January 18, 2022

…म्हणून मुली गाडी चालवताना वापरतात स्कार्फ

घरातून बाहेर पडताना चप्पल, पर्स, गाडीची चावी ,मोबाईल या सर्व गोष्टींबरोबरच अजून एक गोष्ट घेतल्याशिवाय कोणतीही स्त्री किंवा मुलगी घरातून बाहेर पडण्याचा विचारच करू शकत नाही ,ही गोष्ट नक्की काय आहे हा प्रश्न तुमच्या मनात निश्चितच निर्माण झाला असेल. ती गोष्ट म्हणजेच दुसरे तिसरे काही नसून मुली किंवा स्त्रिया वापरत असलेला चेहर्‍याभोवती चा स्कार्फ होय .

Loading...

घराबाहेर पडताना कापडाचा हा स्कार्फ चेहर्‍याभोवती जणू एखाद्या संरक्षण करणाऱ्या ढाली प्रमाणे लपेटून घेतल्याशिवाय कोणतीही स्त्री किंवा मुलगी मग भले ती कोणत्याही वयोगटातील असेल ही कल्पना म्हणजे जणूकाही एखाद्या संकटाला आमंत्रण दिल्यासारखेच मानते. स्त्रियांच्या या स्कार्फ बांधण्याला कुणी ट्रेंड म्हणते तर कोणी आपल्या आरोग्य प्रति संवेदनशील राहून घेतलेली त्वचेची काळजी मानते.

Loading...

1. मुलींच्या स्कार्फ बांधण्यावर अनेक विनोद ,कोपरखळ्या मेमेसुद्धा तयार झाले आहेत .अशा या नेहमीच चर्चेत राहणाऱ्या स्कार्फ ला मुली इतका जिव्हाळ्याचा विषय का मानतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. कारखाने ,वाहनांची गर्दी यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करणारी रसायने व वायू सोडले जातात. या सर्वांच्या सानिध्यात दीर्घकाळ राहिल्यामुळे मानवी त्वचेवर व विशेषतः चेहऱ्याच्या संवेदनशील भागांवर एलर्जी पुरळ व काळवंडलेपणा ची समस्या निर्माण होऊ शकते म्हणूनच एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चेहऱ्याला सूर्यप्रकाशात जाताना स्कार्फ ने नीट झाकून घेता येऊ शकते .

Loading...

2. ओझोन वायूच्या विरळ होण्यामुळे अतिनील किरणे प्रत्यक्षपणे पृथ्वीवर पोहोचत आहेत परिणामी त्यांचा मानवी शरीरावरही संपर्क घडून येतो अतिनील किरणांमुळे त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते म्हणूनच स्त्रिया व मुली चेहऱ्याला ज्याप्रमाणे स्कार्फ ने झाकून घेतात तसेच पूर्ण शरीराला सनकोट व ग्लोज आणि सॉक्स ने संरक्षण देत असल्याचेही दिसून येते.

Loading...

3. प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसण्याचे व प्रेझेंटेबल असण्याची आवड ही पुरुषांपेक्षा कांकणभर जास्तच असते म्हणूनच कदाचित प्रदूषण सूर्यकिरणे इत्यादींचा धोका संपूर्ण मनुष्यजातीला असला तरीही स्त्रिया आपल्या चेहऱ्याची काळजी अन्य घटकांपेक्षा जास्त घेताना दिसतात व यामध्ये निश्चितच काही वावगे नसल्याचे एका सर्वेक्षणाद्वारे महिलांना विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून समोर आले .रोज वर्षानुवर्षे उन्हामुळे काळवंडलेली त्वचा ब्युटी पार्लर मध्ये बक्कळ पैसे घालून दुरुस्त करून घेण्यापेक्षा आधीच स्कार्फ सारखा स्वस्त आणि आणि सहज उपलब्ध होणारा उपाय वापरून नीट ठेवणे अधिक सोयीस्कर आहे असे सर्वच स्त्रियांना वाटते.

Loading...

4. स्कार्फ मुळे केसांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते प्रत्यक्ष सोबत संपर्क येत नसेल तरीही सतत धूळ आणि उन्हात कोणत्याही प्रतिबंधात्मक उपायां शिवाय वावरल्या मुळे केसांचा पोत बिघडवून केस रुक्ष व व कोरडे होतात.

Loading...

5. भारत हा प्रदूषणाच्या बाबतीत आघाडीचा देश बनू पाहात आहे कॉस्मोपॉलिटन शहरांप्रमाणे आता निमशहरी भागांमध्ये ही प्रदूषण पातळी मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अशावेळी केवळ सन स्क्रीन लोशन लावून त्वचेची काळजी घेण्याचा सल्ला देणारी पिढी लोप पावत आहे. सन स्क्रीन प्रमाणेच स्कार्फ बांधणे हा त्वचेच्या बऱ्याचशा समस्यांना दूर ठेवण्याचा मार्ग बनू पाहत आहे.

Loading...