December 1, 2021
समुद्रात जेव्हा व्हेल मासा मरण पावतो तेव्हा त्याच्या शवाचे काय होते?

समुद्रात जेव्हा व्हेल मासा मरण पावतो तेव्हा त्याच्या शवाचे काय होते? जाणून घ्या काही आश्चर्य चकित करणाऱ्या गोष्टी.

भारतीय पुराणकथांमध्ये जे विष्णूचे अवतार वर्णन केले आहे त्यामध्ये एक अवतार मत्स्य अवतार म्हणून प्रसिद्ध आहे .भारतामध्ये मत्स्य अर्थात माशाला पूजनीय मानले जात तसेच अन्नसाखळी व जीवन साखळीच्या दृष्टीने सुद्धा पाण्यामध्ये राहणाऱ्या जीवसृष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाण्यामध्ये राहणाऱ्या जीवसृष्टी मधील एक महाकाय व पृथ्वीवरील सर्वात लांब मासा म्हणजेच देव मासा होय. देव माशाला व्हेल असेही म्हटले जाते.  जेव्हा कोणत्याही प्राण्याचा मृत्यू होतो तेव्हा अन्नसाखळीतील निरनिराळे घटक टप्प्याटप्प्यावर त्याचे विघटन करतात व त्यायोगे अन्नचक्र पूर्ण होते आणि प्रदूषणापासून ही पृथ्वीचे संरक्षण होते .आतापर्यंत आढळून आलेला सर्वात महाकाय देवमासा 98 फूट लांब आणि 210 टन इतके वजन असलेला होता.अशा महाकाय देव माशाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे विघटन नक्की पाण्यामध्ये कसे होते व या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात हे आपण जाणून घेणार आहोत.

Loading...

व्हेल अर्थात देव मासा हा संपूर्णपणे जलचर असून तो जमिनीवर जगू शकत नाही. व्हेपल सस्तन प्राणी असून ते पाण्यामध्येच जन्म घेतात ,वाढतात आपल्या पिल्लांना खाऊ घालतात व पुढे जाऊन आपल्या विरुद्धलिंगी व्हेल सोबत पिल्लांना जन्म देतात व पाण्यातच त्यांचा मृत्यू होतो.

Loading...

व्हेलच्या 8 निरनिराळ्या जाती किंवा वर्ग असतात.

Loading...

व्हेलची लांबी ही 26 फूट ते 98 फूट इतकी असू शकते .आतापर्यंत आढळलेला सर्वात लांब देवमासा 98 फूट आणि 210 टन वजन असलेला  ब्लू व्हेल होता.

Loading...

व्हेल माशाचे पिलांना जन्म देण्याची पद्धती ही भूचर आणि उभयचर प्राण्यांपेक्षा वेगळी असते.ते पिलांना जन्म हे पूर्णपणे पाण्यात देत असल्यामुळे शेपटीकडून पिलांना जन्म दिला जातो व जन्म दिल्यानंतर जवळपास दीड ते दोन वर्ष ते आईवर अवलंबून असतात.मादी ही त्या पिल्लांना दीड ते दोन वर्षे दुधावर त्यांचे संगोपन करते.हे दूध इतके जास्त घट्टअसते की त्याचा घट्टपणा हा टूथपेस्ट इतका असतो.

Loading...

व्हेल मासा हा मुख्यत्वे पाण्यातील माशांवर आपली उपजीविका करत असतो. याव्यतिरिक्त काही व्हेल हे पाण्यातील शेवाळे सुद्धा खातात. काही व्हेल फक्त छोटे मासेच खातात.

Loading...

इतक्या महाकाय देवमाशाचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा नक्की त्याचे विघटन कसे होते हा प्रश्न उपस्थित होतो  देवमाशाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे महाकाय शरीर हे तळाशी खोलवर जाते .इथूनच एका नवीन अन्नसाखळी ला सुरुवात होते. समुद्राच्या तळाशी असलेल्या अश्म व अन्य घटक पदार्थांच्या अभ्यासातून असे लक्षात आले आहे की व्हेल माशाचे विघटन हे जवळपास 407 प्रकारच्या  प्राण्यांच्या सानिध्यात टप्प्याटप्प्याने होते. इतक्या मोठ्या प्रमाणात व्यापलेल्या अन्नसाखळी ला देवमासा हा जवळपास लशकभर अन्न पुरवत असतो.

Loading...

माशाच्या विघटनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये पाण्यामध्ये फिरणारे शार्क मासे,हेग फिश देव माशाच्या शरीरातील तंतूंचे अन्न म्हणून भक्षण करतात. ही प्रक्रिया जवळपास दोन वर्ष चालू असते.

Loading...

त्याच्या विघटनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुक्ष्मजीव व परोपजिवी जंतू हे समूहाने देव माशाच्या शरीराभोवती  जमा होतात व त्याच्या हाडांमधील पौष्टिक घटकांना ग्रहण करून जिवंत राहतात. ही प्रक्रिया कित्येक वर्षे चालू राहते.

Loading...

त्याच्या विघटनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सल्फलीक बॅक्टेरिया माशाच्या शरीरातील हायड्रोजन सल्फाईड मोकळा करून त्याचे शरीर केवळ सांगाडा बनवतात. हायड्रोजन सल्फाईड या विषारी वायूमुळे केमोट्रोप यांची निर्मिती होते .हायड्रोजन सल्फाइड च्या विषारी उत्सर्जनामुळे केवळ या वातावरणात तग धरून राहू शकणारे कासव ,शंख, शिंपले गोगलगायी यांसारख्या जिवाणूंची निर्मिती याठिकाणी होते व तब्बल अशा प्रकारचे 150 प्रकार या दरम्यान निर्माण होतात असेही आढळून आले आहे. ही प्रक्रिया ही जवळपास दहा वर्षे चालू असते.

Loading...

आपल्या मृत्यूनंतरही जीवनचक्रातील एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या देव माशाचे अस्तित्व टिकवून ठेवणे हे सध्याचे सर्वात मोठे आव्हान आहे कारण पाण्यामध्ये केला जाणारा प्लास्टिक कचर  व्हेल माशांच्या शरीरात अडकून कितीतरी व्हेल माशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.