May 23, 2022

अबब! शाकुंतल एक्सप्रेस चालवण्यासाठी आजही भारत सरकारला द्यावेलागतात इंग्रजांना पैसे

ब्रिटिशांच्या गुलामगिरीविरुद्ध भारतीयांनी दिलेला स्वातंत्र्यलढा हा जगाच्या इतिहासातील लढल्या गेलेल्या अनेक क्रांतिकारक व महान अशा लढ्यांपैकी एक आहे. ब्रिटिशांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीने दळणवळणाची साधने आणि व्यापार यांच्यावरती कब्जा करून भारतामध्ये विखुरलेल्या अनेक छोट्या मोठ्या राज्यांचे आर्थिक खच्चीकरण केले व कोणत्याही सत्तेची चावी मानल्या गेलेल्या अर्थव्यवस्था या घटकावर आपली पकड बसवून वसाहत वादाची मुळे आणखीनच घट्ट रोवली. अर्थव्यवस्थेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भारतामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला कच्चामाल इंग्लंडमध्ये नेऊन त्यावर प्रक्रिया करून पक्क्या मालाला दामदुपटीने विकून मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याचे सूत्र ब्रिटिशांनी अवलंबले होते.

Loading...

भारतामधील कच्चा माल इंग्लंडमध्ये नेण्यासाठी इंग्रजांनी पारंपारिक जलमार्ग आणि रस्ते वाहतुकीसोबतच भारतामध्ये रेल्वेचाही वापर सुरू केला होता. ब्रिटिशांच्या काळातच भारतामध्ये पहिली आगगाडी धावली.वसाहतवादाचे प्रणेते व अत्यंत धूर्त असे शासक म्हणून ओळखले जाणा-या ब्रिटिशांनी दूरदृष्टीने कोणत्याही देशावर आपली पकड घट्ट बसवण्यासाठी दळणवळणाच्या साधनांवर आपला अधिकार असला पाहिजे हे खूप अगोदरच जाणून घेतले होते म्हणूनच व्यापारी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी भारतावर सहजगत्या राज्य केले .ब्रिटिशांनी मुख्यत्वे आपल्या व्यापारी गरजांसाठी भारतामध्ये रेल्वे वाहतूक सुरू केली व नंतर या रेल्वेचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी ही करण्यात आला .

Loading...

1947 आली ब्रिटीशांच्या गुलामगिरीच्या जोखडातून भारतीयांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिशांच्या ताब्यातील सर्व सरकारी यंत्रणा या आपोआपच भारतीय शासनाच्या ताब्यात कायदेशीररित्या आल्या. यामध्ये अर्थातच वाहतूक व्यवस्थेचाही समावेश होता. त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या अखत्यारीत असलेले जलमार्ग ,रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक ही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय शासनाच्या नियमांखाली आली .मात्र आज भारताला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे पूर्ण झाली तरीही एक रेल्वे मात्र अजूनही भारत सरकारच्या अखत्या रीत न येता ब्रिटनमधील एका खाजगी कंपनीच्या नियंत्रणाखाली  आहे हे ऐकून निश्चितच नवल वाटेल .मात्र अशीच एक भारतीय हद्दीमध्ये निर्माण करण्यात आलेली ब्रिटीशकालीन रेल्वेलाईन शाकुंतल आजही ब्रिटिशांच्या ताब्यात असून त्याच्या देखभालीसाठीचा तब्बल एक कोटी रुपये खर्च ह्या ब्रिटिश कंपनीला दिला जातो.

Loading...

शाकुंतल रेल्वे लाईन ही महाराष्ट्रातील यवतमाळ ते मुर्तीजापूर या मार्गावर 190 किलोमीटरच्या अरुंद पल्ल्याच्या मार्गावर धावणारी रेल्वेलाईन आहे.शाकुंतल रेल्वे लाईन वर धावणारी शाकुंतल एक्सप्रेस ही पॅसेंजर गाडी आहे .यवतमाळ हुन अचलपूर मार्गे सर्वसाधारणपणे चार तासांमध्ये शाकुंतल एक्सप्रेस मुर्तीजापुर ला पोहोचते.

