July 5, 2022

…म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी लग्न्न केले नाही

ताजमहल,बीबी का मकबरा यांसारख्या अमर प्रेमाची साक्ष देणा-या महान वास्तू असो किंवा हिर रांझा,सोनी-महिवाल यांच्या प्रेमाची अजरामर कहानी सांगणा-या सुंदर साहित्यकृती असोत ही सर्व उदाहरणे म्हणजे सच्च्या कालातीत प्रेमाची उदाहरणे होती याबाबत निश्चितच दुमत नाही.

Loading...

पहिले प्रेम ही भावना व्यक्तीला अंतर्बाह्य बदलून टाकते अगदी त्याचप्रमाणे जर हे प्रेम वास्तव जीवनात मिळाले नाही तर मात्र ती व्यक्ती आपल्या जगण्याचे मार्गच बदलून टाकते असेही दिसून येते.बाॅलिवुडनेही मुघल ए आझम , बाजीराव मस्तानी, यांसारख्या पारंपारिक प्रेमकथांसोबतच अयशस्वी ठरलेल्या प्रेमकथांनाही पडद्यावर जिवंत केले .यामध्ये देवदास, कबीर सिंगसारख्या प्रेमात अपयश आल्यानंतर स्वत:ची वाताहात करणा-या नायकांप्रमाणेच प्रेमात आलेले अपयश पचवून एका ध्येयाला स्वत:ला अक्षरश: वाहीन घेतलेल्या नायकांच्या कथाही चितारल्या गेल्या आहेत. कित्येकदा प्रेक्षक चित्रपट किंवा साहित्यकृतींमधील प्रेमाला प्रत्यक्ष आयुष्यातील प्रेमकथांशी नकळत जोडत असतो.

Loading...

आपले पहिले प्रेम मिळाले नाही म्हणून खतून न जाता राजकारण , समाजकारणाला आपले एकमेव ध्येय बनवून खाजगी आयुष्याचा समतोल अतिशय संयतपणे सांभाळणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी.सार्वजनिक आयुष्यात मुरब्बी राजकारणी,पट्टीचे वक्तृत्वपटू, उत्कृष्ट कवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अटलजींनी अत्यंत संयमीपणे आणि प्रसिद्धीपासून दूर राहून आपल्या खाजगी आयुष्यातील जबाबदा-या पार पाडल्या.अटलजी हे आजन्म अविवाहीत राहिले व इतका कविहृद्याचा माणूस असा अविवाहित का राहिला याचे कारणही तितकेच हृद्य आहे.

Loading...

अटलजींचे त्यांची वर्गमैत्रीण राजकुमारी हकसर यांच्यावर नितांत प्रेम होते व राजकुमारीही अटलजींवर निरतिशय प्रेम करत.मात्र हे दोघे भिन्न जातींचे असल्यामुळे राजकुमारी यांच्या वडिलांचा त्यांच्या नात्याला विरोध होता.राजकुमारी यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह आपल्याच जातीतील ब्रिजमोहन कौल यांच्यासोबत लावून दिला. ब्रिजमोहन हे भारतीय सैन्यदलात अधिकारी होते.

Loading...

राजकुमारी यांचे लग्न झाल्यानंतर अटलजींनी आजन्म अविवाहित राहण्याचा संकल्प घेतला.यासाठी त्यांचे आईवडिलांनी वधुसंशोधन सुरू केल्याचे कळताच त्यांनी जणू बंड पुकारून मित्राच्या घरी स्वत:ला तीन दिवस कोंडून घेतले होते व अखेरीस घरच्यांनी त्यांच्या निश्चयापुढे शरणागती पत्करली. तत्क्षणीच अटलजींनी आपल्या आयुष्यातील सर्वो च्च ध्येय म्हणून देशाप्रती आपले कर्तव्य समाजकारण,राजकारणाच्या माध्यमातून पार पाडणे हे निश्चित केले.या ध्येयला पार पाडताना कौटुंबिक जबाबदा-या आड येऊ नये म्हणून राजकुमारीजंचे लग्न झाल्यानंतर अटलजींनी आजन्म अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला व तो शेवटपर्यंत पाळला.

Loading...

आयुष्याच्या शेवटी त्यांनी राजकुमारी आणि बी एन कौल यांची मुलगी नम्रता हिला दत्तक. घेतले व राजकुमारी यांच्या संपूर्ण परिवाराप्रती त्यांनी नंतरच्यया काशात कुटुंबप्रमुखाची भूमिका बजावली. प्रतेयेक असफल प्रेमकहानीचा शेवट हा एक तर विरह किंवा. मिलन असे सरधोपटपणे मानणा-या या जगात अशी प्रेमकहानी विरळच आहे.

Loading...