May 23, 2022

…म्हणून शोले मधील ठाकूर (संजीव कुमार) यांनी लग्न केले नाही

शोले चित्रपटामुळे  संजीव कुमार हे नाव आजच्या पिढीला देखील चांगलेच लक्षात आहे . संजीव कुमार यांनी आपल्या आयुष्यात कधीही लग्न केले नाही ? कि ते लग्न करू शकले नाही ? यामागील सत्य आज आपण जाणून घेणार आहोत . तत्पूर्वी संजीव कुमार यांच्या विषयी जाणून घेऊयात .

Loading...

संजीव कुमार यांनी हिंदुस्थानी या फिल्म पासून आपले करिअर सुरु केले . मात्र हिरो म्हणून ते सर्वप्रथम ‘ निशाणा ‘  या फिल्म मध्ये झळकले . वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी एका वयस्क इसमाचा रोल केला होता . एक सादाबहार अभिनेता म्हणून ते आजही ओळखले जातात .

Loading...

त्यांच्या फिल्मी करियरमध्ये नूतन आणि त्यांच्यामध्ये झालेला वाद आजही त्यांच्या चाहत्यांच्या भुवया उंचावणारा आहे . खरंतर हा वाद निव्वळ योगायोग होता . परंतु संताप आणि गैरसमज झाल्याने नूतन यांनी सर्वांदेखत संजीव यांच्यावर हात उचलला होता . खरेतर झाले असे होते , कि नूतन या लग्नानंतर फिल्ममध्ये काम करत होत्या , मात्र यासाठी त्यांच्या पतीची नाराजी त्यांच्यावर होती .

Loading...

त्यांनी फिल्म मध्ये काम करावे असे त्यांना वाटत नव्हते . नूतन या सेटवर असताना कोणाशी वायफळ बोलत नसे . आपल्या कामाशी काम ठेवत असे . एका फिल्मच्या दरम्यान संजीव आणि त्यांच्यातील मैत्री घट्ट झाली . परंतु इतरांनी या मैत्रीच्या नात्याला वेगळे स्वरूप दिले . ज्याचा परिणाम नूतन यांच्या खासगी आयुष्यावर दिसू लागला . त्यांचे पती आणि त्यांच्यामध्ये भांडण झाले .

Loading...

याच गोष्टीचा राग मनात धरून नूतन यांनी सर्वांदेखत संजीव यांच्या कानशिलात लावली . परंतु हि अफवा असून यात संजीव कुमार यांचा कोणताही स्वार्थ आणि सहभाग नव्हता हे कळाल्यानंतर त्यांनी संजीव यांची माफी देखील मागितली .

Loading...

फिल्मी करिअर मध्ये त्यांनी अशा अनेक उतार -चढावांना आणि मान-अपमानांना गिळले. आणि आपली कारकीर्द प्रामाणिक पाणे सुरु ठेवली . चांगल्या भूमिका वठवून त्यांनी नाव तर कमवले परंतु खासगी आयुष्यात मात्र स्थिरस्थावर होऊ शकले नाहीत . १९९३ साली त्यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांना मागणी घातली होती . परंतु हेमा मालिनी यांनी त्यांना नकार दिला . त्यानंतर १९७६ मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला . या आघातातून ते स्थिर होतच होते कि , पुन्हा १९८५ मध्ये त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला आणि वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला .

Loading...

तर अशी आहे सदाबहार अभिनेता संजीव कुमार यांची लाईफ स्टोरी … शरीराने साथ न दिल्याने या उमद्या कलाकाराला वैयक्तिक आयुष्यात कधीही स्थिरथावर होता आले नाही .

Loading...