May 23, 2022

भगवान श्री हनुमाना खरंच ब्रम्हचारी होते का ?: जाणून घ्या रहस्यमयी कहाणी

पुराण ग्रंथांमध्ये चिरंजीवी, शक्तीचे दैवत ,ज्ञानाचे आराध्य ,भक्तांचे वाली, विजयाचा सम्राट,बलोपासक असे वर्णन करण्यात आलेले भगवान श्री हनुमान  यांना पूर्वापार बालब्रह्मचारी किंवा प्रजापत्य ब्रह्मचारी मानले जाते. व म्हणूनच आजही काही भागांमध्ये लग्नाला जाण्यापूर्वी वर ब्रह्मचार्य आश्रमातून गृहस्थाश्रमा मध्ये प्रवेश करण्या अगोदर बालब्रह्मचारी भगवान श्री हनुमानाचे दर्शन घेतात .

Loading...

मात्र भगवान श्री हनुमान हे खऱ्या अर्थाने बालब्रह्मचारी होते पण आणि नव्हतेही असे काही दावे मांडले जातात. वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायण किंवा पवित्र रामचरितमानस मध्ये भगवान श्री हनुमान हे ब्रह्मचारी होते असा उल्लेख आहे मात्र पराशर संहितेमध्ये भगवान श्री हनुमान यांच्या विवाहाची कथा सविस्तरपणे वर्णन करण्यात आली आहे .आंध्र प्रदेश जिल्ह्यातील खम्मम येथे भगवान श्री हनुमान यांचे त्यांच्या पत्नी सुवर्चला यांच्यासोबत मंदिर आहे.

Loading...

तेलंगणा जिल्ह्यातील खम्मम येथे असलेल्या भगवान श्री हनुमान यांच्या या प्राचीन मंदिरात भगवान श्री हनुमान व त्यांची पत्नी सुवर्चला या दोघांच्याही मूर्ती आहेत. असे मानले जाते की ज्या दाम्पत्यामध्ये वैवाहिक कलह असतात त्यांनी एकत्रपणे जाऊन या मंदिरात दर्शन घेतले तर त्यांच्यातील सर्व ताणतणाव दूर होतात. भगवान श्री हनुमान हे जर विवाहित होते तर ते बालब्रह्मचारी कसे मानले जातात यामागेही रामायण, पराशर संहितेमध्ये निरनिराळी वर्णने करण्यात आली आहेत.

Loading...

भगवान श्री हनुमान हे सूर्यदेवाचे शिष्य होते. सूर्य देवाकडे एकूण निरनिराळ्या नऊ विद्या होत्या. भगवान श्री हनुमान यांनी यांपैकी पाच विद्या अवगत केल्या होत्या त्यांना राहिलेल्या अजून चार विद्या ही अवगत करायच्या होत्या. सूर्य देवांकडून ज्ञान घेत असताना भगवान श्री हनुमान सतत सूर्य देवांच्या सोबत असत. सूर्य देवांच्या रथाच्या फेर्यांसोबत भगवान श्री हनुमान हे तितक्याच वेगाने त्यांच्याबरोबर परिक्रमा करत असत.भगवान श्री हनुमान हे सूर्य देवांचे लाडके शिष्य होते. मात्र बालब्रह्मचारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान श्री हनुमानांना राहिलेल्या चार विद्या शिकवणे हा एक मोठा पेच भगवान श्री सूर्यदेव यांच्यापुढे निर्माण झाला होता. कारण याच्या विद्या शिकणे हे अविवाहित पुरुषाला निषिद्ध मानले जात असे.

Loading...

या चार विद्या शिकून घेण्यासाठी सूर्य देवांनी भगवान श्री हनुमान यांना विवाह करण्याचा सल्ला दिला .मात्र आपण बालब्रह्मचारी असल्यामुळे विवाह करू शकत नाही असे श्री हनुमान यांनी सांगितले. या तिढ्यामधून सुटका करून घेण्यासाठी सूर्य देवांनी आपल्या तेजातून सुवर्चला ही कन्या निर्माण केली व ती तेजातून निर्माण झालेली एक तपस्विनी असल्यामुळे सुवर्चले सोबत विवाह करूनही भगवान श्री हनुमान हे बालब्रह्मचारी राहतील असे त्यांना समजावले .

Loading...

भगवान श्री हनुमान व सुवर्चला यांचा विवाह झाल्यानंतर भगवान श्री हनुमान पुन्हा एकदा सूर्य देवांकडे आपल्या राहिलेल्या ज्ञानार्जनासाठी गेले व सुवर्चला आपल्या तपास्येसाठी निघून गेली.म्हणूनच विवाह करूनही हनुमान हे बालब्रह्मचारी किंवा प्रजापत्त्य ब्रह्मचारी च मानले जातात.

Loading...

भगवान श्री हनुमान यांच्या विवाहाच्या कथेचे सोबतच त्यांना एक पुत्र असल्याची कथा ही पवित्र ग्रंथ रामायणामध्ये आपल्याला आढळून येते .भगवान श्री हनुमान यांच्या पुत्राचे नाव मकरध्वज असे होते . त्याच्याशी निगडित कथा अशी सांगितली जाते की राम व रावण यांच्यातील युद्धाच्या वेळी लंकेचे दहन केल्यानंतर भगवान श्री हनुमानाच्या शेपटीला आग लागली होती व ती आग विझवण्यासाठी भगवान श्री हनुमानाने समुद्राकडे मार्गक्रमण केले .समुद्राच्या पाण्यात आपल्या शेपटीची आग विझवत असताना प्रचंड उष्णतेमुळे निर्माण झालेल्या त्याच्या शरीरावरील घामाचे थेंब एका महाकाय माशाच्या पोटात गेले व तो मादी मासा गर्भवती राहिला. या गर्भवती माशाच्या गर्भातून मकरध्वज याचा जन्म झाला पुढे अहिरावण आने त्याला पाताळलोकाचा द्वारपाल म्हणून ठेवले.

Loading...