May 9, 2021

ताजमहाल की तेजोमहाल? जाणून घ्या काय आहे इतिहास

अजरामर प्रेमाचे प्रतीक मानले गेलेले व प्राचीन भारतीय वास्तू व स्थापत्यशास्त्र विषयी संपूर्ण जगभरात एक आदर्श निर्माण करणारी रचना म्हणून ताजमहाल कडे पाहिले जाते .ताजमहाल ही वास्तू औरंगजेबाचे पिता शहाजहान यांनी.आपली पत्नी मुमताज महल हिच्या स्मरणार्थ  व तिच्या प्रती आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून बांधले होते असे इतिहासामध्ये वर्णन करण्यात आले आहे. मुमताज महल ही शहाजहानची सर्वात लाडकी राणी होती व तिच्या मृत्यूनंतर शहाजहान विरहाने व दुःख आवेगाने निराश झाला होता. मुमताज महल चीकबर ताजमहल मध्येच आहे. इतिहासामध्ये कालानुरुप इतिहास संशोधक ,इतिहास अभ्यासकार व परदेशी प्रवास वर्णने यामध्ये विसंगती आढळून येते व त्यावरूनच आधुनिक काळामध्ये इतिहासातील वर्णन केलेल्या दाव्यांवर किंवा तथ्यांवर ते कितपत सत्य आहेत याविषयी संदिग्धता निर्माण केली जाते.

Loading...

ताजमहालाच्या बाबतीत ताजमहाल हा नक्की शहाजहानने बांधला की नाही, तो मुमताज महलच्‍या प्रेमाचे प्रतीक म्हणुन शहाजहानच्या काळात बांधला गेला की तो आधीच अस्तित्वात असलेल्या वास्तूमध्ये मोगलांनी आपल्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी मुमताजचे दफन केले यावरच पहिला प्रतिप्रश्न केला जातो. त्याचप्रमाणे ही वास्तू मुळतः हिंदू धर्माशी निगडित असून ताजमहालाच्या तळघरामध्ये शिवलिंगाचे अस्तित्व असलेले एक शिवमंदिर म्हणजेच तेजोमहाल अस्तित्वात होता व त्याचे नंतर मुघलांनी आपल्या ताब्यात आल्यानंतर ताजमहाल असे नामकरण केले असेही प्रश्न उपस्थित केले जातात. या संदर्भात कायदेशीर न्यायालयीन प्रक्रिया ही लागू केली गेली होती. ताजमहालाच्या बाबत हे सर्व प्रश्न नक्की का उपस्थित केले जातात  हे समजून घेण्यासाठी नक्की पार्श्वभूमी काय आहे हे थोडक्यात आज आपण जाणून घेणार आहोत.

Loading...

ताजमहाल हे  मुळात तेजोमहाल या  संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे असे मानले जाते कारण इस्लाम धर्मामध्ये कोणत्याही वास्तूला महाल किंवा मेहल असे वर्णन केल्याचे अफगाणिस्तानपासून ते अल्जेरिया पर्यंत कुठेही आढळून आले नाही. त्याच प्रमाणे औरंगजेब किंवा अन्य इस्‍लाम हस्तलिखितां मध्ये कुठेही ताज महाल  अशी नोंद केलेली नाही. औरंगजेबाच्या काळातही त्याच्या दरबारात कुठेही ताजमहाल असे वर्णन केल्याची नोंद नाही .काही इतिहास कारां कडून ताजमहाल हा शब्द मुळात ताज महाल असल्याचे सांगितले जाते जे तथ्यहीन वाटते.

Loading...

ताजमहाल हे नाव मुमताज महल या नावावरून ठेवल्याचे हे काही इतिहासकारांनी कडून सांगितले जाते .मात्र हे प्रमाण मानले जाऊ शकत नाही असे ताजमहाल हा मूलतः तेजोमहाल होता असे माननारा गट समजतो कारण मुमताज ए महल  हे शहाजहान यांच्या तिसऱ्या पत्नीचे नाव नसून तिचे नाव हे मुमताज ए जमानी असे होते आणि ताजमहाल ला मुमताज ज महलचे नाव देण्यासाठी तिच्या नावा मधील पहिली दोन अक्षरे मोठी का काढली गेली हे सुद्धा अनाकलनीय आहे.

Loading...

ताजमहालमध्ये जाण्याअगोदर पादत्राणे काढण्याची पद्धत  अस्तित्वात होती कारण त्याठिकाणी हिंदू धर्माशी निगडित शिवालय होते जर ते इस्लाम धर्माशी. निगडित असले असते तर पादत्राणे काढून जाण्याची काहीच आवश्यकता नव्हती असे ताजमहाल मध्ये शिवालय होते असे अगदी ठामपणे सांगणारा गट आजही मानतो.

Loading...

