July 5, 2022
Shilajit benifits

जाणून घ्या शीलाजीत खाण्याचे फायदे

आयुर्वेद ही.भारताने संपूर्ण जगाला दिलेली जणछ एक देणगीच आहे.आयुर्वेदाने निरनिराळ्या औषधांचा आपल्या शरीराला कशाप्रकारे लाभ होऊ शकतो याचे सविस्तर वर्णन केले आहे. काही औषधे किंवा वनस्पती या अगदी अमृतासमान मानल्या जातात कारण त्यांचे फायदे शरीरातील सर्वच अवयवांना होतात. अशाच वनस्पती पैकी एक वनस्पती म्हणजे शिलाजीत होय. शिलाजीत या बहुगुणी आयुर्वेदिक पदार्थाविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Loading...

शीलाजीत हा एक चिकट  पदार्थ असून तो मुख्यत्वे हिमालयातील दगडांमध्ये सापडतो. शीलाजीत हा पदार्थ वनस्पतींच्या शतकानुशतकांच्या कूजण्यामुळे निर्माण होतो.निरनिराळ्या आयुर्वेदिक औषधांमध्ये शिलाजीत चा वापर केला जातो. शिलाजित च्या वापरामुळे अगदी सुरक्षितपणे शरीरातील संपूर्ण स्वास्थ्य उत्तम ठेवले जाऊ शकते।

Loading...

शीलाजीतमध्ये अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या गुणांमुळे मेंदूच्या निगडित अनेक आजारांवर उपाय केले जाऊ शकतात असे सिद्ध झाले आहे. अल्झायमर या आजारावर शिलाजीत खूप प्रभावशाली आहे असें इंटरनॅशनल जर्नल ऑफ अल्झायमर ने सांगितले आहे.

Loading...

शिलाजीत मध्ये असलेल्या फॉल्विक ऍसिड मुळे वृद्धत्वाच्या खुणा दूर राखण्यास मदत होते.फल्विक अँसिडमध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट आणि अँटि इनफ्लेमेटरी घटक असतात. शिलाजीतच्या सेवनामुळे वृद्धत्वाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत असलेल्या पेशींच्या  हानीला आळा बसतो.शीलाजीतच्या सेवनामुळे त्याचे उत्तम संवर्धन होऊन वृद्धत्वाकडे झुकण्याची त्वचेची वृत्तीही मंद होते असे काही व्यक्तींमध्ये दिसून आले आहे.

Loading...

शिलाजीतच्या सेवनामुळे अँनिमियाला अटकाव करता येतो. ॲनिमिया होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिन चा अभाव होय. शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या एनिमी यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होणे,अशक्तपणा,हातपाय गार पडणे, डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसून येतात.शीलाजीतमध्ये मोठ्या प्रमाणात ह्युमिक ऍसिड आणि लोह असते त्यामुळे शिलाजीतच्या सेवनामुळे अँनिमिया होण्यापासून बचाव करता येऊ शकतो मात्र अँनिमियावरील उपचार म्हणून शिलाजीत घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

Loading...

शिलाजीत मध्ये निरनिराळ्या प्रकारच्या विषाणूंची सामना करण्याची शक्ती असते. विविध विषाणू पासून बचाव करण्याची क्षमता शिलाजीत मध्ये असते असे सांगितले जाते मात्र यासाठी ठोस असे पुरावे अजून मिळालेले नाहीत. शीलाजीतच्या सेवनामुळे शरीरातील चेतना आणि ऊर्जा वाढते व त्यामुळे विनाकारण येणारा थकवा दूर होतो.

Loading...

बऱ्याच लोकांना उंचावर गेल्यावर वातावरणातील  अति दाबामुळे थकवा जाणवतो, मळमळणे, ऍसिडिटी यांसारखी लक्षणे सुद्धा दिसून येतात.अतिउच्च दाबाच्या प्रदेशात गेल्यावर शरीरामध्ये दुखण्यासारखे समस्या निर्माण होतात.शिलाजीत मध्ये असलेल्या ह्युमिक ऍसिड मुळे या समस्या दूर होतात.

Loading...

शीलाजीतच्या सेवनामुळे काही उदाहरणांमध्ये आतड्याच्या कँसरला कारणीभूत होणाऱ्या पेशींमधील घटकांना दूर करण्यास मदत मिळाल्याचे दिसून येते. शिलाजीतच्या सेवनामुळे हृदयाशी निगडित समस्य दूर राखण्यास मदत होते.त्याचप्रमाणे रक्तदाबाच्या विकारांवर शिलाजीत खूप प्रभावी उपाय आहे.मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ह्रुद्याशी निगडीत विकार असलेल्या रुग्णांनी शीलाजीतचे सेवन करू नये.

Loading...

स्थूलपणा दूर राखण्यासाठी व्यायाम करणे अत्यावश्यक असते. मात्र स्थूलपणा मध्ये व्यायाम करण्यासाठी आवश्यक ऊर्जा नेहमीच कमी पडते व व्यायामाचा आळस येतो.मात्र शीलाजीतच्या  सेवनामुळे आपोआप शरीरामध्ये ऊर्जा संचारते व अशा व्यक्ती व्यायाम करण्यासाठी तयार होतात.

Loading...

शिलाजीतच्या सेवनामुळे पुरुषांच्या लैंगिक क्षमतेमध्ये वृद्धी होते असे संशोधनांमध्ये दिसून आले आहे.

Loading...

शीलाजीत दुधामधून घेता येऊ शकते. दिवसातून दोन ते तीन वेळा शिलाजीत जे सेवन हे डॉक्टरी सल्ल्याने केले जावे असे सुचवले जाते. शिलाजीत हे पावडरच्या स्वरूपात सुद्धा मिळते.