Loading...
Loading...
Loading...
Articles निरनिराळ्या धातूंच्या पात्रांमध्ये अन्न शिजवल्यावर शरीरावर कोणते प्रभाव होतात...

निरनिराळ्या धातूंच्या पात्रांमध्ये अन्न शिजवल्यावर शरीरावर कोणते प्रभाव होतात ? ॲल्युमिनियम मुळे होतात हे घातक आजार …

-

Loading...
Loading...
- Advertisment -

भारतीय संस्कृतीने संपूर्ण विश्वाला विविधतेने नटलेले आहारशास्त्र दिले आहे .या आहार शास्त्रांमध्ये फक्त निरनिराळ्या प्रदेशांमधील पाककृतींचा समावेश नसून या आहाराचा आपल्या शरीराला ,आरोग्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपयोग कसा होईल या दृष्टीने उपयुक्त असे मार्गदर्शनही आहारशास्त्र मध्ये करण्यात आले आहे .आपण काय खातो हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच आपण खात असलेले अन्न हे कोणत्या धातूच्या पात्रांमध्ये शिजवण्यात आले आहे त्यावर ही त्याची उपयुक्तता अधिकाधिक वाढवण्याचा गुणधर्म असतो असे आहारशास्त्र मध्ये नमूद करण्यात आले आहे .आज आपण अशाच काही धातूंच्या पात्रांमध्ये शिजवलेल्या अन्नाचा आपल्या आरोग्यावर नेमका काय प्रभाव पडतो हे जाणून घेणार आहोत.

Loading...
Loading...
Loading...

सोने ःभारतातील राजेरजवाड्यांच्या काळामध्ये सोन्याच्या पात्रांमध्ये अन्न शिजवले जात असे व सोन्याच्या पात्रांमध्ये अन्न सेवनही केले जात असे. सोन्याच्या धातूंमध्ये शिजवलेले अन्न हे बलवर्धक व पुष्टी वर्धक असल्याचे मानले जाते याचे मुख्य कारण म्हणजे सोने या धातूमध्ये उष्णता ही प्रवृत्ती असते ज्यामुळे आपल्या त्वचेची कांती सुधारून मोठ्या प्रमाणात विटामिन  ए चा पुरवठा आपल्या शरीरास होतो. विटामिन ए शी निगडीत आपल्या शरीरातील मुख्य अवयव म्हणजे डोळ्यांचे आरोग्य यामुळे चांगले राखण्यास सहाय्य मिळते. सध्याच्या काळात सोन्याचे गगनाला भिडणारे भाव पाहता सोन्याच्या पात्रांमध्ये अन्न शिजवणे हे निश्चितच मुश्कील आहे.

Loading...
Loading...

चांदीः सोन्याच्या अगदी विरुद्ध असा गुणधर्म म्हणजे चांदीमध्ये शीतलता ही वृत्ती असते. चांदी मधील शितल वृत्तीमुळे शरीरातील वात कफ व पित्त या तिन्हींचे योग्य ते संतुलन राखण्यास सहाय्य मिळते. त्यामुळे सध्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात चांदीच्या भांड्यामधून भोजन शिजवले जात नसले तरीही सेवन करण्यावर भर दिला जातो. विशेषतः लहान मुलांना चांदीच्या भांड्यामधून दूध पाजणे ,पाणी पाजणे,चांदीच्या वाटी मधून अन्न खाऊ घालने यांसारख्या पद्धती अवलंबल्या जात आहेत.

Loading...
Loading...

काशाः  काशाच्या भांड्यामध्ये अन्न शिजवणे हे लाभदायक मानले जाते कारण काशाच्या पात्रामध्ये  रक्तशुद्धी चा गुणधर्म असतो .काशाच्या भांड्यामध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळे बुद्धी कुशाग्र होते असे मानले जाते.तसेच रक्‍त अशुद्धी होण्यापासून ही रोखले जाऊ शकते असेही मानले जाते. काशा धातु त्यामानाने कमी महाग असतो त्यामुळे अन्न शिजवण्यासाठी भांडी विकत घेणे व्यवहार्य आहे .काशाच्या भांड्यामध्ये आम्ल प्रवृत्ती असल्यामुळे  आंबट पदार्थ शिजवणे निषिद्ध मानले जाते कारण यामुळे ज्या रासायनिक प्रक्रिया होतात त्याचा प्रभाव अन्नावर पडून ते अन्न विषारी बनते.

Loading...
Loading...
Loading...

तांबेः तांबे हा धातू तुलनेने स्वस्त असतो त्याचप्रमाणे तांब्याच्या भांड्यात फायदे सुद्धा अनेक आहे. तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेले पाणी पिल्याने लिव्हर चे अनेक असाध्य आजार आणि अन्य आजारही दूर झाल्याची उदाहरणे पूर्वापारपासून सांगितली जात आहेत. विद्यार्थ्यांनी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याचे सेवन करणे अत्यंत सहाय्यकारी आहे. तांब्याच्या भांड्यामध्ये अन्न शिजवले जाऊ शकते मात्र तांब्याच्या भांड्यात  दूध किंवा दही सेवन करणे पूर्णपणे वर्ज्य आहे.

Loading...
Loading...
Loading...

