May 23, 2022

जाणून घेऊया कोंडाणा किल्ला सर करण्यात मदत करणाऱ्या घोरपडी विषयी

इतिहासातील अनेक लढाया ह्या त्यामध्ये सहभागी झालेल्या सैनिकांच्या शौर्य व धाडसाबरोबरच संबंधित युद्ध लढताना वापरल्या गेलेल्या निती व युक्ती यांमुळे प्रसिद्ध झाल्याचे आपल्याला दिसून येते. यांपैकीच एक महत्वाची व प्रसिद्ध अशी लढाई म्हणजे तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला मोगलांच्या ताब्यातून सोडून आणण्यासाठी कोंढाणा सर करते वेळी रात्रीच्या वेळी यशवंती ह्या घोरपडीच्या द्वारे वरती किल्ल्यावर चढून जाण्याचा उपाय होय. रात्रीच्या वेळी किल्ल्याची दारे बंद झाल्यानंतर किल्ल्याचा सुभेदार उदयभान व त्याचे सैन्य यांना गुंगारा देत तानाजी मालुसरे यांनी युक्ती व उपलब्ध संसाधने द्वारे यशवंती  घोरपडीला दोर बांधून काही निवडक मावळ्यांसह कोंढाणा सर केला व मोठ्या शिताफीने उदयभानच्या सैनिकांना विरोध केला.

Loading...

मात्र ज्याप्रमाणे इतिहासातील प्रत्येक नोंदीमध्ये काही तथ्य आहे की नाही यावर वाद प्रतिवाद होतात तसेच तानाजी मालुसरे हे खरेच एका घोरपडीच्या साह्याने कोंढाणा किल्ला वर चढून गेले होते का हा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला घोरपडीच्या साह्याने सर केला होता अशा नोंदी इतिहासामध्ये आहे .त्याच घोरपड हया प्रजातीबद्दल यानिमित्ताने आज आपण काही तथ्य जाणून घेणार आहोतः

Loading...

1) घोरपड ही प्रजाती सरपटणार्‍या प्राण्यांमध्ये वर्गीकृत होते. घोरपडीची उत्पत्ती ही आफ्रिका आणि आशियामधील असून आता सध्या घोरपड ही अमेरीकेत सुद्धा आढळते.

Loading...

2) घोरपडीयाच्या एकूण जवळपास ऐंशी प्रजाती आहेत.

Loading...

 3) घोरपडीचा जबडा हा खूप मजबूत असतो तर शेपटीची लांबी हीसुद्धा खूप जास्त असते.घोरफडीचे अन्य अवयव विकसित असतात. घोरपडी ची लांबी ही साधारण दहा फूट पासून ते तेवीस फुटापर्यंत असते .अशी शारीरिक वैशिष्ट्ये किंवा जडण-घडण असलेल्या घोरपडीच्या द्वारे एखादा मावळा सर्वात आधी गडावरती घोरपडीच्या साह्याने दोर लावून पोहोचला असेल  आणि त्याने अन्य मावळ्यांना वरती येण्यासाठी साहाय्य केले असेल असे मानण्यामध्ये काहीही गैर नाही.

Loading...

4) घोरपडी ह्या भूचर व उभयचर या दोन वर्गांमध्ये आढळून येतात.

Loading...

5) बहुतांश घोरपडी या मांसाहार करतात.मांसाहारी घोरपडी या अंडी ,पक्षी, छोटे जीव जंतू इत्यादींचे.भक्षण करतात तर काही घोरपडी या शाकाहारी असतात ज्या फळे व जमिनीवरील भाज्यांचे सेवन करतात.

Loading...

6) घोरपडीला आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व दिले जाते व यातूनच सध्याच्या काळात घोरपडीच्या अवयवांचा तस्करीचा बाजार सुरू झालेला दिसून येतो. घोरपडीच्या तेलाचा वापर त्वचेच्या इन्फेक्शन ला नीट करण्यासाठी केला जातो तर घोरपडी पासून निघालेल्या चरबी द्वारे तेल बनवून शरीरातील निरनिराळ्या भागांच्या दुखण्यावर प्रभावी उपाय म्हणून ते वापरले जाते. तसेच भारत, व्हिएतनाम ,मलेशिया मधील काही भागांमध्ये घोरपडीचे मांस मुख्यत्वे जीभ आणि लिव्हर हे ताकद मिळवण्यासाठी खाल्ले जाते.घोरपडीच्या कातडीपासून निरनिराळी संगीताशी निगडित वाद्य बनवली जातात. यापैकीच एक म्हणजे कर्नाटक संगीतामधील कांजिरा हे वाद्य घोरपडीच्या चमडी पासून बनवले जाते।

Loading...

7) भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बेंगॉल मॉनिटर ही घोरपड सापडते .बेंगाल मॉनिटर हे एका माणसाचे वजन सहजरीत्या उचलू शकेल इतकी मजबूत घोरपड मानली जाते आणि त्याची लांबी ही 71 सेंटीमीटर ते 175 सेंटीमीटर इतकी लांब असू शकते. बेंगाल मानिटर ही संपूर्ण भारतीय उपखंड प्रमाणेच साऊथ एशिया आणि पूर्व आशियामध्ये ही आढळून येते. इतिहासातील वर्णनानुसार तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला सर करताना वापरलेली यशवंती घोरपड बेंगाल मॉनिटर याच प्रजाती मधील होती.

Loading...

7) हास पावणाऱ्या प्रजातींमध्ये IUCN द्वारे दिलेल्या प्रजातींच्या यादीमध्ये घोरपडीचे ही नाव आहे. घोरपडीचे त्यांच्या आरोग्यविषयक उपयुक्त ते मुळे केल्या जाणाऱ्या तस्करी मुळे ही प्रजाती समूळ नाश पावेल या भीतीमुळे वाघ-सिंह यांच्याप्रमाणेच घोरपडीच्या शिकारीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. घोरपडीला मारून टाकणे हा  कायद्याने गुन्हा मानला जातो.

Loading...