May 23, 2022

जाणून घ्या द्रौपदीची काही अगम्य रहस्य. जे सामान्य लोकांपर्यंत आलेच नाहीत

महाभारत काळामध्ये घडलेल्या राजकीय धार्मिक व सामाजिक उहापोहा मध्ये स्त्रियांचा मोठा वाटा होता असे तत्कालीन साहित्यामध्ये आढळून येते. आतापर्यंतच्या सर्वात विनाशकारी युद्ध म्हणून गाजलेल्या महाभारताच्या युद्धात अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरवण्यात आलेली एक स्त्री होती.ती स्त्री म्हणजेच द्रौपदी होय. पाच पांडवांची पत्नी असलेल्या द्रौपदीचा महाभारतामधील वावर हा एक प्रकारचे रहस्य होता. द्रौपदीची संपूर्ण जीवन कथा ही एक विस्मयकारी प्रवास आहे .आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कोणत्याही स्त्रीच्या जन्म, वैवाहिक आयुष्य व मृत्यू यामध्ये  द्रौपदी इतका वेगळेपणा आढळून येत नाही .द्रौपदी बद्दलच्या अशाच काही गोष्टीआज आपण जाणून घेणार आहोत.

Loading...

द्रौपदी ही पांचाल देशाच्या राजा द्रुपद यांची कन्या होती .द्रौपदीचा जन्म हा अग्निकुंडात एका तरुणीच्या रूपात झाला होता. राजाने कठीण तपश्चर्या करून कौरव-पांडवांचे आचार्य दोणाचार्य यांच्याकडून आपल्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी द्रौपदीला मागून घेतले होते .द्रौपदीचा जन्म मुळातच कुरुवंश याच्या समूळ विनाशासाठी झाला होता. यासंबंधीची आख्यायिका अशी सांगितली जाते की राजा द्रुपद आणि द्रोणाचार्य हे बालपणी अध्ययनासाठी एकाच आश्रमात होते .द्रोणाचार्य हे अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते व राजा द्रुपदाला त्यांनी त्यावेळी अध्यायाना मध्ये खूप सहाय्य केले होते. या दोघांची अत्यंत घनिष्ठ मैत्री होती. अध्ययन पूर्ण केल्यानंतर जेव्हा आपापल्या घरी परतण्याची वेळ आली तेव्हा राजाने द्रोणाचार्यांना आयुष्यात कधीही मदतीची गरज लागली तरी आपल्याकडे निःसंकोचपणे यावे असे सांगितले.

Loading...

गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर द्रुपद राजा हा एक विलासी आयुष्य जगत होता तर द्रोणाचार्य याच्या उलट अत्यंत गरिबीचे आयुष्य जगत होते. एकदा त्यांच्या पुत्रास अश्वत्थाम्यास त्याच्या मित्रांनी गरिबी वरून हिणवले. यामुळे द्रोणाचार्य मदतीसाठी द्रुपद राजाच्या दरबारात गेले.त्यावेळी सत्ता संपत्तीच्या अहंकाराने घेरलेल्या द्रुपद राजाने त्यांच्यावर दरबारामध्ये एक राजा आणि रंक कसे मित्र असू शकतात असे सुनावून अपमान केला .त्यावेळी द्रोणाचार्यांनी आपण द्रुपदा चे राज्य हिरावून घेऊन झालेल्या अपमानाचा बदला नक्कीच घेऊ अशी प्रतिज्ञा केली होती .त्त्या प्रतिज्ञे नुसार द्रोणाचार्रयांनी कौरव-पांडव यांना युद्धविद्या शिकवण्यास सुरुवात केली .

Loading...

तेव्हा अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनवले.ज्यावेळी कौरव-पांडवांचे अध्ययन पूर्ण झाले तेव्हा गुरुदक्षिणे च्या बदल्यात त्यांनी द्रुपदाला जिवंत बंदी करून आपल्या समोर आणावे अशी मागणी केली. गुरूच्या ह्या मागणीला पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम कौरवांनी द्रुपदाच्या राज्यावरती आक्रमण केले. मात्र त्यांना अपयश आले .त्यानंतर भीम आणि अर्जुन यांनी आक्रमण केले व द्रुपद राजाला जिवंत बंदी करून द्रोणाचार्यांच्या समोर हजर केले त्यावेळी द्रोणाचार्यांनी द्रुपदाचे अर्धे राज्य स्वतःला घेऊन अर्धे राज्य त्याला परत केले व या स्वतःला घेतलेल्या राज्याची जबाबदारी अश्वत्थाम्याला दिली .या पराभवामुळे द्रुपद राजाच्या मनात अपमानाची भावना निर्माण झाली व या अपमानाचा बदला घेऊन कुरू वंशाचा समूळ नायनाट करण्यासाठी त्याने एक यज्ञ केला. या यज्ञात द्रौपदीची निर्मिती झाली.