पितळः पितळेच्या भांड्यामध्ये  शिजवलेल्या अन्नातील केवळ पाच टक्के पोषकतत्व नष्ट होतात असे सांगितले जाते .त्यामुळे अन्नातील पोषण गुणधर्म जास्तीत जास्त प्रमाणात शरीराला मिळावे यासाठी पितळेच्या भांड्यामध्ये अन्न शिजवणे निश्चितच गुणकारी आहे .पितळेची भांडी तुलनेने महाग असतात मात्र या धातूमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळे वायूशी  निगडीत अनेक आजार दूर होतात. पितळेची भांडी ही अधिक मजबूत असतात आणि ते लवकर गरमही होऊन अन्न लवकर शिजवले जाते.

Loading...
Loading...

लोखंडः लोह किंवा लोखंडाच्या पात्रांमध्ये अन्न शिजवणे किंवा खाणे हे खूप हितकारी आहे असे सांगितले जाते. मात्र आयुर्वेदातील काही प्रयोगानुसार लोखंडाच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवून ते सेवन केल्यामुळे बुद्धी व स्मरणशक्तीचा त्रास होतो असेही निदर्शनास आले आहे लोखंडाच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळे खूप काही फायदे होत नसले तरीही नुकसानही होत नाही.

Loading...
Loading...

अल्युमिनियमः आधुनिक युगातील महत्वपूर्ण शोध असलेले ॲल्युमिनियमची भांडी वापरण्यावर सध्या सर्वच स्तरांमधून विरोध केला जात आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये तर ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी वापरणे जवळपास पूर्णपणे बंद करण्यात आले आहे .कारण ॲल्युमिनियम हे मुख्यत्वे बॉक्साईटच्या प्रक्रियेतून तयार केले जाते व त्या भांड्यामध्ये अन्न शिजवले असता तयार होणाऱ्या रासायनिक प्रक्रियांमुळे दमा, कॅन्सर यांसारख्या आजारांच्या सोबतच काही गंभीर मानसिक आजारही निर्माण झाल्याचे समोर आले आहे .त्यामुळे ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर अन्न शिजवण्यासाठी करू नये असे सांगितले जाते.

Loading...
Loading...

मातीची भांडीः मातीच्या भांड्याध्ये अन्न शिजवणे हे ही परंपरा आपल्या पूर्वजांनी पासून चालत आलेली आहे. मातीच्या भांड्यामध्ये अतिशय संथपणे मंद गतीने अन्न शिजवले जाते. त्यामुळे त्यातील पोषक गुणधर्म कमी होत नाही व त्याचा स्वादही वाढतो.मातीची भांडी ही तुलनेने कमी किमतीची असतात त्यामुळे मातीच्या भांड्यांचा वापर  करण्यावर भर दिला पाहिजे हीआजच्या काळाची गरज आहे.

Loading...
Loading...

Latest news

चीनने खरेच कोरोना व्हायरसची निर्मिती केली? जाणून घ्या

साधारण दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना व्हायरसने विकसित,विकसनशील आणि जागतिक महासत्ता मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये अक्षरशः हाहाकार मांडला...

शनीची साडेसाती मंग ‘हे’ उपाय करा शनिदेव संकटे हि दूर करतील व आशीर्वाद देतील

अखिल ब्रह्मांडाच्या भोवती निरनिराळे ग्रह भ्रमण करत असतात व या ग्रहांना आपल्या हिंदू धर्मामध्ये निरनिराळ्या स्वभाव व...

पोस्टमार्टम रात्री का केले जात नाही? जाणून घ्या या मागील कारणे

तुम्ही होणारे डॉक्टर किंवा nurse , फॉरेन्सिक किंवा CID  विभागाचे असाल तर तुम्हाला शव-विच्छेदनाबद्दल नक्कीच माहिती करून...

भूत-प्रेत खरंच अस्तित्वात आहेत का? काय आहे विज्ञानाचे या विषयी मत

माहिती तंत्रज्ञान व विज्ञानाच्या या आधुनिक युगामध्ये कोणत्याही अंधश्रद्धेला वाव नाही. तथ्यांच्या आधारावर जी धारणा सिद्ध होऊ...
- Advertisement -

उत्तम आरोग्यासाठी दररोज किती तासांची झोप आवश्यक असते? आणि ती मिळवण्यासाठी काय कराल?

आज आपण बघणार आहोत साधारणतः किती झोप आपल्याला आवश्यक असते . आपली रात्रीची झोप ही  मुख्यतः ४...

ओशो आश्रम आणि ओशोशी संबंधित काही माहित नसलेल्या असामान्य गोष्टी – भाग १

सध्याच्या ताण-तणावाच्या आयुष्यामध्ये मनःशांतीसाठी अध्यात्मिक मार्गाकडे झुकण्याचा अनेकांचा कल दिसून येतो . या अध्यात्मिक मार्गांमध्ये अनेक विविध...

Must read

प्लास्टिक पासून पेट्रोल तयार करणारा एक अवलिया, खरच भारतात टॅलेंटची कमी नाही.

मित्रानो सध्या भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगभरात प्लास्टिक ही...

लैंगिक अत्याचार प्रकरणी क्रीडा प्रशिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेप

हॉकी प्रशिक्षकाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कोल्हापूर दि.२८-:...
- Advertisement -

You might also likeRELATED
Recommended to you

Loading...