May 23, 2022

…म्हणून इलेक्ट्रॉनिक प्लगमध्ये एक पीन अन्य दोन पीनच्या तुलनेत जाड व लांब असते

सध्याचे युग हे इलेक्ट्रॉनिक युग म्हणून ओळखले जाते .आपल्या आयुष्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दैनंदिन जगण्यातील खूप सारी कार्ये ही इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या शिवाय करणेअशी  आपण कल्पनाही करू शकत नाही. रोजच्या वापरातील वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रिज, मोबाईल इतकेच नव्हे तर सध्याच्या काळात रोबोट्स चाही वापर दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी केला जातो .यावरून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आपल्या आयुष्यातील अविभाज्यता किती वाढली आहे हे आपण समजू शकतो.

Loading...

इलेक्ट्रॉनिक वस्तूंना वापरताना इलेक्ट्रॉनिक उपकरण हे  साँकेटला जोडणे व इलेक्ट्रिक बोर्ड ला प्लग जोडणे गरजेचे असते.या इलेक्ट्रिक बोर्ड ला जोडल्या जाणाऱ्या प्लग मध्ये तीन पीन असतात .या तीन पीन पैकी दोन पिनच्या तुलनेमध्ये एक पीन ही आकाराने जाड आणि लांब असते असे आपण निरीक्षण केले तर स्पष्ट दिसून येते.इलेक्ट्रिक प्लगमध्ये दोन पीनच्या तुलनेत तिसरी पीन ही जाड आणि लांब का असते यामागचे कारण आज आपण जाणून घेणार आहोत.

Loading...

इलेक्ट्राँनिक उपकरणांना जोडलेल्या दोन पिन च्या तुलनेत आकाराने जाड व लांब असलेल्या पीनला अर्थ पीन असे म्हटले जाते. अन्य दोन पैकी एका पीनला फेज पीन आणि दुसऱ्या पीन ला न्यूट्रल पीन असे म्हटले जाते. न्यूट्रल पीन आणि फेज पीन यांचा उपयोग हा मुख्यत्वे प्रमुख विद्युत स्त्रोतापासून पासून इलेक्ट्रिक करंट वाहून नेण्यासाठी केला जातो.

Loading...

अर्थ  पीनचा उपयोग इलेक्ट्राँनिक प्लगला जोडण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना व्यवस्थित अर्थिंग देण्यासाठी केला जातो.अर्थ पीनचा वापर हा इलेक्ट्राँनिक उपकरणे उपयोगात आणत असताना आपल्या सुरक्षिततेसाठी केला जातो. इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे हाताळताना आपल्याला  विजेचा धक्का बसू नये म्हणून अर्थ पीनचा वापर केला जातो. इलेक्ट्रॉनिक उपकरणे ही नेहमीच अर्थ पोटेन्शिअल वर असावीत अर्थात झिरो व्होल्टवर असावीत यासाठी अर्थ पीनचा उपयोग केला जातो.

Loading...

अर्थ पीन चा उपयोग करण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजेच धातूच्या युक्त अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून प्रवाहित होणा-या विद्युतप्रवाहाला अर्थ पिन द्वारे सुरक्षितपणे जमिनीपर्यंत पोचवणे होय .अर्थ पिन ही आकाराने जाड व लांब ठेवण्यामागे मुख्य कारण म्हणजे धातूची जाडी जर जास्त असेल तर त्याचा प्रतिरोध कमी होतो म्हणजेच एखाद्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या धातूच्या कडांजवळ जर एखाद्या करंट किंवा विद्युत प्रवाह  लीक झाला तर क्लबच्या अर्थ पीनची जाडी जास्त असल्यामुळे तो लीक झालेला विद्युत्प्रवाह अगदी सहजपणे जमिनीपर्यंत पोहोचू शकतो आणि यामुळे आपल्याला विजेचा धक्का लागू शकत नाही.

Loading...

अर्थ पीनला अन्य दोन पिनच्या तुलनेमध्ये लांब निर्माण करण्यामागे सुद्धा कारण आहे यामागचे कारण म्हणजे अर्थ पीन ची लांबी जास्त असल्यामुळे एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण प्लगद्वारे साँकेटला जोडलेले असतात व त्याला व्यवस्थित अर्थिंग मिळाले की नाही आणि ते उपकरण प्लगमधून बाहेर काढले असता त्याला प्रॉपर अर्थिंग आहे की नाही याची चाचपणी करता येते. म्हणजेच अर्थ पीनची लांबी जास्त असल्यामुळे जेव्हा प्लग सॉकेट मध्ये जोडला जातो तेव्हा सर्वात आधी अर्थ पीन सॉकेट मध्ये प्रवेश करते व ते उपकरण पूर्णपणे साँकेटला ला जोडणे आधीच व्यवस्थितपणे अर्थिंग त्या उपकरणाला मिळालेले असतात.

Loading...

अगदी त्याचप्रमाणे जेव्हा इलेक्ट्रॉनिक उपकरण आपण  आपण सॉकेट मधून बाहेर काढतो तेव्हा सर्वात आधी लांबीने कमी असलेल्या न्यूट्रल पीन आणि फेज पीन.बाहेर येतात व सर्वात शेवटी अर्थ पीन येते त्यामुळे हे उपकरण बाहेर काढताना सुद्धा इलेक्ट्रॉनिक उपकरणाला व्यवस्थित अर्थिंग मिळालेले असते म्हणजेच अर्थ पीन मुळे अगदी शेवटपर्यंत इलेक्ट्रॉनिक उपकरणाला अर्थिंग चा स्पर्श हा झालेला असतो.

Loading...

अर्थिंग चे हे फायदे जाणून घेतले असता आपण दैनंदिन वापरातील इस्त्री, कुलर ,फ्रीज ,मिक्सर यासारख्या वस्तूं वापरण्यासाठी तीन पीन असलेलेच प्लग वापरावे.अर्थ पीनमुळे अतिरिक्त विद्युतप्रवाहाला नियंत्रित करता येते.

Loading...