May 23, 2022

सलमान खानच्या आयुष्यातील ह्या गोष्टी आहेत चाहत्यांसाठी आश्चर्यकारक

गेली तब्बल 49 वर्षे भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये आपल्या पिळदार शरीरयष्टी, भारदस्त व्यक्तिमत्व ,आणि डॅशिंग चारित्र्य संपन्न भूमिकां द्वारे आपले स्थान निर्माण केलेला भाईजान उर्फ सल्लू अर्थातच किंग ऑफ ऑफ हार्ट्स सलमान खान याला बॉलिवूडचा अनभिषिक्त चॉकलेट बॉय मानले गेले आहे .सलमानचे आयुष्य मग ते पडद्या वरील किंवा पडद्यामागचे हे दोन्ही नेहमी प्रसारमाध्यमे व चाहत्यांसाठी सुरस आणि रंजक कहाण्या घेऊन आले आहे. सलमानचे चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्याआधी चे आयुष्य नेमके कसे होते हे जाणून घेणे त्याच्या चाहत्यांसाठी जणू एक पर्वणीच ठरेल.

Loading...

सलमान हे प्रसिद्ध कथानक कार सलीम खान व सरला चरक यांचे प्रथम अपत्य आहे. सलीम खान यांच्या सरला चरक उर्फ सलमा या प्रथम पत्नी आहेत .सलमान यांचे आजोबा अफगाणिस्तानातून स्थलांतरित होऊन भारतातील मध्यप्रदेश मध्ये स्थायिक झाले. ते डेप्युटी इन्स्पेक्टर या पदावर इंदोर मध्ये कार्यरत होते. सलमान यांची आई हिंदू होती. त्यामुळे सलमान यांनी आपण हिंदू व मुस्लिम या दोन्ही धर्मांची नाळ जोडून आहोत असे वेळोवेळी सांगितले आहे .सलमान यांच्या वडिलांनी हेलन या प्रसिद्ध नृत्यांगना व अभिनेत्रीशी दुसरा विवाह केला.

Loading...

सलमान व त्यांच्या कुटुंबीयांचे हेलन यांच्यासोबत अतिशय चांगले संबंध आहे. तसेच सलमान व हेलन यांनी एकत्रितपणे काही चित्रपटांमध्ये कामही केले आहे. सलमानला अरबाज, सोहेल हे दोन भाऊ आणि अलविरा व अर्पिता या दोन बहिणी आहेत. आपल्या भावंडां प्रती सलमान अतिशय प्रोटेक्टिव्ह असल्याचे वेळोवेळी दिसून येते .अतुल अग्निहोत्री या प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शकासोबत सलमानची बहीण अलविराने विवाह केला. सलमानने आपले औपचारिक शिक्षण पूर्ण केल्यानंतरच बॉलीवूड मध्ये पदार्पण केले.

Loading...

सलमान यांनी बीवी हो तो ऐसी या 1988 साली आलेल्या चित्रपटातील सहाय्यक भूमिकेद्वारे आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला .मात्र 1989 साली आलेल्या सूरज बडजात्या यांच्या मैने प्यार किया या आजही अजरामर ठरलेल्या व बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडलेल्या प्रेम कहाणी द्वारे सलमानने एक हिरो म्हणून बॉलीवूड मध्ये एन्ट्री घेतली .

Loading...

मैने प्यार किया मधील एक सच्चा निष्पाप प्रेमवीर असलेला सलमान खूप अल्पावधीतच तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला व इतकेच नव्हे तर त्या वर्षीचा नवोदित अभिनेता साठीचा पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही सलमानला मिळाला .यानंतर 1990 मध्ये सलमानने लागोपाठ 3 सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका केल्या यांपैकी बागी या चित्रपटात सलमान नगमा या दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री सोबत झळकला .

Loading...

सलमानने आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले .मात्र कित्येकदा त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप पण ठरले .सलमानच्या यशस्वी व चित्रपट समीक्षकांनी प्रशंसा केलेल्या चित्रपटांपैकी काही चित्रपट म्हणजे हम दिल दे चुके सनम तेरे नाम करण अर्जुन इत्यादी

Loading...

आपल्या वैयक्तिक व सामाजिक आयुष्यात एक सच्चा राजा माणूस म्हणून ओळखला जाणारा सलमान एलिजिबल बॅचलर म्हणूनही प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत सलमानचे नाव सोमी अली संगीता बिजलानी ऐश्वर्या राय कॅटरिना कैफ यांसारख्या निराळ्या सौंदर्यवतींसोबत जोडले गेले आहे. ऐश्वर्या राय-बच्चन व सलमानच्या प्रेम संबंधांना आलेली कटुतेची धार हे प्रसारमाध्यमांसाठी एक खमंग मसालाच बनले होते.

Loading...

अनेक कायदेशीर वादविवादा मध्ये अडकलेल्या सलमान ने सामाजिक बांधिलकीचे जाणीव ठेवून आपल्या बिईंग हयुमन या सामाजिक संस्थेद्वारे लहान मुले व अन्य वंचित घटकांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.

Loading...

अमेरिकेच्या पीपल या मासिकाद्वारे सलमानला जगातील सातवा सर्वात आकर्षक पुरुष म्हणून मानांकन देण्यात आले होते व भारतातील सर्वात सुंदर पुरुष म्हणून नावाजले गेले होते. 2008 साली सलमानच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला. लंडनच्या मदाम तुसा या संग्रहालयात सलमानची मेणाची प्रतिकृती स्थापन करण्यात आली .हा मान मिळवणारा सलमान हा केवळ चौथा भारतीय आहे.

Loading...