May 23, 2022

… म्हणून पेरूच्या बिया खाणे आहे फायदेशीर. जाणून घ्या पेरूच्या बिया खानाचे महत्वपूर्ण फायदे

समतोल आहारामध्ये फळांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक फळाचे स्वतःचे असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे अनेक व्याधींना दूर केले जाऊ शकते. प्रत्येक फळांची खाण्याची पद्धतही वेगवेगळी असते .काही फळेही कापून खाल्ली जातात, तर काही फळेही चोखून खाल्ली जातात .एखाद्या फळांमधील विशिष्ट भागाला काढून टाकावे लागते जसे की बिया काढून टाकणे आवश्यक असते. पेरू हे फळ आहार शास्त्रीय दृष्ट्या व आरोग्य शास्त्रीयदृष्ट्या खूप लाभदायी आहे.

Loading...

पेरूमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बिया असतात .काही व्यक्तींच्या मते पेरूमधील बिया खाणे हे शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. बिया काढून मग पेरू खाल्ला गेला पाहिजे यामागे  दिले जाणारे कारण म्हणजे या बिया चावायला थोड्या टणक असतात त्यामुळे त्या दातांच्या फटीमध्ये अडकतात किंवा काही व्यक्तींच्या मते पेरूमधील बिया खाल्ल्यामुळे किडनीवर अप्रत्यक्षपणे प्रभाव पडू शकतो.म्हणून पेरूच्या बिया काढून पेरू खाल्ला गेला पाहिजे. पेरूच्या बिया खरोखरच शरीरासाठी अपायकारक आहे का हे आज आपण काही तर तथ्यांच्या आधारे जाणून घेणार आहोत.

Loading...

अँटीऑक्सीडेंट मानलेल्या पेरूच्या बिया या खाण्यासाठी उत्तम आहेत व  त्यांचे पचनही होऊ शकते .त्यामुळे या बिया किडनीमध्ये किंवा अन्य कुठल्याही अवयवांमध्ये अडकण्याचा धोका संभवू शकत नाही.

Loading...

पेरूच्या बिया या वजन कमी करण्यामध्ये सुद्धा अत्यंत उपकारक मानल्या जातात. पेरूच्या बियांमध्ये असलेले पेक्टीन हे फायबर खूप काळपर्यंत भूक लागू देत नाही व त्यामुळे अतिरिक्त खाण्याला आळा बसतो.

Loading...

पेरूच्या बियांमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे हृदयाशी निगडित आजार  जे मुख्यत्वे कोलेस्ट्रॉल मुळे होतात ते नियंत्रणात आणले जाऊ शकतात.

Loading...

मधुमेहाने ग्रस्त रुग्णांसाठी ही पेरूच्या बिया अत्यंत फायदेशीर ठरतात यांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात राहते.

Loading...

पेरूच्या बिया या कॅन्सर, जुलाब ,भगंदर ,उलट्या यांसारख्या निरनिराळ्या व्याधींवर ही प्रभाव शाली ठरू शकतात.

Loading...