Loading...

द्रौपदी ही पंचकन्या होती.सीता, तारा ,मंदोदरी अहिल्या व द्रौपदी या पंचकन्या मानल्या जात असत. पंचकन्या म्हणजे ज्यांना कौमार्याचा आशीर्वाद लाभलेला आहे अशी कन्या होय.द्रौपदीला कौमार्याचा वर कसा लाभला यामागेही एक अख्यायिका आहे. द्रौपदी ही पूर्वजन्मामध्ये महाराजा नल आणि राणी दमयंती यांची कन्या न्लयनी होती.नलयनीने भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या केली या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला इच्छित वर मागण्यास सांगितले. तेव्हा नलयनीने पुढील जन्मी आपल्याला 14 गुणांनी युक्त असा पती लाभावा हा वर मागितला .14 गुण हे एकाच व्यक्तीमध्ये असणे निश्चितच शक्य नाही त्यामुळे भगवान शंकरांनी तिला पुढील जन्मी जास्तीत जास्त 14 पती करू शकणे आणि इच्छित वेळी कौमार्य प्राप्त करणे हे दोन वर दिले. व या आशीर्वादामुळे पुढील जन्मी तिला 14 गुणांचा संगम असलेले पाचपांडव पतीच्या रूपात मिळाले व रोज प्रातःसमयी स्नानानंतर द्रौपदीला तिचे कोमार्य पुन्हा प्राप्त होत असे.

Loading...

द्रौपदीला पांडवांपासून पाच पुत्र लाभले होते.  यांपैकी युधिष्ठिरा कडून लाभलेल्या पुत्राचे नाव होते प्रतिविंध्य, तर भीमा च्या पुत्राचे नाव  सुतसोम अर्जुनाच्या पुत्राचे नाव श्रुतकर्म, नकुलाच्या पुत्राचे नाव शतनिक,आणि सहदेवाच्या पुत्राचे नाव श्रुतसेन होते. महाभारताच्या कौरव-पांडवांचे युद्धाच्यावेळी अश्वत्थाम्याने द्रौपदीच्या या पाचही पुत्रांना झोपेत असताना मारून टाकले होते.

Loading...

दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यांमध्ये द्रौपदीला महाकालीचा अवतार मानले जाते व तिचे द्रोपदी अम्मम म्हणून पूजन केले जाते. चित्तूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी द्रोपदी अम्मांचा उत्सव साजरा केला जातो. भारताप्रमाणेच प्रमाणेच दक्षिण आफ्रिका, मलेशिया, मॉरिशस या ठिकाणीही द्रोपदीचे भक्त आहेत.

Loading...

द्रौपदीला स्वयंवरा मध्ये अर्जुनाने जिंकले होते मात्र तिला परिस्थितीमुळे पाच पांडवांची पत्नी म्हणून स्थान मिळाले. अर्जुनाला ही गोष्ट फारशी रुचली नव्हती .द्रौपदीचे मात्र अर्जुनावर पांडवांमध्ये सर्वात जास्त प्रेम होते आणि  पाचही पांडव पैकी भिमाचे द्रौपदी वर सर्वात जास्त प्रेम होते व ते त्याने निरनिराळ्या प्रकारे वेळोवेळी व्यक्तही केले होते.

Loading...

द्रौपदीचे वस्त्रहरण कौरवांनी केले असले तरीही विकर्ण आणि युयुत्सु या दोन कौरवांनी द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी विरोधही केला होता .युयुत्सुला सर्वात हुशार कौरव मानले जात होते व त्यांनी कौरव-पांडवांचे युद्ध मध्ये शेवटी पांडवांच्या बाजूने कौरवांविरुद्ध युद्ध लढले होते.

Loading...