July 5, 2022

कशा पद्धतीने चालतो स्विस बँकेमधील कारभार आणि काळ्या पैश्यांची उलाढाल : जाणून घ्या माहिती

मित्रांनो आपण आपण मागील भागात स्विस बँक म्हणजे काय आणि तुम्ही या बँकेत खाते उघडू शकता का? याविषयी माहिती दिली होती. आशा आहे कि, तुम्हाला हि माहिती आवडली असेल. तर आजच्या भागात आम्ही तुम्हाला या बँकेचा व्यवहार कशा पद्धतीने चालतो हे सांगणार आहोत. त्याचबरोबर या काळ्या पैशांवर आपल्याला काय करता येईल याची देखील माहिती देणार आहोत.

Loading...

तर चला वाचूयात या भागाविषयी…

Loading...
black money
black money

अशा पद्धतीने चालतो बँक खात्याचा व्यवहार :

Loading...

यासाठी स्विस बँक आपल्या खातेदारांना एक युनिक नंबर देते, म्हणजे यात खातेदाराला स्वत:चे नाव देण्याची गरज भासत नाही. खातेदार या युनिक क्रमांकाच्या साहाय्याने आपले सर्व व्यवहार करू शकतो. त्याचबरोबर दुसरा व्यक्ती देखील हा क्रमांक वापरून त्याचे खाते सांभाळू शकतो. यासाठी त्याला कोणत्याही प्रकारची ओळख विचारली जात नाही. या क्रमांकाच्या साहाय्यानेच हा सर्व व्यवहार सुरु असतो. खातेदार कोण आहे किंवा तो कसा दिसतो याची बँकेतील कर्मचाऱ्यांना देखील माहिती नसते. त्यामुळेच खाते नेमक्या कोणा व्यक्तीचे आहे हे शोधून काढणे जवळपास अशक्य आहे. एवढेच नाही तर ठराविक नंबरचे खाते कोणत्या व्यक्तीचे आहे हे तर खुद्द स्विस बँकेला देखील ठावूक नसते.

Loading...
swiss-bank
swiss-bank

हे पैसे आपण परत आणू शकतो का ?

Loading...

काळा पैसा आपण भारतात पुन्हा आणू शकतो का ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र याचे उत्तर नाही असे आहे. कारण आपल्या देशाची अर्थव्यवस्था यामुळे कोलमडून पडेल. स्विस बँकेतून मिळणार पैसा हा विदेशी चलनात असणार.

Loading...

त्यामुळे विदेशी चलनाचे भारतीय रुपयात रूपांतर करण्यासाठी बाजारातला पैसा वापरावा लागेल. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होईल आणि ती कोलमडण्यास सुरुवात होईल.

Loading...

खरं तर हा पैसा स्विस बँकेत असल्यामुळे फार काही तोटा होत नाही, परंतु देशात तो काळ्या स्वरूपात तयार होतो व आपल्या देशातच आहे यापासून आपल्याला धोका आहे. यामुळे भारत सरकारने यावर बंदी आणण्याऐवजी तो तयार कसा होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Loading...

One thought on “कशा पद्धतीने चालतो स्विस बँकेमधील कारभार आणि काळ्या पैश्यांची उलाढाल : जाणून घ्या माहिती

Comments are closed.