July 5, 2022

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये मेड फॉर इच अदर मानले गेलेले अनेक कपल्स सध्या विभक्त होण्याच्या मार्गावर असतानाच काही कपल्स हे लग्नाच्या बेडीत अडकण्याचा तयारीत असल्याच्या गूडन्यूज ही समोर येत आहेत  त्यापैकीच एक सर्वात हॅपनिंग आणि सतत चर्चेत असलेले कपल म्हणजेच निर्माता दिग्दर्शक व अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर ही जोडी लवकरच विवाह करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे.

Loading...

2015 पासून एकमेकांना डेट करत असलेले फरहान आणि शिवानी हे 2020 च्या अखेरपर्यंत विवाह करतील किंवा फराहनच्या तुफान या चित्रपटाच्या रिलीज नंतर या वर्षाच्या मध्येही  फँन्सला सरप्राईज देत त्यांचा विवाह होऊ शकतो अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित तुफान चित्रपट फरहानच्या बॉक्सरच्या प्रमुख भूमिकेवर केंद्रित आहे .या चित्रपटाच्या रिलीज होण्याची तारीख 2 ऑक्टोबर 2020 असून त्यानंतर त्यांच्या विवाहाची तारीख निश्चित केली जाणार आहे. मात्र फरहान आणि शिवानीने आतापासूनच आपल्या विवाहाची तयारी सुरू केल्याचे त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोज वरून सध्या दिसून येत आहे.

Loading...

46 वर्षीय फरहान अख्तर चे हे दुसरे लग्न असून त्याने पहिली पत्नी अधुना  हिच्याशी घटस्फोट झाल्यानंतर काही काळ रॉक आँन या चित्रपटातील त्यांची कोस्टार असलेल्या श्रद्धा कपूर सोबत त्याचे नाव जोडले गेले होते मात्र लवकरच हे नाते संपुष्टात आले व मॉडेल एक्ट्रेस आणि उत्तम गायिका असलेल्या शिवानी सोबत  त्याची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले .गेल्या चार वर्षांपासून एकमेकांसोबत असलेल्या शिवानी आणि फरहान यांचे फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे.

Loading...

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि आणि हनी  ईराणी हे फळहान अख्तरचे आई वडील आहेत. इतकी मोठी चित्रपट पार्श्वभूमी लाभलेली असतानाही फरहानने आपल्या करीयरची सुरुवात अवघ्या सतराव्या वर्षी लम्हे या चित्रपटाच्या वितरण कामांमध्ये एक इंटर्न म्हणून केली .दिल चाहता है, लक्ष्य, रॉक आँन यांसारख्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या  चित्रपटांमध्ये निर्माता म्हणून फरहानने आपले योगदान दिले आहे. याव्यतिरिक्त जिंदगी ना मिलेगी दोबारा ,भाग मिल्खा भाग या चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनयही दाखवला आहे.

Loading...

शिवानी ही मूळची महाराष्ट्रीयन कुटुंबात जन्मलेली असून तिचे बालपण हे मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेमध्ये गेले आहे.आपल्या दोन बहिणी सोबत तिने डी बँड म्हणून एका म्युझिकल बँड चीही स्थापना केली असून बॉलीवूड मध्ये शानदार ,रॉय या चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. शिवानी  ही मुख्यत्वे निरनिराळ्या टेलिव्हीजन शोमध्ये एक प्रसन्न अँकर म्हणून आपल्याला दिसून येते.

Loading...