May 23, 2022

हार्दिक पंड्याची गर्लफ्रेंड नताशा स्टेनकोविक बद्दल ‘या’ गोष्टी माहित आहे का

क्रिकेटजगत आणि बॉलिवूड यांची केमिस्ट्री जुळल्याची अनेक उदाहरणे आपण निरनिराळ्या माध्यमांतून बघत असतो. भारतीय क्रीडा विश्‍वाला सध्या प्राप्त झालेले ग्लॅमर आणि विशेषतः क्रिकेटला मिळालेले प्रसिद्धीचे वलय यामुळे आजघडीचे अनेक प्रसिद्ध क्रिकेटर्स बॉलिवूडमधील सौंदर्यवतींच्या सोबत प्रत्यक्ष आयुष्यामध्ये वावरताना दिसतात.

Loading...

झहीर खान, हरभजनसिंग, युवराज सिंग यांच्या पाठोपाठच सध्या एका आघाडीच्या क्रिकेटरनेही बॉलीवूड तारकेला आपली सहचारिणी म्हणून निवडल्याची अधिकृत घोषणा केली आहे.भारतीय क्रिकेटमधील उमदा खेळाडू हार्दिक पांड्या ने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्या सोशल मीडियावरील अकाउंट दारे सर्बियन मॉडेल-अभिनेत्री व नृत्यांगना नताशा स्टेनकोविक हिच्यासोबत आपण वांड़ निश्चय केल्याचे आपल्या चाहत्यांना सांगितले.

Loading...

या बातमी बरोबरच हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यावर चहूबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नताशा स्टेनकोविक ही बॉलीवूड मधील काही चित्रपटांमध्ये झळकली आहे .हार्दिक पांड्या सोबत लवकरच लग्नगाठ बांधणाऱ्या नताशा बद्दल आज आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत।

Loading...

1) 4 मार्च 1989 ला सर्र्बियामध्ये जन्म झालेली नताशा  ही एक प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना आहे.

Loading...

2) सुरुवातीच्या काळात नताशाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंग ने केली. या क्षेत्रातही तिला अमाप यश मिळाले.

Loading...

3) अभिनय क्षेत्रामध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी 2012 साली बॉलिवूडची वाट धरत  नताशा भारतात आली.

Loading...

4) भारतामध्येही सुरुवातीला नताशाला मॉडेलिंगच्या ऑफर्स आल्या. कॅडबरी ,फिलिप्स ,जॉन्सन अंड जॉन्सन यांसारख्या नामांकित ब्रांडच्या  जाहिरातींमध्ये नताशाचे दर्शन घडले व या चेहऱ्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

Loading...

5) 2013 साली नताशाला प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेल्या सत्याग्रह या अजय देवगण ची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटात एक आईटम नंबर वर नृत्य करण्याची संधी मिळाली.

Loading...

6) संगीताच्या दुनियेचा बादशहा मानला गेलेल्या बादशहाच्या बंदुक या व्हिडिओमध्ये 2014 साली नताशाने काम केले.

Loading...

7) बिग बॉस मध्ये नताशाने अनेक मातब्बर व इंडस्ट्रीमध्ये सिनिअर असलेल्या व्यक्तींसोबत जवळपास एक महिना व्यतीत केला. या काळामध्ये बिग बॉसच्या घरात नताशा ने दिलेले टास्क अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने पूर्ण केले.

Loading...

8) बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर खऱ्या अर्थाने नताशा प्रसिद्धीच्या झोतात आली ते बादशहाच्या डिजे वाले बाबु या अल्बम मुळे.

9) नताशा ने सौरभ वर्मा दिग्दर्शित सेव्हन हवर्स टू गो.या चित्रपटात आणि शाहरुख खान व कॅटरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या झिरो या चित्रपटांमध्येही छोट्या भूमिका केल्या आहेत.

10) 2017 साली आलेल्या फुक्रे रिटर्न्स या चित्रपटातील मेहबूबा हे नताशावर चित्रित गाणे तिच्या नृत्य कौशल्यामुळे चांगलेच गाजले.

11) नताशाने नच बलिये च्या नवव्या सीजन मध्ये हि सहभाग घेतला होता.