July 5, 2022

‘नो स्मोकींग’ जाहिरातींमधील ती लहान मुलगी आता दिसते खूपच सुंदर?

अनेक मोठ्या अभिनेत्यांची मुले लहानपणापासूनच सिनेमात बालकलाकाराची भूमिका करतात. मात्र काहीवेळा त्यांना मोठे झाल्यानंतर त्या क्षेत्रात आपले स्थान टिकवता येत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला एका स्टारकिडबद्दल नाही तर जेव्हा जेव्हा तुम्ही सिनेमा पहायला सिनेमा हॉलमध्ये जाता तेव्हा तुम्ही ‘नो स्मोकिंग एड’ पाहिले असेल, ज्यात एक सुंदर लहान मुलगी वडिलांसोबत बसलेली दिसली असेल, या मुलीबद्दल माहिती सांगणार आहोत. हि मुलगी सध्या काय करते हे आजच्या लेखात आपण पाहणार आहोत.

Loading...

सिमरम नाटेकर असे या लाडक्या बालिकेचे नाव असून ती सध्या १९ वर्षांची आहे. समजा हि जाहिरात साधारण दहा वर्ष जुनी असेल तर त्यावेळी तिचे वय हे ९ वर्ष होते. चित्रपट सुरु व्हायच्या आधी जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये दाखवली जाते. साधारणपणे चित्रपटात दोन वेळा हि जाहिरात येते, त्यामुळे तुम्ही या मुलीचा अभिनय देखील पहिला असेल.

Loading...

आता हि मुलगी मोठी झाली असून १९ व्या वर्षी देखील तिच्या चेहऱ्यावर तीच सुंदरता आणि निरागसता आहे. या जाहिरातीनंतर तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. त्यामुळे सध्या ती बऱ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. ती सध्या मुंबईत राहत असून सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे.

Loading...

सिमरन नाटेकर हिने डोमिनोज, व्हिडिओकॉन, क्लिनिक प्लस, बार्बी इत्यादी अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे. त्याचबरोबर अनेक टीव्ही मालिकांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत. सोनी टीव्हीवरील ‘पहरेदार पिया की’ या मालिकेत तिने कुंवर रतनसाच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

Loading...

त्याचबरोबर ‘दावत-ए-इश्क या सिनेमात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली आहे. इंस्टाग्रामवर सिमरनचे 144k फॉलोअर्स आहेत. तसेच ती सिनेमा आणि मालिकांबरोबर अभ्यासात देखील हुशार आहे. एक यशस्वी अभिनेत्री म्हणून तिला कारकीर्द घडवायची आहे. मात्र सध्या तिने या क्षेत्रातून विश्रांती घेतली असून लवकरच ती या क्षेत्रात पुनरागमन करेल.

Loading...