छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे औरंगजेब. महाराजांना स्वराज्यात त्याने अनेकदा डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवाजी महाराजांनी त्याला दाद लागू न देता आपले स्वराज्य वाढवले. मात्र त्याची अखेर खूप वाईट अवस्थेत झाली. संपूर्ण जीवनात त्याला स्वराज्य मिळवता आले नाही. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील त्याला स्वराज्य जिंकता आले नव्हते. मात्र त्याच्या आयुष्याचा शेवट अखेर अपूर्णच झाला. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला त्याच्या कबरीबद्दल माहिती देणार आहोत तसेच नागरिक ती का बघण्यासाठी जातात याचीदेखील माहिती देणार आहोत.

औरंगजेबाचा मृत्यू हा ३मार्च, १७०७ साली नगर येथे झाला. त्याचा दफनविधी खुलताबाद येथे करण्यात आला. औरंगाबादपासून २० ते २२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी त्याची कबर तुम्हाला पाहायला मिळेल. याठिकाणी जवळपास १५०० समाधी आहेत. खुल्ताबादमध्ये आपला दफनविधी करावा अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे त्याच्या मुलाने आणि मुलीने त्याचा दफनविधी याठिकाणी केला. त्याचबरोबर त्याच्या समाधीसाठी केवळ १४ रुपये १२ आणे इतका खर्च आला असून त्याने मृत्यूपूर्वी हि इच्छा व्यक्त केली होती.

लोकं ही कबर बघायला का जातात?
महाराष्ट्रातील लोकांसाठी औरंगजेब हा क्रूर, निर्दयी आणि वेडा राज्यकर्ता होता. मात्र तरीदेखील हजारो लोक त्याच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. खरे तर औरंगजेबाला मानणारा मोठा वर्ग अजूनही भारतात आहे. कारण त्याने इस्लाममध्ये निषिद्ध असणाऱ्या गोष्टींवर बंदी घातली होती. त्याचप्रमाणे तो इस्लाम धर्माचा कट्टर समर्थक आणि त्याचे आक्रमकपणे पालन देखील करायचा. मात्र इतिहास माहित नसल्याने काही लोक त्याला संत मानतात. मात्र हे आपले दुर्दैव असून त्याचा खरा इतिहास समोर आल्यानंतर त्या लोकांचे देखील औरंगजेब याच्याबद्दलचे मत बदलेल.
