May 23, 2022

बापरे! शोले मूवी ची कमाई ऐकून तुम्ही थक्क व्हाल. चक्क इतक्या कोटीची केली होती कमाई

कितने आदमी थे, धन्नो भाग तेरी इज्जत का सवाल है, सरदार मैने आपका नाम खाया है तो अब गोली खा यांसारख्या अप्रतिम दिलखेचक  संवादांचा खजिना असलेल्या शोलेमधील संवाद आजही आबालवृद्धांच्या तोंडी असतात. लयबद्ध संगीत ,अर्थपूर्ण गाणी ,तितकीच तगडी स्टारकास्ट,भक्कम पटकथा, सर्वच कलाकारांनी समरसून केलेला अभिनय यामुळे शोले ही एक दंतकथाच बनवून राहिली आहे. सध्याच्या काळात चित्रपटांच्या शंभर कोटी ,तीनशे कोटी च्या बॉक्स ऑफिस कलेक्शन चे क्लब स्थापन होऊ लागले आहेत .अशा वातावरणामध्ये 1975 पासून ते 2020 पर्यंत सातत्याने भारतभर प्रदर्शित झालेल्या शोले या चित्रपटाची तेव्हाच्या काळातील बॉक्स ऑफिस वरील कमाई प्रत्यक्षात किती होती हे जाणून घेणे निश्चितच अचंब्याचे ठरेल.

Loading...

1975 साली शोले हा चित्रपट प्रदर्शित झाला.त्या काळी चित्रपटांच्या थिएटर मधील तिकीटांची किंमत ही साधारण दोन ते पाच रुपये इतकी होती .सुरुवातीच्या एक ते दोन आठवड्यांमध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही कारण या चित्रपटाबद्दल त्याकाळी फारसे मार्केटिंग प्रभावीपणे  होऊ शकले नाही. मात्र दुसर्‍या आठवड्यात जेव्हा या चित्रपटाची माऊथ पब्लिसिटी जोरात झाली त्यानंतर या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईने तुफान वेग धरला व त्या काळामध्ये या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस वरील कलेक्शन हे जवळपास पंधरा कोटी इतके होते .म्हणजे या कमाईला आजच्या काळातील संदर्भा सोबत मोजले तर हे कलेक्शन तब्बल एक हजार कोटी रुपये इतके होते .म्हणजे आजच्या काळात ज्या चित्रपटांना शंभर किंवा तीनशे कोटी बाँक्स आँफिस कलेक्शन झाले की कोटीच्या क्लब मधील महान चित्रपट मानले जाते त्यांच्या पेक्षा कितीतरी पटींनी जास्त या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन होते .हा चित्रपट साधारण दोन कोटी रुपये इतक्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता व त्याचे संपूर्ण भारतातील बॉक्स ऑफिस वरील कलेक्शन हे 15 कोटी रुपये इतके होते.

Loading...

शोले च्या अगोदर 1943 आली प्रदर्शित झालेल्या किस्मत या चित्रपटाने एक कोटी रुपये इतके बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते .त्यानंतर आलेल्या भारतीय चित्रपट सृष्टीतील अजरामर कलाकृती पैकी एक मानल्या जाणाऱ्या मुघल-ए-आझम या चित्रपटाने 5.5 कोटी रुपये इतका गल्ला जमवला होता. त्यानंतर राज कपूर यांनी 1973 साली बनवलेल्या बाँबी या प्रेमपटाने तरुणाईला भुरळ घालत मुघल-ए-आझम इतकेच म्हणजे 5.5 कोटी रुपये इतके बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते. 1975 साली रांगड्या वीरू आणि  संयमी जय या जोडीला व तितक्याच अनोख्या खलनायक गब्बर सिंग आणि अन्य पात्रांना डोक्यावर घेत प्रेक्षकांनी शोलेला प्रचंड प्रतिसाद दिला व या चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये दहा कोटी रुपये इतके बॉक्स ऑफिस कलेक्शन सुरुवातीला गाठून दहा कोटीचा ही पल्ला पार पाडणार्‍या चित्रपटाचा मान मिळवला.शोलेने प्रस्थापित केलेला हा बॉक्स ऑफिस कलेक्शन चा पंधरा कोटीचा विक्रम 1981 पर्यंत कोणत्याही चित्रपटाला पार करता आला नव्हता .1981 साली आलेल्या क्रांती या चित्रपटाने 10कोटी रुपये इतकी बॉक्स ऑफिस कमाई करत या विक्रमाच्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न केला.

