December 1, 2021
वडील हिंदू असूनही मस्तानीला मुस्लिम का मानले जाते हे जाणून घेऊया

वडील हिंदू असूनही मस्तानीला मुस्लिम का मानले जाते हे जाणून घेऊया

मराठ्यांच्या इतिहासात आणि विशेषतः पेशव्यांच्या काळात एका व्यक्तिमत्त्वाशी निगडित निरनिराळ्या दंतकथांनी सगळ्यांना भारावून टाकले आहे. हे व्यक्तिमत्व म्हणजे आरस्पानी सौंदर्य, युद्धकलेत प्रावीण्य, तल्लख बुद्धिमत्ता ,नृत्य आणि गायनामध्ये निपुण, राज्यकारभारा बद्दलचे अचूक ज्ञान या सर्वांचा संगम असे वर्णन असलेल्या मस्तानी बाई होय. मस्तानी बाई यांची ओळख इतिहासात बाजीराव पेशव्यांचे अंगवस्त्र अशी करून दिली जाते कारण बाजीराव मस्तानी यांचा विवाह हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे होऊ शकत नव्हता.  मस्तानी बाई ह्या मुस्लिम धर्मीय होत्या. मस्तानी यांचे वडील हे हिंदू होते आणि आई मुस्लिम होत्या. मात्र वडील हिंदू असूनही मस्तानी बाईंना मुस्लीम का मानले जाते हा प्रश्न येथे नक्कीच उपस्थित होऊ शकतो .म्हणून आज आपण मस्तानी बाईंच्या इतिहासाविषयी काही गोष्टी जाणून घेऊयाः

Loading...

मस्तानी बाईंचा जन्म हा राजपूत महाराजा छत्रसाल आणि त्यांची पत्नी रूहानी बाई बेगम यांच्या पोटी झाला. मस्तानी बाई आणि महाराजा छत्रसाल हे प्रणामी संप्रदाय या भगवान श्रीकृष्णाच्या भक्ती पंथाची पूजा करत असत.

Loading...

1729साली मोहम्मद खान बंगशने महाराजा छत्रसाल यांच्या राज्यावर हल्ला केला तेव्हा बाजीराव पेशव्यांनी मोहम्मद खान बंगशला धडा शिकवून रजपूतांचे राज्य प्रस्थापित केले. यानंतर राजा छत्रसाल यांनी आपली मुलगी मस्तानी हिच्याशी बाजीराव पेशव्यांचा विवाह करून दिला व त्यांना मोहम्मद खान बंगशचा हल्ला परतवून लावण्याच्या बदलात मोठ्या प्रमाणात सोने व अन्य संपत्ती देऊ केले. त्यावेळी बाजीराव पेशव्यांचा विवाह झालेला होता त्यामुळे एकपत्नीत्वाची पद्धत आणि कुटुंबातील कर्मठ वातावरणामुळे इच्छा नसतानाही राजा छत्रसाल यांच्या इच्छेला मान देऊन बाजीराव पेशव्यांनी मस्तानी सोबत विवाह केला.

Loading...

मस्तानी  पुण्यात आल्यानंतर बाजीराव पेशवे यांच्या कुटुंबीयांनी व तत्कालीन हिंदू धर्मव्यवस्थेने बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या विवाहाला स्वीकारले नाही  कारण मस्तानी या मुस्लिम धर्मीय होत्या त्याकाळी दोन भिन्न धर्मीय व्यक्तींचा विवाह समाजामध्ये मान्य नव्हता.

Loading...

तत्कालीन धार्मिक व सामाजिक व्यवस्थेमुळे दोन भिन्न धर्मीय व्यक्तीचा विवाह मानला जात नसे त्यामुळे मस्तानी बाईंचे वडील हिंदू आणि आई मुस्लिम असले तरी  त्यांच्या आईला धर्माने मुस्लिम धर्मीय मानले जात होते परिणामी मस्तानी यांनाही मुसलमानच समजले जात होते.

Loading...