May 23, 2022

छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर मराठा साम्राज्याद्वारे त्यांना सोडवण्याचे प्रयत्न का केला नाही ?

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा अशा ओळी ज्या काळामध्ये तत्कालीन महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी लिहिल्या गेल्या त्या काळामध्ये सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामधून स्वराज्याचे स्फुल्लिंग जागृत करून मावळ्यांची काटक फळी उभारणाऱ्या शिवरायांच्या वारसदार आणि सरदारांमध्ये स्वराज्याशी आपले इमान राखताना प्राणांची बाजी लावण्याचे धडे आपोआपच रुजवले गेले होते .छत्रपती शिवरायांचे वारसदार संभाजी महाराज हेसुद्धा आपल्या रक्तामध्ये स्वराज्य आणि शौर्याचे बीज घेऊन जन्मास आले होते .ते.वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी छत्रपती शिवरायांसोबत आग्र्याहून चलाखीने  निसटले होते .औरंगजेबाने कपटाचा आधार घेत कैदेत ठेवलेल्या छत्रपती शिवराय व संभाजींनी मिठाईच्या पेटार्‍यातून मधून निसटून औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या होत्या तेव्हापासून औरंगजेब संपूर्ण मराठा साम्राज्य काबीज करण्याचे मनसुबे आखत होता. छत्रपती शिवरायांच्या अवघ्या 50 व्या वर्षी झालेल्या मृत्यूनंतर छत्रपती शिवरायांचे वारसदार म्हणून संभाजी महाराज गादीवर स्थानापन्न झाले. 

Loading...

छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला पळता भुई थोडी केली होती .संभाजी महाराजांनी औरंगजेबाला एकही दुर्ग हाती लागू दिला नव्हता .त्यामुळे औरंगजेब द्वेषाच्या आगीत जणू होरपळून निघत होता. म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांना पकडून आणल्याशिवाय आपल्याला चैन मिळणार नाही असे त्याने त्याच्या सैन्याला बजावून सांगितले होते.त्यादृष्टीने त्याने मराठा सरदारांमध्ये फोडाफोडीचे राजकारणही सुरू केले.  

Loading...

वाईच्या युद्धामध्ये 1687 साली मराठ्यांची ताकद मुगल साम्राज्य पुढे कमी पडू लागली व यामध्ये भर म्हणून हंबीराव मोहिते या सरदाराचा शर्थीने लढताना मृत्यू झाला. यामुळे मराठ्यांच्या अडचणींमध्ये अधिकच भर पडली .1689 साली संगमेश्वरच्या जवळ मुकर्रबखान या मुघल सरदाराने संभाजी महाराज व त्यांच्या 25 सहकाऱ्यांना कैदेत घेतले यामागे छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुणे असलेल्या शिर्के घराण्याने केलेली फितुरी हे प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. आपल्या आयुष्यामध्ये अगदी निधड्या छातीने मुघल साम्राज्याला सामोरे जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबाच्या कैदेत असताना चा काळ हा कोणत्याही स्वराज्य प्रिय, संवेदनशील वाचकासाठी अत्यंत हृदयद्रावक असा आहे.

Loading...

छत्रपती संभाजीराजांना कैद केल्याचे कळताच त्यांना साखळदंडांनी मध्ये पकडून ठेवलेले बघण्यासाठी औरंगजेब जणू वेडापिसा झाला होता. छत्रपती संभाजी महाराजांची करारी नजर ही समोरच्याला कित्येक पावले मागे जाण्यास भाग पाडत असे असे सांगितले जाते त्यामुळेच कदाचित जेव्हा औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना कारागृहात भेटायला गेला तेव्हा तो जवळपास दहा फूट लांब उभा राहिला व त्याने संभाजी महाराजांना त्यांचे सर्व दुर्ग किल्ले व मराठा साम्राज्य आपल्या नावावर करून देण्यास सांगितले तसेच इस्लाम धर्माचा स्वीकार करण्यासही सांगितले. जीव गेला तरी ही बेहत्तर आपण इस्लाम धर्माचा स्वीकार करणार नाही किंवा मराठा साम्राज्याची एक इंचभर जागाही मुघल साम्राज्याला जिंकू देणार नाही अशी डरकाळी संभाजीराजांनी दिली. यामुळे डिवचले गेलेल्या औरंगजेबाने संभाजी राजांची व कवी कलश ची जीभ छाटण्याचे आदेश दिले व एक दिवस आपल्या प्राणांची भीक संभाजी महाराज नक्कीच मागतील असे त्याने म्हटले. त्यानंतर खऱ्या अर्थाने एका स्वाभिमानी योद्ध्याच्या देहाची विटंबना करणे सुरू झाले. 

