May 23, 2022

ओशो आश्रम आणि ओशोशी संबंधित काही माहित नसलेल्या असामान्य गोष्टी – भाग १

सध्याच्या ताण-तणावाच्या आयुष्यामध्ये मनःशांतीसाठी अध्यात्मिक मार्गाकडे झुकण्याचा अनेकांचा कल दिसून येतो . या अध्यात्मिक मार्गांमध्ये अनेक विविध प्रकारची तत्वप्रणाली सध्याच्या काळामध्ये  अवतरली आहे असे दिसून येते. अध्यात्मिक गुरुजींचे अनेक अनुयायी आपल्याला जागोजागी दिसून येतात. हे अनुयायी आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागतांना दिसून येतात.

Loading...

अशाच अध्यात्मिक गुरु बद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्यांनी मनःशांतीसाठी व तणाव घालवण्यासाठी कोणतेही बंधन न पाळता मानसिक ध्यानधारणेसोबतच  शारीरिक सुख सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे हे आपल्या तत्वज्ञानाच्या विचारां मधून आवर्जून सांगितले व ही तत्त्वप्रणाली देश विदेशामध्ये रुजवण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी आपल्या आश्रमांच्या शाखा सुद्धा उघडल्या .आज सुद्धा या अध्यात्मिक मार्गावरून अनेक अनुयायी चालत असल्याचे आपल्याला दिसून येते .हा अध्यात्मिक संप्रदाय म्हणजे ओशो हे अध्यात्मिक गुरु अर्थात रजनीश किंवा भगवान.रजनीश होय. आज आपण भगवान रजनीश किंवा ओशो व त्यांच्या तत्त्वज्ञानाबद्दल काही तथ्य जाणून घेणार आहोत

Loading...

ओशोंचे संपूर्ण आयुष्य हे अत्यंत रोमांचक पर्व होते। त्यांचे शिष्य त्यांना धर्मचक्र प्रवर्तक गौतम बुद्धांचा संदेश पसरवण्यासाठी धरतीवर घेतलेला अवतार मानतात.

Loading...

ओशो यांचा जन्म 11 डिसेंबर 1931 रोजी त्यांच्या आजोळी  मध्य प्रदेशात झाला. सात वर्ष ओशो आपल्या आई-वडीलांसोबत न राहता आजी-आजोबांच्या सानिध्य मध्ये होते कारण सात भावंडांपैकी सर्वात मोठे होते.त्यांच्या आजोबांनी लाडाने त्यांचे नाव राजा असे ठेवले होते. 1938 आली त्यांच्या आजोबांचे निधन झाल्यानंतर आपल्या आई-वडिलांसोबत ओशो राहायला आले .शालेय शिक्षण सुरू झाल्यावर ओशो यांचे नाव शाळेमध्ये रजनीश  चंद्रमोहन जैन असे दाखल करण्यात आले.रजनीश यांच्या ज्ञान तेजाने प्रभावित होऊन पुढे त्यांचे वडील देव तीर्थ भारती आणि आईअमृत सरस्वती यांनी सुद्धा त्यांचे शिष्यत्व स्वीकारले होते.

Loading...

शालेय जीवनामध्ये ओघवते वक्त्रृत्व, विद्रोही स्वभाव, कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तम संभाषण कौशल्य यामुळे रजनीश विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांमध्येही आकर्षणाचे केंद्र होते. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी रजनीश यांना आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला असे मानले जाते. जबलपूर येथील भंवरताल मध्ये वृक्षाच्या खाली बसले असतांना त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले असे त्यांचे अनुयायी सांगतात.

Loading...

रजनीशांनी तत्वज्ञान शास्त्रांमध्ये एम ए केले होते. 1958 ते 1966 सालापर्यंत रजनीश जबलपुर विश्व विद्यालयांमध्ये तत्वज्ञान शास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते .यादरम्यान त्यांनी संपुर्ण देशभर ध्यानधारणेचे संदर्भातील एक दिवसीय शिबिरे आयोजित केली होती. दैनंदिन आयुष्याशी निगडीत निरनिराळ्या पैलूंवर एक क्रांतिकारी विचारसरणी निर्माण करणाऱ्या रजनीश यांची ख्याती आचार्य रजनीश म्हणून निर्माण झाली.

Loading...

1970 साली रजनीश यांना भगवान श्री रजनीश ही नवीन ओळख खऱ्या अर्थाने प्राप्त झाली. 1970 झाली मुंबईत आल्यानंतर रजनीश हे भगवान श्री रजनीश म्हणून संपूर्ण विश्वभर प्रसिद्ध झाले.

Loading...

सप्टेंबर 1970 हा रजनीश यांच्या आयुष्यातील अत्यंत क्रांतिकारी दिवस आहे .या दिवसापासूनच मनाली येथे त्यांनी नव संन्यासदीक्षा देण्यास प्रारंभ केला.नव संन्यासदीक्षा ही इतक्या प्रचंड वेगाने पसरली की हजारोंच्या संख्येने अनुयायी आपल्या रोजच्या व्यवसाय ,नोकऱ्या ,संसार न सोडता वस्त्रे ,भगवी  माळा परिधान करून ध्यान साधनेमध्ये खऱ्या अर्थाने उत्क्रांती करण्यासाठी एक नवीन परिभाषा बनवली.

Loading...

1971 साली भगवान रजनीश पुण्यातील ओशो आश्रम मध्ये वास्तव्यास आले व जवळपास सात  वर्षे याठिकाणी ओशोंनी इंग्लिश आणि हिंदी मध्ये निरनिराळी तत्वज्ञान विषयक प्रवचने दिली. योग,भक्ती, झेन , या निरनिराळ्या विचारधारांच्या सोबतच गौतम बुद्ध, कबीर, मीराबाई यांच्या शिकवणुकीतून उलगडणारे विश्लेषण भगवान रजनीश यांनी आपल्या भक्तांचा समोर मांडले.

Loading...

भगवान रजनीश यांच्या अमृत प्रवचनांचे ऑडिओ व्हिडिओंची संख्या तब्बल सहा हजार च्या घरात आहे .तर 650 पुस्तका यांच्या स्वरूपात त्यांची शिकवण आजही उपलब्ध आहे. विश्वभरात प्रसिद्ध असलेल्या रजनीश यांच्या साहित्याचा अनुवाद देशभरातील तब्बल 50 भाषांमध्ये करण्यात आलेला आहे.

Loading...

ओशो आश्रम आणि ओशोशी संबंधित काही माहित नसलेल्या असामान्य गोष्टी – भाग २ वाचण्यासाठी इथे क्लिक करा