February 29, 2020

जाणून घेऊया नीता अंबानी यांच्या चिरतारुण्याचे रहस्य

उद्योगक्षेत्राला जागतिक स्तरावर आघाडीवर नेण्यामध्ये भारतीय उद्योजकांचा मोठा वाटा आहे. या उद्योजकांमध्ये काही अग्रगण्य उद्योजकांनी आपल्या मेहनत आणि परिश्रमाने औद्योगिक वर्तुळात तर आपले स्थान निर्माण केलेच आहे मात्र अन्य सामाजिक उपक्रम,मनोरंजन क्षेत्रामध्येही आपले योगदान देऊन एक सेलिब्रिटी स्टेटसही प्राप्त केले आहे .प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे नेहमीच म्हटले जाते मात्र भारतामध्ये काही यशस्वी उद्योजकांच्या सहचारिणी या त्यांच्या बरोबरीने उद्योग क्षेत्र व व अन्य सामाजिक उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभागी होऊन आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.

Loading...
Loading...

आघाडीच्या उद्योजकांची अशीच एक सेलिब्रेटी स्टेटस मिळालेली व नेहमीच प्रसारमाध्यमे व सामान्य जनतेला ज्यांच्याविषयी कुतूहल आहे अशी सहचारिणी म्हणजे भारतातील आघाडीचे उद्योजक व रिलायन्स ग्रुपचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी होय.नीता अंबानी यांची ओळख मुकेश अंबानी यांची पत्नी अशी त्यांच्या विवाहानंतर सुरू झाली असली तरीही आता त्यांच्या हुशारी, धडाडी व चिकाटीच्या जोरावर केवळ नीता अंबानी हे नाव संपूर्ण जगभरात एक वजन प्राप्त झालेले आहे .

Loading...

नीता अंबानी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका असून अन्य अनेक उद्योगांमध्ये त्या स्वतंत्रपणे कारभार सांभाळतात .आयपीएल लीगमध्ये एका संपूर्ण टीमची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन  त्या संघाला विजय प्राप्त करून देण्यात मोठा वाटा उचलला आहे. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये ही त्या नेहमीच भरभरून काम करत असतात .

Loading...

इतक्या सर्व व्यस्त दिनक्रम मध्येही नीता अंबानी यांचा उत्साह एखादा नवतरुणी लाजवेल असा असतो. नीता अंबानी यांचे नेमके वय किती याचा अंदाज बांधणे शक्य होत नाही त्याचे कारण म्हणजे त्यांचा अजूनही टिकवून ठेवलेला फिटनेस आणि चिरतरूण सौंदर्य.त्यांच्या अबाधित सौंदर्य आणि खळाळत्या उत्साहाचे रहस्य जाणून घेणे निश्चितच सगळ्यांना आवडेल म्हणूनच आज जाणून घेणार आहोत नीता अंबानी यांच्या फिटनेस बद्दलच्या काही टिप्सः

Loading...

1) नियमित व्यायाम-नीता अंबानी या व्यायामाला कोणत्याही प्रकारचा पर्याय नसू शकतो असे मानतात म्हणूनच त्या आपल्या दिवसाची सुरुवात  रोज धावण्याच्या व्यायामाने करतात .तसेच योगा सुद्धा त्या नियमितपणे करतात. आठवड्यातील दोन दिवस त्या डान्सचाही सराव करतात. डान्स केल्यामुळे शरीराच्या संपूर्ण अवयवांना व्यायाम घडतो असे त्या सांगतात. त्यांच्या मुलांच्या जन्मानंतर नैसर्गिक पणे नीता यांचे वजन खूप वाढले होते .मात्र नियमित व्यायामामुळे आपण वजन कमी करण्यासोबतच ते नियंत्रणातही राखू शकलो असे त्या आवर्जून सांगतात.

Loading...
Loading...

2) पोहणे– नीता अंबानी अन्य सर्व प्रकारचे व्यायाम प्रकार आपल्या स्वतःला फिट राहण्यासाठी अमलात आणतात .पोहणे हासुद्धा एक शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बंर्न करण्याचा योग्य मार्ग असल्याचे त्या सांगतात म्हणूनच पोहोण्याचा व्यायाम त्या आठवड्यातले काही दिवस करतात.

Loading...

3) पोषक आहार- वजन कमी करण्यासाठी निता अंबानी व्यायाम आणि पोषक आहार या दोन्हींची सांगड घालणे गरजेचे आहे असे मानतात .म्हणून त्यांनी कधीही उपाशी राहून डाएट केले नाही. आपल्या आहारामध्ये योग्य ती पोषणमूल्य  असलेले पदार्थ समाविष्ट करण्यावर त्या भर देतात. मुख्यत्वे भरपूर हंगामी भाज्या आणि फळांचा समावेश त्या आपल्या आहारात करतात .खालील काही पदार्थ हे रोजच्या आहारात असलेच पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असतो. यानिमित्ताने जाणून घ्या काही असे पदार्थ ज्यामुळे आपली त्वचा आणि वजन दोन्ही नियंत्रणात राखता  येऊ शकते.

Loading...
  • नारळ पाणी- हे शरीराची अंतर्गत शुद्धी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. नारळाच्या पाण्यामुळे केस व त्वचा या दोन्हींचे आरोग्य चांगले राखता येणे शक्य होते.
  • बीटः बीटच्या सेवनामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते व परिणाम त्वचेवर तजेला निर्माण होतो.
  • पालक ज्युसःपालक ज्यूस रोज सेवन केल्यास चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे डाग किंवा अन्य समस्या निर्माण होत नाहीत.
Loading...
Loading...