July 5, 2022

अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या ग्रहणाच्या काळात महिलांनी आवर्जून पाळाव्यात ?

एकविसाव्या शतकाला अलविदा म्हणत असताना चंद्र ,मंगळ यांसारख्या ग्रहावर पोहोचलेली आधुनिक वैज्ञानिक पिढी आजही काही बाबतींमध्ये मात्र प्राचीन काळापासून चालत आलेल्या श्रद्धा किंवा एका अर्थी अंधश्रद्धांना जीवापलीकडे जपत असल्याचे दिसून येते. यापैकीच एक म्हणजे सूर्य किंवा चंद्र ग्रहणा च्या काळात गर्भवती स्त्रीने घराबाहेर पडू नये ही प्रथा आजही अगदी काटेकोरपणे पाळली जाते.

Loading...

कोणत्याही ग्रहणाच्या काळामध्ये वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होत असते व ग्रहांच्या स्थितीमध्ये ही मोठ्या प्रमाणात बदल होत असतो. यामुळे वातावरणात नक्कीच मोठ्या प्रमाणात अमुलाग्र बदल होत असतात. याचा सर्वात मोठा धोका हा संवेदनशील आरोग्य स्थितीमध्ये असलेल्या गर्भवती महिलेला पोहोचतो असे मानले जाते .

Loading...

गर्भवती स्त्रीने ग्रहणाच्या काळात कुठेही बाहेर जाऊ नये किंवा अन्य काही प्रतिबंधात्मक उपाय पाळावे असे घरातील मोठ्या स्त्रियांकडून नेहमीच सांगितले जाते. याला कोणत्याही शास्त्रीय आधार किंवा पुरावा नसला तरीही पिढ्यानपिढ्या या नियमांचे पालन केले जाते हे आपण बघतो. अशा कोणत्या गोष्टी आहे ज्या गर्भवती स्त्रीने ग्रहणाच्या काळात आवर्जून पाळाव्यात हे जाणून घेऊया.

Loading...

१. ग्रहण काळात मोठ्या प्रमाणात वातावरणातील किरणांचा संपर्क एकमेकांशी येत असतो यामुळे गर्भवती महिलांनी शक्यतो बाहेर जाणे टाळावे .अगदीच तातडीचे काम असेल तर पोटावर चंदनाचा लेप लावावा जेणेकरून गर्भाचे रक्षण होईल.

Loading...

२. अन्नपदार्थ ,पाणी यांच्यावर ग्रहण काळामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया घडून येते त्यामुळे असे प्रदूषित पाणी किंवा अन्नपदार्थ खाणे टाळावे. ग्रहणाच्या काळात जर भूक लागली किंवा जेवणाची वेळ असेल तर गर्भवती स्त्रीने ज्या अन्नपदार्थ किंवा पाण्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुळशीची पाने टाकली असेल असे पदार्थ व पाणी वापरावे.

Loading...

३. ग्रहण काळातील बदलांचा प्रभाव हा धातूच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात घडून येत असल्यामुळे सुरी ,चाकू किंवा अन्य तत्सम धातुजन्य पदार्थांचा वापर करणे गर्भवती स्त्रियांनी टाळावे. असे पूर्वापार सांगण्यात आले आहे.

Loading...

४. ग्रहण काळामध्ये शक्यतो अंघोळ करू नये ग्रहण संपल्यानंतर अंघोळ करावी.

Loading...

५. ग्रहण हे उघड्या डोळ्यांनी बघू नये. त्यासाठी खास निर्माण केल्या गेलेल्या गॉगलचा वापर करावा.

Loading...

वरती उल्लेख केलेल्या या सर्व नियमांना शास्त्रीय आधार नसल्यामुळे डॉक्टर व खगोलशास्त्रज्ञ सुद्धा त्यांना निराधार मानतात यामुळेच गर्भवती महिलांनी सुद्धा अन्य व्यक्तीं प्रमाणेच ग्रहणाच्या काळातही इतर कोणत्याही दिवसाप्रमाणेच आपली दैनंदिन कामे करावीत असे सुचवले जाते ।गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात आपल्या दिनचर्येत कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही असे सध्या मानले जाते .म्हणूनच आधुनिक काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी ग्रहणाच्या काळात कराव्या अशा काही गोष्टी खालील प्रमाणे

Loading...

१. गर्भवती स्त्रीने बाहेर जाणे टाळू नये. डॉक्टर कडे जायचे असेल, फिरावे वाटत असेल तरीही रोजच्याप्रमाणे बाहेर पडले तर कोणताही धोका नसतो.

Loading...

२. चाकू ,सुरी यांच्याशी निगडित काही कामे करायची असतील तर ती सुद्धा बिनधास्त करावीत.

३. भूक लागली असेल किंवा असेच मस्त लोळत टीव्ही बघावा वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही बिनदिक्कतपणे करू शकता.

थोडक्यात काय तर ग्रहणाच्या काळातही गर्भवती स्त्री अगदी रोजच्याप्रमाणे जगू शकते तेही कोणत्याही कडक नियमांचे पालन केल्याशिवाय.