मुमताज महल चे इसवी सन 1632भक्ती मध्ये निधन झाले.त्यानंतर  जवळपास बावीस वर्षे ताजमहालचे काम पूर्ण होण्यास लागली म्हणजेच 1653 साली ताजमहालाचे बांधकाम पूर्ण झाले. औरंगजेबाच्या कारभारामध्ये असे वर्णन आहे की इसवी सन सोळाशे बावन्न मध्ये औरंगजेबाने ताजमहालाच्या दुरूस्तीचे मोठ्याप्रमाणात काम सुरू केले .त्यामध्ये छत दुरुस्तीच्या कामाचा समावेश होता जर ताजमहाल शाहजहानने पूर्णपणे नव्याने बांधलेली इमारत होती तर त्या ठिकाणी छतगळती सारखी समस्या का निर्माण व्हावी असा प्रश्न येथे उपस्थित केला जातो.

Loading...

ताजमहालचे.बांधकाम हे इसवीसन1155 साली परमार्ती देव यांनी केल्याचे एका संस्कृत शिलालेखामध्ये वर्णन करण्यात आले आहे. हा शिलालेख सध्या लखनऊ म्युझियम मध्ये संग्रहित करण्यात आला आहे .या शिलालेखावर  असे लिहिले आहे.की सफेद संगमरवरमध्ये बांधलेल्या शिव मंदिराचे तेज इतके जास्त होते की एकदा भगवान शिव स्वतः या तेजाने दिपून गेले व कैलास पर्वतावर राहण्यापेक्षा या मंदिरातच राहण्याचा मोह त्यांना झाला होता. या शिलालेखाला. बटके श्वर शिलालेख असल्याचे मानले गेले मात्र पुरातत्व खात्याने हा शिलालेख ताजमहालच्या उद्यानातून शहाजहानच्या काळात उखडून काढून टाकण्यात आल्याचे प्रमाण देण्यात आले आहे।

Loading...

बादशाह शहाजहानच्या दरबारात असलेला इतिहासकार मुल्ला अब्दुल लाहोरी याने बादशहा नामामध्ये असे वर्णन लिहिले आहे की आग्र्याचे  राजा मानसिंग यांचा नातू जयसिंग यांच्याकडून शहाजहानने त्यांच्या महालातील जागा मुमताज महलला दफन करण्यासाठी घेतली होती म्हणजेच ज्या ठिकाणी मुमताज महल चे दफन करण्यात आले तो महाल आधीपासूनच अस्तित्वात होता व त्यामुळे ताजमहाल हा शहाजहानने बांधला हा दावा खोडून काढला जातो।

Loading...

मुघलांच्या काळात भारतामध्ये आलेल्या पीटर मुंडी या इतिहासकाराने 1632 साली ताजमहाल या आग्रा मधील वास्तु चे वर्णन आपल्या प्रवास वर्णन मध्ये केले आहे व ताजमहाल ही वास्तू शहाजहान च्या आधीपासून अस्तित्वात असल्याचेही त्याने आपल्या लिखाणामध्ये सांगितले आहे.

Loading...

विश्वकर्मा वास्तुशास्त्रामध्ये भारतातील 12 ज्योतिर्लिंग यांचा व आग्रा परिसरातील पाच ज्योतिर्लिंग यांचा इतिहास वर्णन करण्यात आला आहे. आग्रा परिसरातील पाचवे.ज्योतिर्लिंग हे ताजमहालमध्ये तळघरात अस्तित्वात असल्याचे येथे सांगण्यात आले आहे. श्रावण महिन्यामध्ये त्यावेळी आग्रा परिसरातील हिंदूधर्मीय पाचही ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याशिवाय संध्याकाळी भोजन ग्रहण करीत नसत असेही वर्णन करण्यात आले आहे.आग्रेश्वर या शिवलिंगाच्या नावावरूनच आग्रा हे नाव प्रचलित झाले असेही सांगण्यात येते।

Loading...

शहाजहानने मुमताजची कबर बांधल्यानंतर ताजमहालाच्या तळघरात ज्याठिकाणी शिवलिंग होते असे सांगितले जाते तेथे कोणासही.येण्यास मज्जाव केला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे साखळदंड व दरवाजे होते असे वर्णन मोगलांच्या हस्तलिखिता मध्ये आढळून येते.

ताजमहाल हे नेमके तेजो महाल म्हणजेच शिव मंदिर होते की नाही हे सप्रमाण कोणीही सिद्ध करू शकले नाही. यासाठी पी एन ओक यांच्यासारख्या इतिहासाच्या गाढ्या अभ्यासकांनी खूप प्रयत्न केले. मात्र भारतातील माहिती आणि इतिहास व पुरातत्त्व विभागाने ताजमहाल या ठिकाणी कोणतेही शिवमंदिर नसल्याचे तथ्यांच्या अभावी सांगून टाकले आहे.