May 23, 2022

उपवासाचा साबुदाणा कोणत्या झाडापासून तयार होतो हे माहित आहे का? बघा संपूर्ण माहिती

उपवासाचा साबुदाणा 

साबुदाणा पहिला कि नेहमी प्रश्न पडतो की  काय आहे हे ? एखाद्या झाडाचं  फळ , त्याच्या शेंगांमधील दाणे की अजून काही? चला आज जाणून घेऊ या साबुदाण्याच्या  रंजक जन्मकथेबद्दल !

Loading...

साबुदाणा केवळ आपला देश नव्हे ,तर न्यू गिनिआ  आणि Moluccas  इ . देशांमध्ये देखील, मुख्य  अन्न  म्हणून वापरला जातो. या अन्नपदार्थाचा सर्वप्रथम उल्लेख १२२५ मध्ये , झाओ रुकोव यांच्या “झू फॅन झीही “, या पुस्तकात आढळतो. या पुस्तकात त्यांने विविध देश आणि त्यांचे विशिष्ट अन्नपदार्थ यांचे वर्णन केले आहे. यात तो ब्रुनेई मध्ये १२व्या शतकात साबुदाणा वापरला गेल्याची नोंद करताना दिसतो. 

Loading...

आपल्या देशात उपवासाच्या जवळपास सर्व पदार्थात वापरला जाणारा हा पदार्थ , तामिळनाडू येथील “सेलम” येथे तयार केला जातो.  टॅपिओका नावाच्या वनस्पतीच्या मुळांपासून  हा तयार केला जातो . हि मुळे  , लागवडीनंतर साधारण ८/९ महिन्यानंतर , साबुदाणा प्रक्रियेसाठी तयार होतात. या मुळांची  साल काही प्रमाणात विषारी असल्यानी साल काढून मुळांचे  छोटे काप केले जातात. ते काप एका टाकीत टाकून त्यांचा प्रथम गर बनविला जातो . त्यानंतर त्यात स्टार्च/पीठ मिसळले जाते . 

Loading...

हे सर्व मिश्रण वाळल्यावर त्यांना चाळणीने चाळून  त्यांचे छोटे बॉल्स बनतात , तोच तो साबुदाणा , जो आपण  खिचडी /वडे तयार करताना वापरतो . आता पाहू याच्या nutritional  values : खरं  तर , साबुदाण्यामध्ये लोह किंवा जीवनसत्वे मुळीच नसतात. १०० ग्रॅम  साबुदाण्यात चक्क ३५१ इतक्या प्रचंड कॅलरी आणि ८७ ग्राम carbohydrates असतात. जे आपल्याला ऍसिडिटीचा त्रास देण्यास पुरेसे असतात. 

Loading...

तेव्हा पुढच्या वेळेस साबुदाणा वडे किंवा खिचडी खाताना , जरा जपून !!!

Loading...