July 5, 2022

दररोज केसांना तेल लावताय? मंग हे नक्की वाचा

फास्ट मुविंग प्रॉडक्टच्या जागतिक स्पर्धेमध्ये नित्य नवे उत्पादने बाजारात येत आहेत. या उत्पादनांच्या जाहिराती आणि मार्केटिंग च्या एका सर्वेक्षणामध्ये सर्वात जास्त जाहिरात या केसांशी निगडीत उत्पादनांच्या असल्याचे दिसून आले. यामध्ये केसांच्या तेलांच्या जाहिराती सर्वात जास्त दिसून आल्या आहेत स्त्री-पुरुष या दोन्हींच्याही व्यक्तिमत्त्वामध्ये निरोगी, सुंदर केस महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे केसांच्या आरोग्या प्रति जागरूकता वाढत असल्याचे सध्याच्या काळात दिसून येते.फार पूर्वापारपासून डोक्याला तेलाची मालिश करणे हे केसांची काळजी घेण्यासाठीचा एक मूलभूत उपाय मानला जातो.

Loading...

टाळू भरून लहान मुलांना अंघोळ घालणे हादेखील त्यातलाच एक प्रकार आहे.माथ्यावरती तेलाची मालिश करून केसांच्या मुळापर्यंत तेल जिरवणे हे केसांना निरोगी राखण्यासाठी अत्यंत आवश्यक मानले जाते. मात्र दररोज केसांना तेल लावणे आवश्यक आहे का हा प्रश्‍न बऱ्याच वेळा विचारला जातो. दररोज केसांना तेल लावणे हितकारक आहे का हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Loading...

१) वाढते प्रदूषण व बदलती जीवनशैली यामुळे वातावरणामध्ये प्रदूषकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे .बाहेर पडताना आपले केस  प्रत्येक वेळी झाकून घेणे शक्य नसते अशावेळी केसांवर मोठ्या प्रमाणात धूळ व व अन्य रसायनांचा थर बसतो .या प्रदूषणाच्या थराला आपल्या केसांवरून काढून टाकण्यासाठी केस धुणे अत्यावश्यक असते .केस धुण्या अगोदर केसांना तेल लावून त्यानंतर केस धुतले तर  जास्त प्रभावशाली असते .मात्र तेल लावून डोक्यावर तेल तसेच ठेवून बाहेर पडले तर वातावरणातील धूळ, अन्य प्रदूषणे डोक्यावर केसांच्या मुळाशी चिकटण्याची जास्त शक्यता असते म्हणूनच जेव्हा ही आपण केसांना तेल लावतो ते दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडताना धुऊन टाकणे अत्यावश्यक आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

Loading...

२) केसांना तेल लावल्याबरोबर केसांमध्ये झालेला गुंता काढण्यासाठी लगेचच केस विंचरू नये .केसांना तेल लावल्यानंतर माथ्यावरची त्वचा जास्त संवेदनशील व नाजूक असल्यामुळे कंगव्याने केस विंचरले तर केसांच्या मुळांना  इजा पोहोचून ती तुटण्याची शक्यता असते व त्यामुळे केस गळतात. केसांमधील गुंता होणे टाळण्यासाठी तेल लावताना केसांच्या मुळांना खालपासून ते माथ्यापर्यंत बोटांनी हळूवारपणे मसाज केले तर केसांचा गुंता कमी होतो.

Loading...

३) केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी जास्तीत जास्त तेल केसांमध्ये जिरवणे आवश्‍यक आहे हा एक प्रकारे गैरसमज आहे .कारण सध्याच्या काळात केस धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात शाम्पूचा वापर केला जातो. त्यामुळे जितके जास्त तेल तुम्ही केसांना लावाल तितक्या जास्त प्रमाणात शाम्पूचा वापर तुम्हाला करावे लागेल व परिणामी केसांमधील नैसर्गिक तेल नाश पावेल आणि तुमचे केस हे कोरडे व दुभंगलेले दिसू लागतील। त्यामुळे केसांना तेल लावताना एकदाच पुरेसे तेल घेऊन तेच सर्वत्र सारखे पणे लावण्याचा प्रयत्न करावा.

Loading...

४) केसांना तेल लावल्यानंतर त्यांना घट्ट पोनी किंवा अंबाडा मध्ये बांधू नये .तेल लावल्यानंतर केसांची मुळे ही हलकी झालेली असतात व घट्टपणे बांधल्यानंतर त्यांच्यावर अतिरिक्त ताण येऊन ती तुटू शकतात. यामुळे केसांना अधिकच इजा पोहोचू शकते हे टाळण्यासाठी केसांना तेल लावल्यानंतर सैल अंबाडा किंवा पोनी घालावी.

Loading...