May 23, 2022

‘या’ ४ अभिनेत्री पहिल्याच चित्रपटातून बनल्या होत्या सुपरस्टार. ३ अभिनेत्री दिसते खूपच सुंदर

अजरामर कलाकृतींचा इतिहास असलेल्या भारतीय चित्रपट सृष्टीची भुरळ देश-विदेशातील अनेक कलाकारांना पडल्याशिवाय राहात नाही .दररोज इथे लाखो तरुण-तरुणी हे हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविण्याच्या महत्त्वाकांक्षेने या इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवत असतात. मात्र हिंदी चित्रपटांमध्ये ब्रेक मिळवणे हे जितके अवघड आहे तितकेच आपण अभिनय केलेली कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून तिची दखल घेतली जाणे हे सुद्धा तितकेच कठीण आहे .

Loading...

यामुळेच  हिंदी चित्रपट सृष्टीतील कित्येक अभिनेत्री न्रूत्य ,अभिनय ,सौंदर्य ,देहबोली, उत्कृष्ट पटकथा या सर्व घटकांचा संगम एकाच कलाकृतींमध्ये असूनही त्यांनी काम केलेले चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरवण्यात अपयशी ठरलेल्या दिसतात .याउलट काही अभिनेत्री या अगदी नशीबवान सिद्ध होऊन पहिल्या चित्रपटामध्ये रातोरात स्टार झाल्याची सुद्धा उदाहरणे भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये आहेत. अशाच काही नशीबवान तारका या आपल्या पहिल्याच चित्रपटामुळे रातोरात स्टार झाल्या त्यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Loading...

मधु ः आपले बोलके डोळे व चेहऱ्यावरील हावभाव यांच्याद्वारे पहिल्यावहिल्या हिंदी चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री मधूला फुल और काँटे चित्रपटातून अमाप प्रसिद्धी मिळाली .त्यानंतर आलेल्या रोजा या चित्रपटातूनही मधूला स्टारडम मिळाले मात्र आजही फुल और काँटे या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

Loading...

दिव्या भारती ः सौंदर्य आणि अभिनय यांचा एक अनोखा संगम असलेल्या दिव्या भारतीचा 1992 साली आलेला दिवाना हा चित्रपट म्हणजे तिला पहिल्याच चित्रपटामध्ये अभिनेत्रींमध्ये सुपरस्टार चा दर्जा देणारे शीखरच ठरले. यानंतरही दिव्या भारतीचे अनेक सुपरहिट चित्रपट आले मात्र वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिचे दुर्दैवी निधन झाले.

Loading...

मंदाकिनीः राम तेरी गंगा मैली या चित्रपटा द्वारे अत्यंत बोल्ड इमेज घेऊन आलेल्या व आत्तापर्यंतच्या चित्रपट सृष्टीतील सर्व नितीनियमांना जणू काही छेद देणारी छबी म्हणजे मंदाकिनी होय. आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे मंदाकिनी सुपरस्टार्स मध्ये गणली जाऊ लागली. मात्र नंतर डॉन दाऊद इब्राहिम सोबत तथाकथित प्रेमसंबंधांमुळे मंदाकिनीने लवकरच चित्रपटसृष्टीतून एक्झिट घेतली.

Loading...

अमिषा पटेल ः कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसताना व आपले करिअर इकॉनॉमिक्स या क्षेत्रामध्ये करण्याची इच्छा असलेल्या अमिषा पटेल ला नशिबानेच कहो ना प्यार है या चित्रपटामध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. ह्रतिक रोशन आणि अमिषा पटेल या नवोदित जोडीला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अक्षरशः लोकांनी डोक्यावर घेतले. अमिषा पटेल च्या अगोदर हा चित्रपट करीना कपूरला ऑफर करण्यात आला होता मात्र रेफ्युजी या चित्रपटाद्वारे करीना कपूर चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार असल्यामुळे तिने हा चित्रपट नाकारला होता व ती संधी अमिषाकडे चालून आली.अमिषा पटेल या चित्रपटानंतर स्टारडम च्या एका नवीन विश्वामध्ये वाटचाल करू लागली होती. यानंतर तिचे गदर एक प्रेम कथा सारखे चित्रपटही यशस्वी झाले.

Loading...