February 17, 2020
दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे(लक्ष्या) यांच्या विषयी माहिती नसलेल्या दहा गोष्टी.

दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे(लक्ष्या) यांच्या विषयी माहिती नसलेल्या दहा गोष्टी.

Read Time8 Second

दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे(लक्ष्या) यांच्या विषयी माहिती नसलेल्या दहा गोष्टी.

 1. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954 ला मुंबई येथे झाला.
laxmikant berde - Images
laxmikant berde – Images
 1. लक्ष्मीकांत बेर्डे यांना मराठी चित्रपटसृष्टी लक्ष्या, हस्यसाम्राट या टोपण नावाने ओळखते.त्यांच्या सर्वात प्रचलित नाव हे लक्ष्मीकांत पेक्षा लक्ष्या हेच होतं.
laxmikant berde - Being Marathi
laxmikant berde – Being Marathi
 1. लक्ष्मीकांत यांचा अभिनय सुरवातीपासूनच चित्तवेधक होता.सार्वजनिक उत्सवामध्ये त्यांचा सहभाग असे.शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक पारितोषिके पटकावली.
 2. त्यांनी जीवणातील अभिनयाची सुरवात 1983-84या काळात केली.पुरुषोत्तोम बेर्डे यांच्या ‘टूर टूर’ ह्या नाटकामध्ये प्रमुख भूमिका सादर करून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती.
laxmikant berde - Images
laxmikant berde – Images
 1. ‘लेक चालली सासरला’ हा त्यांच्या जीवनातील प्रथम चित्रपट होता.प्रथम चित्रपटामध्येच त्यांना प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत घेण्यात आले होते.
 2. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक चित्रपटात काम केलं आहे.सर्व चित्रपट हे हिंदी आणि मराठी अशी असून त्यातील मराठी चित्रपट धुमधडाका,अशी ही बनवाबनवी,थरथराट ही आहेत.
laxmikant berde - Images
laxmikant berde – Images
 1. हिंदी चित्रपटमध्ये सर्वात प्रथम 1989 साली मैन प्यार किया या चित्रपटातून त्यांनी सुरवात केली.या चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या हे होते तर प्रमुख भूमिकेत सलमान खान होते.
 2. त्यांची गाजलेली नाटके:
 3. टूरटूर
 4. बिघडले स्वर्गाचे दरवाजे
 5. शांतेच कार्ट चालू आहे
 6. त्यांचं कार्यक्षेत्र हे अफाट होतं मराठी चित्रपट,मराठी रंगभूमी,बॉलिवूड,मराठी दूरचित्रवाणी,हिंदी दूरचित्रवाणी इत्यादी कार्यक्षेत्रात त्यांनी काम केलं आहे
laxmikant berde - Images
laxmikant berde – Images
 1. रुही बर्डे,प्रिया बर्डे ही त्यांच्या पत्नीची नावे आहेत. किडनीच्या आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा 16 डिसेंबर 2004 रोजी मृत्यू झाला.त्यांच्या अकाली जाण्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली.

-अक्षय सुनीता मोहन

Loading...
Loading...
0 0

About Post Author

Tomne

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
100 %
Surprise
Surprise
0 %
Loading...
Loading...