May 23, 2022

फार्मासिटीकल्स कंपन्या खरोखरच रुग्णांची लूट करतात का?

भारताने आरोग्य क्षेत्रामध्ये निरनिराळे शोध आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर खूप प्रगती केली आहे .त्यामुळे देश-विदेशातून आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी लोक भारतामध्ये येत असतात. आरोग्य क्षेत्राशी निगडित असलेल्या औषध निर्माण क्षेत्राने निरनिराळ्या औषधांच्या निर्माण सोबतच औद्योगिक क्षेत्रामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये औषध निर्माण कंपन्यांकडून कुठेतरी रुग्णांची दिशाभूल केली जात असल्याचा एक आरोप करण्यात येत होता. या आरोप मागची पार्श्वभूमी व तथ्य आज आपण जाणून घेणार आहोत.

Loading...

भारतामध्ये औषध निर्माण कंपन्या डॉक्टर्स आणि मेडिकल स्टोअर्स किंवा डिस्ट्रीब्युटर्स यांची एक साखळी निर्माण झालेली आहे .या साखळीमध्ये निरनिराळ्या मध्यस्थांच्या जोडीने शेवटचा टप्पा म्हणजे रुग्णापर्यंत औषध पोहोचेपर्यंत त्या औषधाची मूळ किंमत ही अवाच्या सव्वा झालेली असते म्हणजेच त्यामुळे औषधाच्या निर्माणाची किंमत व त्याचा होलसेल रेट यांच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त रक्कम देऊन सर्वसामान्य रुग्णांना औषधे मेडिकल स्टोअर्स मधून खरेदी करावे लागतात व याचा पूर्णपणे लाभ फार्मासिटिकल स कंपनी ,डॉक्टर आणि डिस्ट्रीब्युटर्स यांना मिळतो व सर्वसामान्य रुग्णांना मात्र आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. ही साखळी नक्की कशी चालते हे जाणून घेणे नक्कीच उत्कंठावर्धक आहे.

Loading...

औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या निरनिराळ्या डॉक्टरांसोबत करार करतात व त्यांना आपली औषधे रुग्णांना प्रिस्क्रिप्शन वरती लिहून देण्यासाठी एक टारगेट स्कीम देतात व त्यांच्या कंपन्यांची औषधे रुग्णांना घ्यायला जणू काही भाग पाडण्याच्या बदल्यात संबंधित डॉक्टर्सना टारगेट स्कीम कम्प्लीट झाल्यावर पूर्ण झाल्यावर विदेश भ्रमण यासाठीची तिकिटे किंवा तत्सम काही महागडी भेट दिली जाते.

Loading...

औषध निर्माण कंपन्यांकडून एखाद्या औषधाची होलसेल दरातील मूळ किंमत आणि प्रत्यक्ष रुग्णापर्यंत ते औषध पोहोचेल तेव्हाची किंमत यामधील फरक जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया सिप्ला फार्मासिटिकल कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे निर्माण करण्यात आलेली निसिप टॅबलेट यामध्ये 100 ग्रॅम निमेसुलाइड साल्ट असते त्याची घाऊक किंमत ही तीन ते चार रुपये प्रति स्ट्रिप म्हणजे दहा गोळ्यांची एक स्ट्रिप इतकी असते मात्र जेव्हा ती मेडिकल स्टोअरमधून आपण विकत घेतो तेव्हा ती जवळपास 20 ते 25 रुपये प्रति स्ट्रिप किमतीने विकली जाते. जेव्हा एखादा रुग्ण हा डॉक्टरकडे उपचारासाठी जातो तेव्हा त्याला डॉक्टरने दिलेल्या प्रिस्क्रिप्शन वरील औषधांसाठी कोणतेही पर्याय दिलेले नसतात त्यामुळे त्याला संबंधित कंपनीचेच औषध विकत घ्यावे लागते.

Loading...