यात आले.आहे.

Loading...

कामसूत्र हा ग्रंथ भारतीय भाषा आणि परदेशी भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या स्वरूपात चौथ्या शतकानंतर भाषांतरित झाला. मध्यप्रदेश मधील खजुराहो येथील शिल्प सुद्धा कामसूत्र वर आधारित आहे. या शिल्पांना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये स्थान प्राप्त झाले आहे.

Loading...

कामसूत्र लिहिले गेल्याचा निश्चित काळ इतिहासकारांना ही सांगता आला नाही. मात्र इसवी सन पूर्व 400 मध्ये कामसूत्र लिहिले गेले असावे असे कामसूत्र मध्ये व्यक्त करण्यात आलेली सामाजिक नागरी पार्श्वभूमी वाचले असता लक्षात येते .कामसूत्र मध्ये गुप्त वंशाचा उल्लेख नाही त्यामुळे कामसूत्र हे गुप्त वंशाच्या अगोदर लिहिण्यात आले असावे असा कयास मांडला जातो.मात्र इतिहासकारांच्या मते वात्सायन म्हणजेच आचार्य चाणक्य यांचे प्रमुख शिष्य कामंदक होते.तर.काही ठिकाणी त्यांचा उल्लेख वात्सायन मल्लनाग असा करण्यात आला आहे.

Loading...

मूळ कामशास्त्र हे नाट्य शास्त्र प्रमाणे मांडण्यात आलेले आहे.यामधील प्रमुख पात्र हे एक नायक आणि नायिका असून त्यांच्या बरोबरीने अन्य पात्र सुद्धा आहेत व  यामध्ये निरनिराळ्या सूत्रांना या पात्रांच्या माध्यमातून समोर आणले जाते.

Loading...

संपूर्ण जगाला कामशास्त्राशी निगडित कामसूत्र ची ओळख करून देणारे वात्सायान हे स्वतः ब्रह्मचारी होते .ते एक महान ऋषी होते.त्यांनी कामसूत्र हे नागरवधू आणि वेश्यालयांमधील वेश्यांच्या मुद्रा आणि अनुभवांच्या आधारे लिहीले आहे.

Loading...

धर्म,अर्थ, काम ,मोक्ष या चार कर्तव्यां मधून जाणे-येणे प्रत्येक मनुष्याला क्रमप्राप्त असते.यापैकी काम ह्या जबाबदारीने आयुष्यातील आनंददायी क्षणांचा उपभोग घेता येऊ शकतो व त्याबद्दल मोकळेपणाने समाजामध्ये बोलले जावे हा सकारात्मक विचार रुजविण्यासाठी वा यांनी या ग्रंथाची निर्मिती केली

Loading...