Loading...

शोले हा चित्रपट केवळ त्याच्या बॉक्स ऑफिस वरील कमाई मुळे नव्हे तर यातील प्रत्येक पात्र घटना इतकेच नव्हे तर धन्नो या घोडीचे पात्रसुद्धा जणुकाही एक हिरो बनले इतके गारूड या चित्रपटाचे प्रेक्षकांच्या हृदयावर आजही आहे. शोले या चित्रपटाच्या संदर्भातील काही पडद्यामागची तथ्यही खूप उत्सुकता पूर्ण आहे.

Loading...

कितने आदमी थे हा संवाद आजही चित्रपट रसिकांच्या मनावर राज्य करून आहे हा संवाद ज्या खलनायकाने अजरामर केला तो खलनायक म्हणजे अमजद खान होय.अमजद खान यांना शोले मधील रोल हा मिळत असतानाच हा रोल हातांमधून जाताजाता वाचला आहे. या भूमिकेसाठी डॅनी डेंझोग्प्पा या कलाकाराची निवड अक्षरशः फायनल होताहोता थांबली आहे कारण या चित्रपटाचे पटकथा लेखक जावेद अख्तर यांना अमजद खान यांचा आवाज या भूमिकेसाठी साजेसा वाटत नव्हता .मात्र त्यानंतर खुनशी व विक्षिप्त स्वभावाचा अनोखा असा खलनायक गब्बरसिंग हा अमजद खान यांनी  आपल्या आवाजाच्या जोरावर शोले मध्ये निर्माण केला. संपूर्ण चित्रपटांमध्ये केवळ 9 सीन्समध्ये दिसलेले अमजद खान आजही गब्बर या नावानेच प्रसिद्ध आहेत.

Loading...

धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची प्रेमकथा या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान खऱ्या अर्थाने फुलली. मिश्किल स्वभावाचे धर्मेंद्र हे हेमा मालिनी यांना  वारंवार मिठीत घेण्यासाठी एका विशिष्ट वेळी चुका करण्यासाठी स्पाँट बाँयना पैसे देऊ करत असे त्यांनी खुद्द सांगितले आहे.

Loading...

जय आणि वीरू ही अजरामर नावे सलीम खान यांच्या कॉलेजमधील दोन जिवलग मित्रांच्या नावांवरून घेण्यात आली आहेत.

Loading...

चित्रपटातील ये दोस्ती हे लोकप्रिय गीत चित्रीकरण करण्यासाठी तब्बल एकवीस दिवस लागले. व जया भादुरी म्हणजेच राधा हे पात्र  संध्याकाळच्या वेळी दिवा लावते ते सीन सुद्धा चित्रित करण्यासाठी सुद्धा तब्बल वीस दिवसांचा कालावधी लागला.

Loading...

जयच्या भूमिकेसाठी सुरुवातीला शत्रुघ्न सिन्हा यांचा विचार करण्यात येत होता मात्र ही भूमिका अमिताभ बच्चन यांना मिळाली.

Loading...

शोलेची पटकथा वाचल्यानंतर अमिताभ बच्चन यांना गब्बरची भूमिका करावी असे वाटत होते तर धर्मेंद्र यांना ठाकूर यांची भूमिका आपल्याला मिळावी असे वाटत होते.

Loading...

बॉक्स ऑफिस वर कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढणार्‍या या चित्रपटाला फिल्मफेअर मध्ये मात्र फक्त एक पुरस्कार मिळाला आणि तोसुद्धा संकलनासाठी चा.

शोले या चित्रपटाचे चित्रीकरण बेंगलोर पासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या रामनगर येथे करण्यात आले .शोले मध्ये चित्रीत करण्यात आलेले दगड आज सुद्धा याठिकाणी शोले पत्थर म्हणून प्रसिद्ध आहेत.