May 23, 2022

विक्रम आणि वेताळ आठवते का? काय होते या कहाणीचे रहस्य? जाणून घ्या संपूर्ण माहिती

विक्रम आणि वेताळ 

साधारण ९०च्या दशकात , विक्रम-वेताळ किंवा सिंहासन -बत्तीशी नावाच्या मालिका tv  वर दाखविल्या जात आणि लहानांबरोबर मोठेही त्याला आवडीने बघत .  त्याला कारण होतं  , शूरवीर राजाला प्रश्न करणारा धूर्त वेताळ आणि तितक्याच बुद्धिचातुर्याने त्याला उत्तर देणारा राजा विक्रमादित्य आणि त्या दोघांमधील कथारूपातील संवाद !

Loading...

 तर मंडळी एका जगजेत्या  राजाने , झाडावर उलट्या लटकणाऱ्या वेताळाच्या मागे जाण्यात काय कारण असेल ? हा वेताळ नक्की कोण होता ? तर वेताळ पंचविशी ह्या साधारण २५ कथा आहेत ज्या साधारण २५०० वर्षांपूर्वी महाकवी सोमदेव भट्ट यांनी लिहिल्या होत्या. 

Loading...

हि कहाणी घडली होती , आजच्या मध्यप्रदेशातील उज्जैन गावात , फार पूर्वी तेथे विक्रमादित्य राजा राज्य करत होता. त्याच गावात एक अघोरी मांत्रिक राहत होता ज्याला ३२ लक्षणांनी युक्त ब्राह्मण  पुत्राला बळी देऊन अनेक अघोरी विद्यांना आत्मसात करायचं होतं , या सर्वांचा उपयोग तो अर्थातच लोकांचं वाईट करण्यासाठी करणार होता . जसं  ब्राह्मण पुत्राला त्याच्या या कुटील डावाबद्दल कळलं तसं तो वनात पळून गेला आणि त्याने एका प्रेताची मदत घेतली , या प्रेताने त्याला अनेक विद्या बहाल केल्या आणि एखाद्या वेताळाप्रमाणे झाडाला लटकून राहण्याचा सल्ला दिला . आता या शक्तींमुळे तांत्रिकाला त्या मुलापर्यंत  पोहोचता येईना . 

Loading...

यावर तांत्रिकाने युक्ती केली त्याने एका योग्यच वेष परिधान केला आणि विविध युक्त्या करून विक्रमादित्य राजाचं  मन जिंकून घेतलं . खुश राजाने त्याला हवं ते मागायला सांगितलं . यावर योग्याच्या वेशातील मांत्रिकाने त्याच्याकडे वेताळाची मागणी केली . 

Loading...

त्याला दिलेल्या वचनानुसार , राजा विक्रम वेताळाला पकडायला वनात गेला . वेताळाच्या लक्षात ही  गोष्ट आली परंतु तो राजाला मना करू शकत नव्हता म्हणून त्याने राजाबरोबर नगराकडे  जाताना त्याला एक कहाणी सांगायला सुरुवात केली , कहाणीच्या शेवटी तो राजासमोर अट  ठेवी की त्याने कहाणीनंतर विचारलेल्या प्रश्नाचं  योग्य उत्तर ना दिल्यास तो राजाला ठार करील आणि कहाणी संपण्याच्या आधी तोंड उघडल्यास तो परत झाडाला जाऊन लटकेल . आणि यात एक एक करून २४ कहाण्या त्याने राजाला ऐकवल्या आणि त्यानंतर मात्र त्याला राजाबरोबर मांत्रिकाकडे यावं लागलं . मांत्रिकाने आनंदाने प्रेताला उतरवून त्याला बळी  देण्याची तयारी केली आणि सरतेशेवटी राजाला देखील मान झुकवून प्रार्थना करण्याची विनंती केली. 

Loading...

राजाला अचानक वेताळाने सांगितलेली गोष्ट आठवली आणि त्याने म्हटले की  ” मी राजा असल्याने मी आधी मान झुकवणार नाही तेव्हा योग्याच्या रूपातील तांत्रिकाने आधी मान झुकवावी “. योग्याने तसेच केले आणि राजाने तलवारीने त्याची मान छाटली आणि ब्राह्मण पुत्राला मुक्त केले . या नंतर ब्राह्मण पुत्राने त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा राजाने ” त्याने सांगितलेल्या २४ आणि तांत्रिकाचा वध  अश्या , २५ कहाण्या अजरामर होऊन सर्व लोकांनी त्याचं  वाचन करावं त्याचा बोध घ्यावा “! वेताळाच्या रूपातील ब्राह्मणाने राजाला “तथास्तु ” म्हणून आशीर्वाद दिला आणि तो तेथून चालला गेला . 

Loading...

आज २५०० वर्षांपेक्षा जास्त होऊनही लोकं  या कहाण्या पाहतात, वाचतात आणि ऐकतात आणि आजच्या जगाला साजेलसा  बोध ही त्यातून घेतात , आणि हीच खरी श्रेष्ठता  आहे आपल्या प्राचीन साहित्याची !

Loading...