Loading...

ब्रिटिशांच्या काळामध्ये किलिक निक्सन या खाजगी ब्रिटीश कंपनीने तत्कालीन ब्रिटिश राज सोबत करार करून शाकुंतल रेल्वे लाईन बनवली.त्यावेळेस शाकुंतल.रेल्वे लाईन ही ग्रेट  इंडियन पेनिन्सुला रेल्वे द्वारे चालवली जात असे.

Loading...

शाकुंतल एक्सप्रेसची  निर्मिती ही मुख्यत्वे विदर्भातील कापूस हा कच्चामाल म्हणून मुंबईच्या बंदरांमध्ये नेण्यासाठी करण्यात आली होती.ब्रिटिशांचे राज्य असेपर्यंत शाकुंतल एक्स्प्रेसच्या मालवाहू डब्यांमध्ये कापूस हा  मुंबईपर्यंत नेला जात असे व तिथून तो इंग्लंडला जाणाऱ्या जहाजांवर चढवला जात असे.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र शाकुंतल एक्सप्रेस ही प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जाऊ लागली. या अरुंद रेल्वे लाईनवर  अजूनही ब्रिटिशकालीन डबे ,इंजिन असलेल्या पॅसेंजर रेल्वे चा उपयोग हा मुख्यत्वे गोरगरीब जनतेसाठी होतो .कारण या रेल्वेचे तिकीट हे रस्ते वाहतूक आणि अन्य रेल्वेच्या तिकिटाच्या दरापेक्षा तुलनेने कमी आहे.

Loading...

शाकुंतल रेल्वे लाईन वर धावणाऱ्या शाकुंतल एक्सप्रेस या रेल्वेचे मूळ इंजिन हे वाफेवर चालणारे होते व याची निर्मिती करण्यात मँचेस्टरमध्ये करण्यात आली होती. मात्र  1994 साली मुळ इंजिन बदलण्यात आले व आता ते डिझेल इंजिनवर कार्य करते.

Loading...

1951 साली जेव्हा ब्रिटिशांच्या ताब्यातील रेल्वेमार्ग हे भारतीय केंद्र सरकारच्या नियंत्रणात आणण्यात आले तेव्हा शाकुंतल रेल्वेलाईन ही भारतीय केंद्र सरकारच्या ताब्यात घेण्यात आली नाही व त्यामुळे आजही सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी शाकुंतल एक्स्प्रेसच्या देखभालीचे काम करते व या बदल्यामध्ये भारत सरकार या कंपनीला एक कोटी रुपये दरवर्षी देते।

Loading...

प्रति वर्षी एक कोटी रुपये भारत सरकार शाकुंतल रेल्वेलाईन च्या देखभालीसाठी देत असूनही सेंट्रल प्रॉव्हिन्स.रेल्वे कंपनी शाकुंतल रेल्वे लाईनच्या नूतनीकरणासाठी किंवा अधिक सोयीसुविधांसाठी कोणतेही कष्ट घेत नाही असे दिसून येते .आजही केवळ सात लोकांचा स्टाफ शाकुंतल एक्सप्रेस धावण्यासाठी अविरत झटत असतो .याठिकाणी तिकीट विकण्यापासून ते रेल्वेला सिग्नल दाखवणे, वाहतुकीचे डबे एकमेकांना जोडणे या सारखी सर्व कामे येथील हा अपुरा स्टाफ प्रत्यक्ष हातांनी करत असतो.

Loading...

शाकुंतल रेल्वे लाईन वरील शाकुंतल एक्सप्रेस रेल्वे दिवसभरात केवळ एकच फेरी पूर्ण करू शकते.

Loading...