जे अशक्यप्राय आहे ते शक्य करून दाखवण्याची उपजत ईसाहसी वृत्ती निसर्गाने मनुष्यामध्ये निर्माण केली आहे. यामधूनच सध्याच्या काळामध्ये साहसी क्रीडाप्रकार, साहसी पर्यटना सारख्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. साहसी पर्यटनामध्ये जीवाचा धोका पत्करून ते ठिकाण सर करण्याची एक झिंग किंवा नशा तरुणांबरोबरच निरनिराळ्या वयोगटांतील पर्यटकांमध्ये ही दिसून येते. अशाच काही साहसी किंवा अशक्यप्राय गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांची यादी वेळोवेळी जागतिक स्तरावर प्रसिद्ध केली जाते.
स्पेनमधील रॉयल पाथ हा रस्ता जगातील सर्व ठिकाणांमध्ये पार करण्यास अवघड असलेला रस्ता म्हणून घोषित करण्यात आला आहे .स्पेनमधील या रॉयल पाथविषयी आज आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत.
अल कमिनीटो डेल रे म्हणजेच राजाचा छोटासा रस्ता असा अर्थ असलेला रॉयल पाथ स्पेनमधील अलोरा या गावाजवळ आहे. हा छोटासा रस्ता या गावाजवळ स्थित असलेल्या धबधब्याच्या अत्यंत अरुंद अशा दरी जवळ वसलेला आहे.

1901 साली अलोरो गावाजवळील कैरो आणि गैतान्जिओ धबधब्यांवर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प साठी मजूर पुरवणे, साहित्य पुरवणे आणि या दोन धबधब्यांवरील कामांचे निरीक्षण व व माहिती आणि दळणवळण यासाठी रॉयल पाथची बांधणी करण्यात आली. या जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचे काम 1905 साली पूर्ण झाले.
या रस्त्याला खरेतर पायवाट म्हणूनच पाहिले जात होते .मात्र 1921 साली महाराजा अल्फान्सो तेरावा याने कोंडे डेल गौडालणहॉर्क या धरणाच्या उद्घाटन प्रसंगी या रस्त्यावरून चालत गेल्यानंतर या पायवाटेचे नामकरण रॉयल पाथ असे केले व ते आजपर्यंत रॉयल पाथ असेच संबोधले जाते.
रॉयल पाथला जगातील सर्वात अवघड रस्ता संबोधण्या मागचे कारण म्हणजे या रस्त्याची लांबी फक्त 1.8 मीटर असून रुंदी फक्त तीन मीटर इतकी आहे तर जमिनीपासून हा रस्ता नऊशे फूट इतक्या प्रचंड उंचीवर आहे. या रस्त्याला सर करण्यासाठी केवळ तेथील अरुंद भिंतींचा आधार घ्यावा लागतो. 1999 आणि 2005 साली रस्ता सर करताना वाढलेल्या दुर्घटनांमुळे त्याला साखळीचे कठडे नंतर निर्माण करण्यात आले.
रॉयल पाथच्याखाली एक नदी वाहते.

रस्ता जेव्हा बांधला गेला तेव्हा तो सिमेंटने काँक्रीटने बांधण्यात आला होता. नंतरच्या काळात याची खूप पडझड झाली व कोणत्याही सुरक्षिततेशिवाय असलेल्या या रस्त्या चे धोके लक्षात घेऊन मलंगा सरकार आणि आँडुलिशिया सरकारने एकत्रितपणे या रस्त्याची पुनर्बांधणी केली व 2015 साली हा रस्ता पुन्हा एकदा पर्यटकांना खुला करण्यात आला