July 5, 2022

जाणून घ्या, श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे वंशज आता नेमके कुठे आहेत व काय करतात आहेत?

सोने की चिडिया म्हणून वर्णन केल्या गेलेल्या भारताच्या सुजलाम सुफलाम भूमीवर कब्जा मिळवण्याची लालसा मनात धरून भारताकडे कूच केलेल्या अनेक परकीय आक्रमणांना धूळ चा खवून त्यांचे पानिपत केलेल्या पेशव्यांची इतिहासातील नोंद हे अनेक शूर वीर ,पराक्रमी योद्ध्यांची शौर्यगाथा आहे.

Loading...

इतिहासाच्या पानांवर एक महत्त्वाचे घराणे म्हणून वर्णन केलेल्या पेशव्यांचे वंशज आता नेमके कुठे आहेत व काय करतात हे आपण जाणून घेणे उत्कंठावर्धक ठरणार आहे. श्रीमंत बाजीराव पेशव्यांना त्यांच्या पत्नी काशीबाई आणि त्यांचे अंगवस्त्र म्हणून हिणवल्या गेलेल्या मस्तानी या दोघीं पासून अपत्यप्राप्ती झाली होती.

Loading...

काशी बाईंच्या पुत्राचे नाव नानासाहेब पेशवे होते तर मस्तानी यांना श्रीमंत बाजीराव पेशवे यापासून कृष्णराव यांची प्राप्ती झाली .तत्कालीन कर्मठ धार्मिक व्यवस्थेने मस्तानी बाईंच्या पुत्राला हिंदू धर्मामध्ये सामावून घेण्यास कट्टर विरोध केला त्यामुळे त्यांचे नामकरण कृष्णराव पासून समशेर बहादूर असे करण्यात आले.

Loading...

समशेर बहादूर यांना पेशव्यांचा वारस म्हणून कोणतेही अधिकृत अधिकार व हक्क देण्यास सर्व धार्मिक अंगांनी विरोध करण्यात आला मात्र तरीही या विरोधाला झुगारून नानासाहेब पेशवे यांनी समशेर बहादूर यांना शेवटपर्यंत त्यांचे अधिकार दिले.

Loading...

समशेर बहाद्दर यांचा 1749 साली पेठ संस्थांच्या लाल कुवर बाई यांच्यासोबत विवाह संपन्न झाला.1753साली विधीलिखित काहीतरी वेगळेच होते व लाल कुवर बाई यांचा मृत्यू ओढवला. 1753 सालीच त्यांचा विवाह मुस्लिम घराण्यातील मेहर बाई यांच्याशी लावून देण्यात आला. मेहेर बाईपासून समशेर बहादूर यांना कृष्ण सिंग यांची प्राप्ती झाली .

Loading...

कृष्ण सिंग यांचे नंतर नामकरण अली बहादूर असे करण्यात आले .समशेर बहादूर यांचा पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये लढताना जखमी होऊन मृत्यू झाला. 1761 नंतर पेशव्यांच्या मार्गदर्शनाखाली अलीबहाद्दूर यांनी बुंदेलखंड येथील बांदा मध्ये पेशव्यांची गादी चालवली .अलीबहाद्दूर व त्यांच्या वंशजांना बांधाचे नवाब म्हणून ओळखले जाते.

Loading...

राणी लक्ष्मीबाई सोबत पेशव्यांच्या विरुद्ध लढताना पराभव पत्करल्यानंतर ब्रिटिशांनी बांदा संस्थान खालसा केले त्यानंतर आजही अलीबहादर यांचे वंशज शादाब आली बहादुर हे मध्यप्रदेश मधील सीहोर येथे अत्यंत साधेपणाने आपले आयुष्य व्यतीत करत आहेत.

Loading...

पेशव्यांच्या गादीचा शेवटचा थेट वारसदार म्हणजे रघुनाथरावांचे अपत्य बाजीराव दुसरे होत. त्याचबरोबर रघुनाथरावांनी अमृतराव आणि चिमजीराव दुसरे या दोन मुलांनाही दत्तक घेतले होते. पेशवाई खालसा केल्यानंतर इंग्रजांनी बाजीराव दुसरे यांना उत्तर प्रदेशातील बिठूर येथे हलवले. बाजीराव दुसरे यांना स्वतःची संतती प्राप्त झाली नव्हती त्यामुळे आपला वंशज म्हणून त्यांनी धोंडोपंत भट यास अठराशे सत्तावीस साली दत्तक घेतले.

Loading...

धोंडोपंत हे माधवराव व नारायणराव भट यांचे पुत्र होते. धोंडोपंत यांचे नामकरण बाजीराव दुसरे यांनी नानासाहेब असे केले. इंग्रजांनी बाजीराव दुसरे यांचे दत्तकपुत्र नानासाहेब यांना पेशव्यांचे अधिकृत वंशज मानण्यास नकार दिला. इंग्रजांच्या विरोधात बंड करून उठलेल्या निरनिराळ्या संस्थानांच्या बरोबरीने नानासाहेबांनी ही 1857 च्या उठावात भाग घेतला होता. नानासाहेबांना स्वतःचे अपत्य नव्हते म्हणूनच पेशवाईची सद्दी संपल्यानंतर पेशव्यांच्या वंशावळीची नोंदही थांबली.

Loading...

पेशव्यांच्या हिंदू वंशावळीचे सध्याचे थेट वंशज म्हणजे रघुनाथरावांच्या दत्तकपुत्र अमृत रावांचे थेट वंशज होत. त्यांचे नाव महेंद्र कृष्णाजी पेशवा असून ते पुण्यात वास्तव्यास आहेत आणि पेशाने अभियंता क्षेत्रात आपली सेवा देत आहेत.

Loading...