May 23, 2022

स्पॉट-बॉय पासून ते रेखाजी यांच्या शॉपिंग बॅग उचलत. हा अभिनेता बनला करोडपती. जाणून घ्या या अभिनेत्याची प्रेरणादायी कहाणी

मुंबई म्हटली की पटकन डोळ्यासमोर येतात फिल्मस्टार , त्यांचे मोठमोठे बंगले, त्यांची झगमगती दुनिया अनेकांना खुणावते , त्यांना मोहात पडते . आणि मग काही जण ठरवून तर काही जण या दुनियेच्या चकाचौंधमध्ये हरवून इथे चालले येतात .  त्याचप्रमाणे ,१९७० च्या दशकात मिथुनदा देखील , बंगालमधून मुंबईला आले , फिल्मी दुनियेत आपलं नशीब आजमावून बघण्यासाठी !

Loading...

 टॅलेंट , रूप , अभिनयाचं अंग सर्व असूनही टिकाव धरण्यासाठी जरुरी होतं ते पैसे कमावणं . त्याचवेळेस फिल्म निर्देशक दुलाल  गुहा यांचे सुपुत्र ‘गौतम गुहा ‘ यांनी मिथुनदांना मदत केली.

Loading...

१९७६ मध्ये दुलाल  गुहा ” दो अनजाने ” नावाचा सिनेमा निर्देशित करत होते आणि त्यात ते प्रथमच ” रेखा-अमिताभ ” जोडीला एकत्र दाखवणार होते . त्या  निमित्ताने struggle करणाऱ्या मिथुन यांना एक काम सोपविलं गेलं ते म्हणजे ” अमिताभ-रेखा यांच्या सोबत राहण्याचं ” अर्थात ” स्पॉट-बॉय ” चं ! त्याचबरोबर त्यांना चित्रपटात एका डायलॉगपुरती छोटी भूमिका देण्यात आली होती .

Loading...

दोन्ही कामे मिथुन यांनी चोख पार पाडली . उरलेल्या वेळात ते रेखा जी यांच्याबरोबर शॉपिंग ला देखील जात . लोकांना आपण दिसू नये म्हणून रेखाजी बुरखा घालून जात आणि मिथुन दा  त्यांच्या शॉपिंग बॅग उचलत.

Loading...

नशीब आणि मेहनतीने मिथुन दा  यांना साथ दिली आणि पुढच्याच वर्षी त्यांच्या  ‘ मृगया ‘ या चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी ” सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला . आणि १९७८ मध्ये ‘ मेरा रक्षक ‘ नावाच्या चित्रपटात मुख्य -भूमिका देखील मिळाली.

Loading...

आणि मुख्य म्हणजे , कसलीही तमा , शरम न बाळगता ज्या मिथुन यांनी रेखा जी यांच्या चक्क शॉपिंग देखील उचलल्या,  पुढे जाऊन त्यांच्याच बरोबर ४ महत्वपूर्ण चित्रपटात कामे देखील केली .

Loading...