Loading...

संभाजी महाराज व कवी कलश यांचे हात छाटले गेले ,देहा वरील त्वचा सोलून काढली गेली, नखे उपसून काढण्यात आली ,लोखंडाच्या तप्त सळईने डोळे उपसून काढण्यात आले सर्व प्रकारचे हाल करून झाल्यानंतर मग शेवटी त्यांचे शीर धडावेगळे करण्यात आले. प्राण निघून गेलेल्या निश्चल देहाचे तुकडे तुकडे करून ते नदीमध्ये फेकून देण्यात आले असे सांगण्यात येते तिळतिळ करून अत्यंत वेदनादायी मरण यातना अनुभवत असतानाही छत्रपती संभाजी राजे क्षणभरही डगमगले नाहीत. व त्यांनी औरंगजेबाकडे प्राणांची भीक ही मागितली नाही. आपले जीवन जितक्या निडर पणे संभाजीराजे जगले तितक्याच निर्भयपणे त्यांनी मृत्यूलाही कवटाळले म्हणूनच आजही एक पराक्रमी राजा ,संघटक म्हणून छत्रपती संभाजी राजांचे इतिहासातील स्थान अबाधित आहे.

Loading...

जो क्रूरकर्मा औरंगजेब संभाजी छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी आयुष्यभर झगडत होता व ज्याने अतोनात हाल करून संभाजी महाराजांना मारून टाकले तोच औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांची आपल्या स्वराज्य व स्व धर्माविषयीची मरण समोर दिसत असतानाही टिकून ठेवलेली अढळ निष्ठा पाहून भारावून गेला होता व आपल्याला असा एखादा पुत्र का मिळाला नाही अशी खंतही त्याने व्यक्त केली होती.

Loading...

छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर मराठा साम्राज्याद्वारे त्यांना सोडवण्याचे प्रयत्न का केले गेले नाहीत हा प्रश्न निश्चितच पडतो. याची इतिहासामध्ये निरनिराळी कारणे देण्यात आली आहेत. संभाजी महाराजांना कैद केले गेले तेव्हा त्यांच्यासोबत अन्य 24 जबाबदार व्यक्ती व कवी कलश यांचाही समावेश होता. यामुळे प्रत्यक्ष गडावर युद्धविषयक निर्णय घेण्याचा किंवा अन्य काही वाटाघाटींचे निर्णय घेण्यातसंदर्भात चर्चा करू शकणारे असे जबाबदार व्यक्ती उपस्थित नव्हते.सेनापती घोरपडे यांचाही या युद्धामध्ये मृत्यू झाल्यामुळे नवीन सेनापतीची नेमणूक करण्यात आली नव्हती .पेशवे नीळकंठ मोरेश्वर पिंगळे हेसुद्धा कैदेत होते.त्यामुळे औरंगजेबाच्या संख्येने जास्त असलेल्या सैन्यासमोर त्या परिस्थितीत टिकाव लागणे शक्य नव्हते व मुघलांशी युद्ध करून औरंगजेबाने कैदेत असलेल्या संभाजीराजांना अजून काही इजा पोहोचवू नये हा उद्देशही त्यामागे होता.

Loading...