July 5, 2022

सुनीता आणि अनिल कपूरची लव्हस्टोरी बॉलिवूडच्या सिनेमापेक्षा भन्नाट आहे.

बॉलीवूड चा झक्कास बाँय आणि वाढत्या वया गणिक.आपले तारुण्य अधिकाधिक जिवंत होण्याचे जणू काही वरदानच लाभलेला भारतीय चित्रपट सृष्टीतील एव्हरग्रीन हिरो पैकी एक म्हणजे अभिनेता अनिल कपूर होय. ऐंशी व नव्वदच्या दशकामध्ये अनिल कपूर यांनी प्रेम कथांमध्ये काम केले होते त्यांच्या सर्वच प्रेमकथा तुफान गाजल्या होत्या. जवळपास सर्वच अभिनेत्रींसोबत चित्रपटांमध्ये त्यांनी रोमान्स केला आहे. अनिल कपूर यांची प्रत्यक्ष आयुष्यातील प्रेम कथा ही अशीच भन्नाट व चित्रपटातील पटकथेप्रमाणेच आहे.

Loading...

अनिल कपूर आणि त्यांची पत्नी सुनीता यांच्या प्रेमकथेची सुरुवात ही एका प्रँक काँलने झाली. सुनिता यांना अनिल कपूर यांच्या  एका मित्राने प्रँक कॉल करण्यास सांगितले व त्यांची मस्करी केली. त्यानंतर त्यांची प्रत्यक्ष भेट एका पार्टीमध्ये झाली. या पार्टीमध्ये सुनिता यांच्या पहिल्याच भेटीत अनिल कपूर त्यांच्या प्रेमात पडले. त्यावेळी अनिल कपूर हे स्ट्रगलिंग ॲक्टर होते तर सुनीता या प्रथितयश व यशस्वी मॉडेल होत्या.

Loading...

जेव्हा अनिल कपूर यांनी आपल्या सुनीता यांच्या विषयीच्या भावना जवळच्या मित्रांजवळ बोलून दाखवल्या तेव्हा सुनिता सोबत त्यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात होऊ शकते हा विचारच  त्यांनी मनातून काढून टाकावा असा सल्ला मित्रांनी त्यांना दिला. मात्र सुनिता यांचा नंबर त्यांनी अनिल यांना मिळवून दिला. अगदी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे आणि अनिल कपूर व सुनीता यांची कहाणी पुढे सरकायला लागली. अनिल नित्यनेमाने सुनीता यांना फोन करत असत.

Loading...

मात्र कधीही सुनिता यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा ते बोलून दाखवू शकले नाही कारण त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती व अशा परिस्थिती मध्ये सुनीता यांना डेटवर घेऊन जाणे हे त्यांच्या खिशाच्या आवाक्याबाहेरचे होते .मग शेवटी एकदा सुनिता यांनी न राहून अनिल यांना  भेटण्यासाठी बोलावले. अनिल त्यावेळी चेंबूर येथे राहत असत. सुनिता यांनी त्यांना विचारले की तुला यायला किती वेळ लागेल त्यावेळी अनिल यांनी मला तिथे पोचायला दोन तास लागतील असे उत्तर दिले. त्यावर आश्चर्यचकित झालेल्या सुनीता यांना त्यांनी उत्तर दिले की मी बस ने येत आहे माझ्याकडे बस तिकीट एवढेच पैसे आहेत . त्यावेळी सुनीता यांनी तू टँक्सी करून लवकर ये इथे आल्यावर टॅक्सी चे भाडे मी देते असे अनिल यांना सांगितले.

Loading...

त्यानंतर तिथून पुढे नेहमी सुनिता अनिल यांचे बिल भरत असत व त्यांना आर्थिक मदतही करत असत व कदाचित यामुळेच लवकरात लवकर सुनिता यांच्या बरोबरीने आपण कमवावे ही प्रचंड इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली व त्या दृष्टीने त्यांनी हर एक प्रकारचे प्रयत्न बॉलीवुडमध्ये एन्ट्री मारण्यासाठी केले. 1984 साली आलेल्या मशाल या चित्रपटातून अनिल कपूर यांना एक नवी ओळख मिळाली व इथून त्यांच्या यशाचा आलेख उंचावण्यास सुरुवात झाली.

Loading...

मशाल चित्रपट हिट झाल्यानंतर अनिल यांनी सुनीता यांच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवण्यासाठी आपण आता लायक झालो आहोत असे समजून सुनीता यांना लग्नासाठी मागणी घातली. त्यावेळी सुनीता यांनी विचार करण्यासाठी थोडा वेळ मागितला त्यामुळे कदाचित आपण अजुनही त्या उंचीवर पोहचू शकलो नाही आहोत का हा प्रश्न अनिल कपूर यांना पडला. मात्र सुनीता यांनी त्यानंतर लगेचच अनिल कपूर यांना लग्नासाठी होकार दिला.

Loading...

मात्र बॉलीवूडमध्ये एका चित्रपटानंतर लगेचच लग्न केले तर अनिल कपूर यांचे बॉलिवूडमधील करिअर संपुष्टात येईल अशी भीती त्यांना चित्रपट सृष्टीतील मित्र व सिनियर्सने घातली त्यामुळे लग्नाची निश्चित केलेली तारीख रद्द करून अनिल यांनी लग्न लांबणीवर टाकले. लग्नाची तारीख पुढे ढकलण्याची जेव्हा दुसरी वेळ आली त्यावेळी सुनीता यांनी लग्न करायचे असेल तर उद्याच नाही तर कधीच नाही असा पवित्रा घेतला त्यामुळे केवळ जवळच्याच काही लोकांच्या उपस्थितीमध्ये लागलीच अनिल व सुनिता विवाह बंधनात अडकले.

Loading...

लग्नानंतर सुनीताने अनिल कपूर यांचे घर व करियर हे दोन्ही सांभाळण्याची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. सर्वप्रथम त्यांनी लग्न केल्यानंतर आपल्या मॉडेलिंगच्या करिअरला  अलविदा केले व अनिल ला प्रत्येक फ्रंटवर एकनिष्ठपणे साथ दिली. अनिल चे ड्रेस डिझाईन करण्यापासून ते शूटिंगला त्याच्यासोबत राहून त्याची कामे करण्यापर्यंत सर्व जबाबदाऱ्या सुनीता यांनी सांभाळल्या. सुनिता व अनिल यांना सोनम ,रिया आणि हर्षवर्धन ही तीन मुले आहेत. या तीनही मुलांचे संगोपन व पालनपोषण करण्यात  सुनीता यांनी कुठेही कमतरता पडू दिली नाही. सुनिता आणि अनिल कपूर हे दांपत्य सर्वच प्रेमी कपल्ससाठी व विवाहितांसाठी एक आदर्श जोडपे म्हणून पाहिले जाते. सुनिता वअनिल हे जवळपास 45 वर्ष एकमेकांसोबत आहेत.

Loading...