May 23, 2022

‘या’ ५ बॉलीवूड मूवी तुम्ही बघितल्या आहे का ? एकाही गाणे नसताना झाल्या होत्या सुपरहिट

भारताच्या मातीत जन्मलेल्या चित्रपटांना एका वेगळ्याच धाटणीचे सिनेमे बनवण्यामध्ये निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक यांच्याप्रमाणेच गीतकार व संगीतकार यांचे सुद्धा मोठे योगदान आहे .भारतीय चित्रपटांमध्ये गीत व संगीत असणे हे जणू काही बंधनकारकच आहे कारण भारतीय मातीमध्ये मनोरंजनासाठी चित्रपट निर्माण होण्याअगोदर पासून गीत व संगीता द्वारे प्रेक्षकांशी संवाद साधला जात असे तसेच राजेरजवाड्यांच्या काळात महालांमध्ये मोठमोठे गायक असत व त्यांचा मानही मोठा असे.

Loading...

हीच परंपरा भारतीय चित्रपटांमध्ये सुद्धा जेव्हापासून चित्रपट बोलके झाले तेव्हापासून पाळली जात आहे. भारतीय चित्रपटांमध्ये काही चित्रपट तर त्यांच्या गाण्यांमुळे आज सुद्धा प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. भारतीय चित्रपटांमधील गाणे हे केवळ मनोरंजनासाठी नसून त्यामधील काही गाण्या द्वारे जीवनाचे सार सांगितले जाते तर काही मधून प्रेमभावना प्रकट केल्या जातात  व काही मधून एखाद्या ह्रूद्य तुटलेल्या रांझाची उत्कट वेदना मांडली जाते ,तर काही मधून अगदी दिलखुलासपणे आलेला दिवस जगण्याचा कानमंत्र दिला जातो.

Loading...

काळानुसार गाण्यांचे ,संगीताचे प्रकारही बदलत गेले. प्रेक्षकांची आवड निवडही बदलत गेली मात्र जगभरातील संपूर्ण चित्रपट सृष्टी पैकी भारतीय चित्रपट हा एकमेव असा प्रकार आहे ज्यामध्ये गीत आणि संगीताला कधीही वगळले जाऊ शकत नाही. मात्र यामध्ये सुद्धा सध्या काही अपवाद दिसून येतात .भारतीय चित्रपटांमध्ये कथेच्या व मांडणीच्या मागणीनुसार काही वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.यातीलच एक ट्रेंड म्हणजे कोणत्याही गाण्याशिवाय चित्रपटाची कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाणे होय. आज आपण असेच काही चित्रपट पाहणार आहोत ज्यामध्ये एक सुद्धा गाण्याचा समावेश नव्हता.

Loading...

१) इत्तेफाकः यश चोपडा हे नाव भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये रोमान्स नवनवीन कल्पना द्वारे मांडणारे नाव म्हणून ओळखले जाते.आपल्या चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण गाण्यांचा समावेश करण्यावर चोपडा यांचा भर नेहमीच असे. मात्र इत्तेफाक या राजेश खन्ना आणि नंदा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ६0च्या दशकात प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये मात्र चोपडा यांनी कोणत्याही गाण्याशिवाय चित्रपटाची कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा एक वेगळा प्रयोग केला व या प्रयोगाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हा चित्रपट एक रहस्यमय कथा असून  ही कथा एका रात्री भोवती पूर्णपणे फिरते. या चित्रपटांमध्ये कोणत्याही गाण्याचा समावेश नसला तरीही प्रेक्षक या कथेत, या चित्रपटातील हत्येचे रहस्य उलगडण्या मध्ये अगदी गुंगून जातात. केवळ प्रेक्षकांची पसंतीची नव्हे तर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि ध्वनीनिर्मितीचा पुरस्कारही मिळाला होता.

Loading...

२) कलयुगः1981 साली प्रदर्शित झालेल्या कलयुग या शाम बेनेगल दिग्दर्शित चित्रपटामध्येही एका सुद्धा गाण्याचा समावेश नव्हता. या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट होती. चित्रपटातील प्रमुख भूमिकांमध्ये शशी कपूर, राज बब्बर,रेखा यांच्यासोबतच बाल कलाकाराच्या भूमिकेत उर्मिला मातोंडकर होती. या चित्रपटाची कथा ही महाभारताच्या मूळ साराशी खूपच  मिळतीजुळती होती. या चित्रपटामध्ये एकसुद्धा गाणे नसले तरीही चित्रपटाच्या पटकथेला आणि सादरीकरणाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला व त्या वर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही या चित्रपटाने पटकावला.

Loading...

३) जाने भी दो यारोःभारतीय चित्रपटांमध्ये व्यंग्यात्मक विनोदा चे सादरीकरण करणारे चित्रपट क्वचितच राष्ट्रीय पुरस्कार विजेते ठरतात मात्र जाने भी दो यारो या 1983 चाली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशस्वी होण्यासोबतच त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळवला. हा चित्रपट कुंदन शहा यांनी दिग्दर्शित केला होता .सदय स्थितीवर व्यंग्यात्मक स्वरूपात भाष्य करणाऱ्या या चित्रपटामध्ये ओम पुरी,नसरुद्दीन शहा, रवि वासवानी यांसारख्या कलाकारांचा समावेश होता व या चित्रपटामध्ये एका सुद्धा गाण्याचा समावेश नव्हता.

Loading...

४) कौनः अनुराग कश्यप लिखित कौन या चित्रपटाची पटकथा इतकी रोमांचकारी आणि रहस्यमय पूर्ण होती की प्रेक्षक आपल्या खुर्चीवरून तसूभरही ढळत नसत. त्यामुळे या रहस्याचा उलगडा होत असताना कोणत्याही गाण्याचा समावेश करून या पटकथेचे गांभीर्य राम गोपाल वर्मा या चित्रपटाच्या  निर्देशकांना घालवायचे नव्हते म्हणूनच कौन चित्रपटामध्ये एकाही गाण्याचा समावेश केला गेला नाही. या चित्रपटाची समीक्षकांकडून तोंडभरून प्रशंसा करण्यात आली .कौन चित्रपटामध्ये उर्मिला मातोंडकर , सुशांत सिंह ,मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

Loading...

५) ब्लॅकःराणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील एक माईल स्टोन मानल्या गेलेल्या ब्लॅक या चित्रपटामध्ये एक अंध व मुक बहिरी मुलगी व तिच्या जगण्याच्या संघर्षामध्ये अमिताभ बच्चन  यांनी साकारलेल्या शिक्षकाच्या भूमिकेत दाखवले गेले आहेत. या चित्रपटामध्ये संजय लीला भन्साळी आपल्या अन्य चित्रपटांप्रमाणेच गाण्यांचा समावेश निश्चित करू शकत होते. मात्र या एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाला त्यांनी कोणत्याही गाण्यांचा वापर केला नाही .या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले.

Loading...