May 23, 2022

ओशो आश्रम आणि ओशोशी संबंधित काही माहित नसलेल्या असामान्य गोष्टी – भाग २

1981 साली भगवान रजनीश यांच्या आयुष्यातील एका नवीन पर्वाला सुरुवात झाली या पर्वाला मौन सत्संग असे म्हणतात .1984 साली भगवान रजनीश यांनी अमेरिकेमध्ये प्रस्थान केले .या ठिकाणी ओरिगानो या क्षेत्रात त्यांच्या अनुयायांनी मरुस्थल येथे रजनीशपुरम या अत्यंत हिरवळीने भरलेल्या नयनरम्य अशा नगराची स्थापना केली .रजनीशपुरम येथे आल्यानंतर 1984 साली भगवान रजनीशांनी 1981 साली धारण केलेल्या मौन सत्संगाला समाप्त केले व पुन्हा एकदा प्रवचन देण्यास सुरुवात केली. 1985 साली त्यांची सचिव अचानक रजनीशपुरम येथून बेपत्ता झाली व तिच्या सोबत अन्य काही सहकाऱ्यांनी ही पलायन केले. ते गेल्यानंतर याठिकाणी काही अवैध स्वरुपाचेप कार्य चालत होते असे भगवान रजनीशांच्या लक्षात आले.ओशोंवर या सर्व आरोपांचा ठपका ठेवण्यात आला व त्यांना जवळपास बारा दिवस निरनिराळ्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आले आणि अखेरीस अमेरिका सोडण्यास भाग पाडले गेले.

Loading...

 अमेरिकेतून काढून दिल्यानंतर नऊ महिने भगवान रजनीश निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये भ्रमण करत होते मात्र जवळपास एकवीस प्रजासत्ताक राष्ट्रांनी त्यांना आपल्या देशामध्ये येण्याची अनुमती नाकारली किंवा काही काळ या ठिकाणी वास्तव्य केल्यानंतर त्यांना आपला देश सोडून जाण्यास भाग पाडले .1986साली  मात्र तरीही न डगमगता भगवान रजनीशांनी विश्वभर आपल्या प्रवचनांचे शिबिरे घेतली. 1986साली ओशो मुंबईत आले व त्यानंतर अखेरीस पुण्यातील आश्रमात त्यांनी वास्तव्य केले. 1989 साली भगवान रजनीश यांनी आपल्या नावासमोर भगवान हे संबोधन हटवून केवळ श्री रजनीश इतकेच संबोधन ठेवले व त्यानंतर त्यांना ओशो असेच संबोधले जाऊ लागले.

Loading...

19 जानेवारी 1990 रोजी ओशो यांचे निधन झाले त्यांनी अखेरचा संदेश आपल्या शिष्यांना असा  दिला की मी माझे स्वप्न तुमच्या हवाली करून जात आहे. मी माझे स्वप्न तुमच्या हवाली करून जात आहे या वाक्याचा अर्थ प्रत्येक अनुयायाने वेगवेगळा लावत कुणी त्यांच्या नावाने निरनिराळे आश्रम व बगीचे स्थापन केले तर कुणी त्यांच्या साहित्य प्रवचनांना प्रकाशित करण्या द्वारे आपले योगदान देण्याचा प्रयत्न केला तर कुणी त्यांच्या ध्यानधारणा आपल्या प्रवचनाद्वारे विश्वभर प्रसारित करण्याची सेवा सुरू केली.

Loading...

ओशो यांच्या शिकवणीमध्ये लैंगिकता हा एक प्रमुख घटक होता .नेहमी आपल्या प्रवचनांमधून लैंगिक सुखाच्या प्रती अत्यंत खुला मोकळा असा दृष्टिकोन विकसित करण्यास नेहमी समर्थन दिले होते त्यामुळे भारतीय वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांमध्ये त्यांना सेक्सगुरू अशी उपाधी ही देण्यात आली होती.

Loading...

त्यांनी नेहमीच चैनी विलासी आयुष्य जगले यामुळे त्यांच्यावर नेहमीच टीकेचा भडिमार होत असे.त्यांचे बरेचसे अनुयायी हे समाजातील उच्चभ्रू वर्तुळातून आलेले होते.  भगवान रजनीश यांच्याकडे स्वतःच्या 98 रॉयल रॉयस गाड्या होत्या ज्या त्यांच्या उपरांत त्यांच्या शिष्यांना दान केल्या गेल्या. जेव्हा भगवान रजनीश यांना विचारले गेले की त्यांनी या पैशांचा उपयोग गोरगरिबांसाठी का केला नाही तेव्हा त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता असे उत्तर दिले की जगभरातील सर्व धर्मांमध्ये दीनदुबळ्यांना, गरिबांना दान करण्याविषयी सांगितले जाते मात्र श्रीमंतांना करण्याविषयी कुठेच बोलले जात नाही म्हणून मी हे श्रीमंतांना दान केले आहे असे अजब तत्वज्ञान असलेले ओशो हे काहीसे. कुप्रसिद्ध सुद्धा होते.

Loading...

संपूर्ण विश्वभरात भगवान रजनीश यांचे इतके मोठ्या प्रमाणात अनुयायी असण्यामागचे मुख्य कारण हे होते की आपल्या विश्व भ्रमंतीमध्ये जगभरातील पारंपारिक चालीरीतींच्या बाबतीत तत्वज्ञानाच्या बाबतीत ते आपल्या स्वतःच्या विश्लेषणा द्वारे बोलत असत.प्रत्येक राष्ट्रातील तत्वज्ञान बद्दल माहिती ठेवल्यामुळे पाश्चात्य देशांतील अनुयायांना आकृष्ट करण्यात त्यांना यश मिळाले.

Loading...

ओशो हे संमोहन कलेमध्ये सुद्धा पारंगत होते.ओशो च्या अनुयायांमध्ये मुख्यतः जगभरातील कपड्यांचे व्यापारी आणि प्रसिद्ध उद्योजकांचा समावेश होता त्यांचे स्वतःचे वडील हेसुद्धा एक कपडे व्यापारीच होते.

Loading...

भगवान रजनीश यांच्या सचिव लक्ष्मी ठाकर जी करवा या त्यांच्या एका अनुयायांच्या कन्या होत्या व त्यांच्या पहिल्या शिष्यही बनल्या .भगवान रजनीश यांनी त्यांचे नामकरण माँ योग लक्ष्मी असे केले होते.

Loading...

 रजनीश यांच्या पुण्यातील आश्रमाला सध्या आंतरराष्ट्रीय मेडिटेशन सेंटर म्हणून ओळखले जाते व ते भारतातील परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचा पैकी एक आहे. दर वर्षी सुमारे दोन लाख भक्त या ठिकाणी भेट देत असतात.

Loading...

ओशो  यांचा जन्म मारवाडी कुटुंबामध्ये झाला. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कुठल्याही एका धर्माला मानले नाही.त्यांनी हिंदुझम,बुद्धीझम जैन धर्म,  ख्रिश्चन धर्म या सर्व धर्मांच्या शिकवणीचे विश्लेषण केले .निरनिराळ्या योगा ध्यान यांचा शोध त्यांनी लावला. सक्रिय ध्यान ,निष्क्रिय ध्यान इत्यादी ध्यान पद्धतींचा अवलंब त्यांनी केला होता .देव सर्व ठिकाणी संचार करत असतो ही शिकवण त्यांनी आपल्या अनुयायांना दिली.

Loading...

ओशो आश्रम आणि ओशोशी संबंधित काही माहित नसलेल्या असामान्य गोष्टी – भाग १ वाचण्यासाठी इथे क्लिक करा